कोल्हापूर : पेठवडगाव हातकणंगले रोडवरील हॉटेल कोल्हापुरी कट्टा समोर रोडवरती ट्रक बंद पडल्याने सोमवार 16 जून रोजी सायंकाळी सुमारे 4 ते 7 अडीच ते तीन तास वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती पेठवडगाव हे आसपासच्या 40 खेड्यांना जोडणारे शहर असल्यामुळे दर सोमवारी आठवडी बाजार भरत असतो सोमवार बाजार असल्यामुळे पंचक्रोशीतील लोकांचे मोठ्या प्रमाणावर पेठ वडगाव येथे बाजीरा निमित्त बाजारपेठेमध्ये येणे जाणे होत असते त्यामुळे या रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते रोडवरती मध्येच आडवा ट्रक बंद पडल्यावर मुळे नागरिकांना व वहाण चालकांना त्रास सहन करावा लागला.
नाशिक: प्रतिनिधी, संतोष रायचंदे मनमाड येथील डमरे कॉलनी परिसरातील व्यावसायीक मुर्तजा अब्दुल हुसेन रस्सीवाला, (धंदा ॲल्युमिनियम व्यापार) हे व त्यांचे कुटुंबीय बाहेरगावी गेलेले असतांना कोणीतरी अज्ञात चोरटयांनी त्यांचे घराचे खिडकीचे गज कापुन व वाकवून त्याव्दारे घरात प्रवेश करून बेडरूममधील कपाटात ठेवलेले १२०० ग्रॅम सोन्याचे दागिने व ०८ लाख रूपये रोख असा मुद्देमाल घरफोडी चोरी करून चोरून नेलेबाबत दि. ११/०६/२०२५ रोजी मनमाड पोलीस स्टेशन येथे गुरनं ३५९/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३३१(३), ३३१ (४), ३०५, ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर धाडसी घरफोडीचे घटनेबाबत नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील यांनी तात्काळ दखल घेवून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व मनमाड पोलीसांना सदर गुन्हा उघडकीस आणणेसाठी मार्गदर्शन करून सुवना दिल्या होत्या. सदर घटना घडल्यानंतर मनमाड शहर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे पथकांनी तात्काळ घटनास्थळावर भेट देवुन पाहणी केली. त्याचप्रमाणे श्वानपथक ,फिंगरप्रिंट तज्ञ तसेच फॉरेन्सिक टिमला देखील घटनास्थळी पाचारण करण्यात आले. सदर प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र मगर व मनमाड पो.स्टे. चे पोलीस निरीक्षक श्री. विजय करे यांनी यातील आरोपीतांची गुन्हा करण्याची पध्दत व घटनास्थळ परिसरातील तांत्रिक बाबींचा काटेकोर पणे अभ्यास करून पडताळणी केली असता सदरचा गुन्हा हा मनमाड शहरातील अभिलेखावरील गुन्हेगारांनीच केला असल्याचा तर्क लावून तपासाची चक्रे फिरविली. त्याप्रमाणे सदर गुन्हयाचे समांतर तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने मनमाड शहर व चांदवड परिसरातुन खालील सराईत गुन्हेगारांना शिताफिने ताब्यात घेतले. १) संजय किशोर गायकवाड, वय ३५, रा. आनंदवाडी, सुभाषनगर, मनमाड, ता. नांदगाव, जि. नाशिक
२)राकेश अशोक संसारे, वय ३०, रा. आनंदवाडी, सुभाषनगर, मनमाड, ता. नांदगाव, जि. नाशिक
३) राजेश रामशंकर शर्मा उर्फ भैय्या, वय ३०, रा. मदिना चौक, सारडा सर्कल, मारूती मंदिराचे पाठीमागे, नाशिक मुळ रा. सुलतानपुर चौक, संजुनगर, गोरखपुर, उत्तरप्रदेश यातील ताब्यात घेतलेले वरील आरोपीतांना तपासाचे कौशल्य वापरून सदर गुन्हयाबाबत सखोल चौकशी केली असता त्यांनी मनमाड शहरातील डमरे कॉलनी परिसरातील एक बंद घराचे खिडकीचे गज कापुन व वाकवून त्याव्दारे आत प्रवेश करून कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम घरफोडी चोरी केल्याची कबुली दिली आहे. यातील आरोपी क्र. १ ते ३ यांना वरील गुन्हयात अटक करण्यात आली असून तपासात त्यांचे कब्जातून १०५५.८५० ग्रॅम (०१ किलो ५५८५० ग्रॅग.) वजनाचे सोन्याचे दागिने किं. रू. १,०५,४०,०००/- (१ कोटी ५ लाख ४० हजार रू.) चा चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. तसेव यातील आरोपींनी गुन्हा करण्यासाठी वापरलेली बजाज पल्सर मोटर सायकल देखील जप्त करण्यात आली आहे. तसेव सदर गुन्हयातील उर्वरित मुद्देमालाबाबत यातील आरोपीतांकडे कसोशिने तपास करण्यात येत आहे. यातील ताब्यात घेतलेले तीन्ही आरोपी हे सराईत गुन्हेगार असुन त्यांचेवर खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहे. यातील ताब्यात घेतलेले तीनही आरोपी हे सराईत गुन्हेगार असुन त्यांचेवर खालील प्रमाणे गुन्हे दाखल
अ.क. आरोपी
१ राजेश रामशंकर शर्मा उर्फ भैय्या, रा. मदिना चौक, बाशिक, गुळ रा. गोरखपुर, उत्तरप्रदेश
२ संजय किशोर गायकवाड, रा. सनगाह पोलीस ठाणे भहकाली, गंगापुर, इंदिरानगर, उपनगर, सरकारवाडा, अंबड, नाशिकरोत, आडगाव, मनमाड, वांदवड, जिल्हा पेठ (जळगाव), जळमाद तालुका, वाळूज एम. आय.डी.सी. (छ.संभाजीनगर)
मनमाड पो. स्टे आर.पी.एफ.मनमाड
घरफोडी-२१
दरोडा तयारी-०१
चोरी-०४
जबरी चोरी-०१
एकूण २७ गुन्हे
चोरी-०२
दुखापत-०१
मुंबई पो. ॲक्ट १४२-०१
मुंबई पो. ॲक्ट १२२-०१ एकुन ०८ गुन्हे
३ राकेश अशोक संसारे, रा. मनमाड मनमाड पो.स्टे. आर.पी.एफ. मनमाड गंभीर दुखापत-०१ बोरी-०१ दंगा-०१ रेल्वे ऑक्ट ३७-०१ एकून- ०४ गुन्हे
यातील आरोपी राजेश रामशंकर शर्मा याचेवर यापूर्वी नाशिक शहर, नाशिक ग्रामीन, जगात छत्रपती संभाजीनगर जिल्हयात मालाविरुध्दचे गंभीर गुन्हे दाखल असून तो प्रत्येकवेळी गुन्हा करतांना वेगवेगळे गुन्हेगारांना सोबत घेवून गुन्हे करत असतो, त्याचा राहण्याचा ठावठिकाणा हा, रो नेहमी बदलत असतो. अलीकडील कालावधीतच तो छत्रपती संभाजीनगर जिल्हयातून जामीनावर मुक्त झाला होता, तेव्हापासून त्याने मनमाड येथील त्याचे वरील साथीदारांसह पुन्हा गुन्हा केला आहे. यातील आरोपीलांकडून घरफोडी बोरचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून सदर गुन्हयाया पुढील तपास मनमाड शहर पोलीस वाणेकशातील अधिकारी व अंमलदार करीत आहे. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री. तेगबीर सिंह संधू, उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड विभाग श्री. बाजीराव महाजन यांनी सदर गुन्हा उघडकीस आणणेसाठी केलेले मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे त्यानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र मगर, मनमाड पो.स्टे. पोलीस निरीक्षक श्री. विजय करे, सपोनि भरत जाधव, तसेच स्थागुशावे सपोनि किशोर जोशी, पोउनि दत्ता कांभिरे, पोलीस अंमलदार माधव साळे, धनंजय शिलावटे, प्रविण काकड, विशाल आव्हाड, रावसाहेब कांबळे, प्रितम लोखंडे, श्रीकांत गारूंगे, सागर काकड, शैलेश गांगुर्डे, गोरक्षनाथ संवत्सरकर, योगिला काकड, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, केतन कापसे, दत्ता माळी, हरिष माळी, अमोल गांगुर्डे यांचे पथकाने वरील घरफोडीचा क्लिष्ट स्वरुपाचा गुन्हा उघडकीस आणून कामगिरी केली आहे.
नाशिक : नाशिक ग्रामीण जिल्हयातील मोटर सायकल चोरीचे वाढत्या गुन्हयांना प्रतिबंध होण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील यांनी नाउघड गुन्हयांचा आढावा घेवून कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्याअनूषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने मोटर सायकल चोरीचे गुन्हयांतील आरोपींचे सध्याचे वास्तव्याबाबत तसेच चोरीच्या मोटर सायकल कोठे विक्री केल्या जातात याबाबत सविस्तर सर्विस्तर माहिती घेवून सिन्नर तालुक्यातील मोटर सायकल चोरांना ताब्यात घेवून कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र मगर यांचे पथकातील अंमलदार हे नाउघड मोटर सायकल चोरीचे गुन्हयांचा समांतर तपास करीत असतांना, गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सिन्नर तालुक्यातील पांदुर्ली गावचे शिवारात काही संशयीत चोरीच्या मोटर सायकल विक्री करण्याचे उद्देशाने येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. त्यावरून पोलीस पथकाने सिन्नर पोलीस ठाणे हददीतील पांदुर्ली चौफुली परिसरात सापळा रचुन खालील संशयीतांना ताब्यात घेतले आहे. १) अजय दत्तात्रय दळवी, वय २१, रा. विंचुरदळवी, भावदेवाडी, ता. सिन्नर, जि. नाशिक २) अनिकेत श्रीधर मानकर, वय २४, रा. राहुरी, भगुर-पांदुर्ली रोड, ता.जि. नाशिक ताब्यात घेतलेले वरील संशयीतांचे कब्जात मिळून आलेल्या बजाज पल्सर मोटर सायकलचे कागदपत्रांबाबत विचारपूस केली असता, त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यांना विश्वासात घेवून सखोल चौकशी केली असता त्यांनी व त्यांचा साथीदार नामे ३) चेतन उर्फ सख्या नामदेव शेळके, रा. विंचुर दळवी, ता. सिन्नर (फरार ) अशांनी मिळून सदरची मोटर सायकल चिंचोली ता. सिन्नर येथुन चोरी केल्याची कबुली दिली आहे. यातील ताब्यात घेतलेले वरील आरोपी क. १ ते २ यांचेकडे मोटर सायकल चोरीचे गुन्हयांचे समांतर तपासात अधिक चौकशी केली असता त्यांनी सिन्नर तालुक्यातील चिंचोली, सिन्नर शहर, कुंदेवाडी, दोडी, तसेच घोटी, वणी, संगमनेर, श्रीरामपुर परिसरातून एकुण १० मोटर सायकली चोरी केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपींनी कबुली दिल्यावरून मोटर सायकल चोरीचे खालीलप्रमाणे ०७ गुन्हे उघडकीस आलेले आहे. १) सिन्नर पो. स्टे. गुरनं ३३३/२०२४ भा.द.वि. कलम ३७९. २) वावी पो. स्टे. गुरनं २५०/२०२५ भा. न्या. सं. कलम ३०३ (२). ३) संगमनेर शहर पो. स्टे. जिल्हा अहिल्यानगर, गुरनं ६९७/२०२४ भा. न्या.सं. कलम ३०३ (२). ४) वणी पो. स्टे. गुरनं १९२/२०२४ भा.द.वि. कलम ३. ५) वावी पो. स्टे. गुरनं ३०/२०२४ भा.द.वि. कलम ३७९. ६) घोटी पो. स्टे. गुरनं ६३/२०२४ भा.द.वि. कलम ३७९. ७) श्रीरामपुर शहर पो. स्टे. जिल्हा अहिल्यानगर गुरनं ५१२/२०२५ भा. न्या.सं. कलम ३०३ (२). यातील ताब्यात घेतलेले आरोपींचे कब्जातुन वरील गुन्हयांमध्ये चोरीस गेलेल्या ०४ हिरो स्प्लेंडर, ०१ बजाज २२० पल्सर, ०१ बजाज प्लॅटीना, ०२ बजाज पल्सर, ०१ रॉयल इनफिल्ड बुलेट, ०१ होण्डा युनिकॉर्न अशा एकूण चोरीच्या १० मोटर सायकल किं. रु. ०८ लाख ३५ हजार चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर आरोपींना सिन्नर पोलीस स्टेशनकडील गुरनं ३३३/२०२४ भा.द. वि.क. ३७९ या गुन्हयात अटक अट करण्यात आली असून त्यांचेकडून मोटर सायकल चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. यातील फरार आरोपी चेतन उर्फ सख्या नामदेव शेळके हा अभिलेखावरील गुन्हेगार असुन तो सिन्नर पो. स्टे. कडील भादवि कलम ३७६ सह पॉक्सो कायद्यान्वये दाखल असलेले गुन्हयात सुमारे ०३ वर्षांपासून मध्यवर्ती कारागृहात होता, जामीनावर सुटल्यानंतर त्याने त्याचे वरील वरील साथीदारांसह मोटर सायकल चोरीचे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून पोलीस पथक त्याचा कस चा कसोशिने शोध घेत आहे. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र मगर, सपोउनिरीक्षक नवनाथ सानप, पोलीस अंमलदार विनोद टिळे, नवनाथ शिरोळे, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम यांचे पथकाने मोटर सायकल चोरीचे ०७ गुन्हे उघडकीस आणुन चोरीच्या १० मोटर सायकल हस्तगत केल्या आहे.
कोल्हापूर : आज, १५ जून २०२५ रोजी कोल्हापूर जिल्ह्यात पेरणीच्या दृष्टीने दिलासादायक वातावरण झाले असून जिल्ह्यात पावसाने चांगली हजेरी लावली असून, पेरणीयोग्य स्थिती आहे.कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे, ज्यामुळे पेरणीसाठी चांगली परिस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी, विशेषतः घाट परिसरात, जोरदार पावसाची शक्यता असल्यामुळे बळीराजाने पेरणीला सुरुवात केली आहे. जिल्ह्यात भातशेतीची पेरणी अजूनही काही ठिकाणी पूर्ण झालेली नाही, पण पावसाने साथ दिल्यास लवकरच पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी ‘युनिक फार्मर आयडी’ योजना सुरू करण्यात आली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ घेणे सोपे होणार आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेती आणि घरांचे नुकसान झाले आहे, त्यामुळे प्रशासनाने योग्य ती मदत करण्याची तयारी दर्शविली आहे. हवामान विभागाने १५ जूनपर्यंत पेरणीसाठी वाट पाहण्याचा सल्ला दिला होता, त्यानुसार आता अनेक ठिकाणी पेरणीस सुरुवात झाली आहे. शासनाच्या विविध योजना आणि मदतीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. एकंदरीत, कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी बळीराजा पेरणीच्या कामात व्यस्त असून, पावसाने चांगली साथ दिल्याने दिलासा मिळाला आहे. सुरू झालेल्या पावसामुळे पेरणीसाठी बी बियाणे खते खरेदीसाठी कोल्हापूर शहरातील शाहूपुरी येथील व्यापारी पेठेतील सर्व कृषी सेवा केंद्रात बळीराजांनी केली गर्दी
कोल्हापूर : पुणे बेंगलोर नॅशनल हायवे 48 या महामार्गाचे सध्या काम सुरू असून शनिवार 14 जून रोजी अंबप फाटा ,टोप व नागाव फाटा यादरम्यान उड्डाणपूलाचे काम सुरू असलेने साईड पट्टीवरून वळण रस्ता सुरू केला असल्याने सदरचा रस्ता हा अरुंद झाला असून अवजड वाहने वाहतूक करत असताना वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे आज ही या ठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती काही काळ वाहतूक थांबली होती या ठिकाणी महामार्ग वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ येऊन सदरची वाहतूक पुन्हा सुरू करून दिली अशा घटना वारंवार या महामार्गावरती घडत आहेत गेली दोन वर्षे झाली या महामार्कागाचे काम सुरू झाले असून महामार्गाच्या दोन्ही बाजूस अर्धवट कामे बंद अवस्थेत दिसतआहेत त्यामुळे या महामार्गावरती वारंवार अपघात ही होत आहेत कोणत्याही एका बाजूने महामार्गाचे काम पूर्ण झालेले दिसत नाही किणी टोल नाका ते कोगणोळी टोल नाका दरम्यान या महामार्गाचे काम सध्या बंद असल्याचे दिसत आहे शेजारच्या कर्नाटक राज्यामध्ये या महामार्गाचे काम जलद गतीने पूर्ण होत असलेचे दिसत आहे या महामार्गाचे काम जलद गतीने पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग व राज्य सरकारने लक्ष घालावे अशी मागणी सामान्य नागरिक व वाहन चालकाकडून केली जात आहे.
किसानों की समस्याओ को लेकर कांग्रेस नेता सोपान कोहले ने तहसील कार्यालय सौसर में सैकडो किसान भाईयों के साथ किया सांकेतिक धरना प्रदर्शन ➖➖➖➖➖ आज दिनांक 12/06/25 को तहसील कार्यालय सौसर में किसानों की निम्न मांगों को लेकर कांग्रेस नेता सोपान कोहले द्वारा किसानों के साथ सांकेतिक धरना देकर विरोध प्रदर्शन किया।
1 सौसर विधानसभा में सेवा सहकारी समितियों द्वारा जिन किसानों का के,सी,सी खाता रनिंग है उन्हीं किसानों को खाद दिया जा रहा है हमारी मांग है समस्त किसानों को जिनके खाते ओवर डिव है उनको भी और जिनके खाते नहीं है उनको भी पर्याप्त रूप से नगद खाद उपलब्ध कराई जाए। 2 इस वर्ष रबी की फसल मूंग तथा मूंगफली का रकबा बढा है किसानों के हित मे तत्काल शासन द्वारा समर्थन मूल्य पर सौसर कृषि उपज मंडी में शासकीय खरीदीं प्रारंभ की जाएं। उक्त मांगों को लेकर सौसर विधानसभा के किसान भाईयों के साथ कांग्रेस नेता सोपान कोहले तहसील कार्यालय में धरने पर बैठे तत्पश्चात सौसर एस डी एम महोदय को ज्ञापन प्रस्तुत किया गया एस डी एम महोदय द्वारा उक्त मांगों को लेकर मंडी इंस्पेक्टर तथा सेवा सहकारी समिति प्रबंधक महोदय से दुरभाष पर बात की तथा उक्त मांगो को सरकार को अवगत कराने का आश्वासन दिया तत्पश्चात धरना प्रदर्शन समाप्त हुआ। किसानों द्वारा एक सुर में कहा मांगे पुरी नहीं हुई तो हमें उग्र आंदोलन करने बाध्य होना पड़ेगा।
उक्त धरना प्रदर्शन में – किसान नेता विक्की कालबाडे सामाजिक नेता विजय घाटौड निवृत्ति कोहले मेघराज उइके युवराज पराड़कर प्रेमराज गजभिए मानिक धुर्वे रामजी बनके महेश पगारे राजेन्द्र इगोले संजय धुर्वे आभिनय चौरे कोमल भालेराव रत्नाकर ठाकरे मयुर फोले सुरेश धुरबाडे रामदास इगोले योगेश बनाईत संदीप धान्डे संजय पावनकर मोतीलाल धुर्वे ज्ञानलाल कुमरे आदित्य फोले भुषण चौरे सुखलाल भलावी सुरेश पराड़कर संतोष सरयाम भाऊराव धुर्वे अशोक कोघे शरद इगोले विनायक किनकर इदल कोरडे विक्की मानकर सुनील सिलु मनिष सोमकुवर देवराव सेवतकर राजु सोमकुंवर एवं साथी उपस्थित थे।
कोल्हापूर : ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाटासह कोल्हापुरात गुरुवारी १२ जून सायंकाळी ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. जवळपास अर्धा तास पावसाने कोल्हापूर आणि परिसराला झोडपून काढले. गटारी व नाले भरुन पावसाचे पाणी रस्त्यावर पसरले. सखल भागात आणि रस्त्यावर पाणीच पाणी असे चित्र निर्माण झाले. ढगफुटीसदृश्य पावसामुळे काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली. सांय चार वाजण्याच्या जोरदार पावसाला सुरुवात झाली. ढगांचा गडगडाट होता. जोरदार पावसामुळे सगळीकडे पाणी साचले. शहरातील अनेक भागात घरात पाणी शिरले. झाडाच्या फांद्या मोडून वाहनावर पडल्याने दुचाकी व चारचाकीचे नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. पावसामुळे फेरीवाले, विक्रेत्यांची तारांबळ उडाली. वीज पुरवठाही काही वेळ खंडित करण्यात आला होता. पाचनंतर पावसाचा जोर ओसरला. तर १२ते १७ जूनपर्यंत महाराष्ट्रात जोरदार पावसाची हजेरी लागणार असल्याची माहिती भारतीय हवामान केंद्राच्या प्रादेशिक हवामान केंद्रानुसार, मिळाली नैऋत्य मौसमी पावसाने आता मुंबईसह अहिल्यानगरचा पट्टा व्यापला आहे .आता मान्सून पूर्वेकडील भागात म्हणजे विदर्भ ,छत्तीसगड ,ओडिसा या भागात येथे 48 तासात व्यापणार आहे .बंगालच्या उपसागरात दक्षिणेकडील भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय असल्याने कर्नाटका छत्तीसगड मराठवाडा तसेच कर्नाटकातील अंतर्गत भागात पावसाचा जोर वाढणार आहे . १२ ते १७ जून पर्यंत महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाची हजेरी राहणार असल्याचे सांगण्यात आलाय .कोकण मध्य महाराष्ट्रात तीव्र व अति तीव्र पावसाची हजेरी लागणार असून आजपासून पुढील तीन दिवस म्हणजेच १५ जून पर्यंत कोकणपट्ट्यात जोरदार पाऊस पडणार असल्याचं हवामान विभागाने सांगितला आहे .यावेळी वाऱ्याचा वेग ५० ते ६० किलोमीटर प्रति तास राहणार असून सोसाट्याच्या वाऱ्यासह ढगांचा गडगडाट व विजा पडण्याची शक्यता आहे .कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या दोन दिवसात प्रचंड पावसाची शक्यता आहे . पावसाचे तीव्र अलर्ट पुढील दोन दिवस हवामान विभागाने पावसाचे तीव्र अलर्ट दिले असून तळ कोकणासह दक्षिण मध्य महाराष्ट्रात रेड ऑरेंज अलर्ट देण्यात आले आहेत .विदर्भातही पावसाचा जोर येत्या काही दिवसात वाढणार आहे .दरम्यान मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण आहे .काही भागात हलक्या पावसाला सुरुवात झाली आहे
यह शिकायत भाजपा मंडल अध्यक्ष दर्शन झाड़े जी, प्रभाकर बोबडे जी तथा महामंत्री आशीष चांडक जी के नेतृत्व में प्रस्तुत की गई। इसके साथ ही उक्त शिकायत की प्रतिलिपि अनुविभागीय अधिकारी पुलिस सौसर, पांढुर्ना जिला अतिरिक्त पुलिस अधीक्षक एवं पुलिस अधीक्षक को भी प्रेषित की गई है।
सौसर के व्हाट्सएप ग्रुप में पंकज ठाकरे द्वारा देश के यशस्वी प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी जी के विरुद्ध अशोभनीय और आपत्तिजनक शब्दों का प्रयोग कर टिप्पणी की गई। इस घटनाक्रम के विरोध में भाजपा कार्यकर्ताओं ने तीव्र आक्रोश व्यक्त करते हुए सौसर नगर निरीक्षक महोदय को लिखित शिकायत सौंपी।
भाजपा कार्यकर्ताओं ने स्पष्ट किया कि पंकज ठाकरे द्वारा विगत कुछ महीनों से लगातार प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के संबंध में अमर्यादित टिप्पणियां की जा रही हैं। परंतु इस बार सभी सीमाएं लांघते हुए अत्यंत अशोभनीय भाषा का उपयोग किया गया है, जिसे भाजपा विधानसभा सौसर किसी भी परिस्थिति में सहन नहीं करेगी। भाजपा ने प्रशासन से मांग की है कि पंकज ठाकरे के विरुद्ध कठोर से कठोर कार्यवाही की जाए।
इस अवसर पर मुख्य रूप से उपस्थित गणमान्य कार्यकर्ता – देवेंद्र गायकवाड़ जी, दिनेश रायकवार जी, हरिदास धुर्वे जी, प्रवीण सेलूकर जी, परसराम राणे जी, मनोज जाने जी, खेमराज सोनकर जी, विवेक गायकवाड़ जी, अविनाश ठाकरे, शुभम वैवतकार जी आदी कार्यकर्ते उपस्थित होते।
भाजपा ने दोटूक शब्दों में स्पष्ट किया कि देश के प्रधानमंत्री के मान-सम्मान पर हमला बर्दाश्त नहीं किया जाएगा और लोकतांत्रिक मर्यादाओं का उल्लंघन करने वालों को कानून के माध्यम से सबक सिखाया जाएगा।