मुंबई : (विशेष प्रतिनिधी),
राष्ट्रीय अपराध ज्यांच ब्युरो नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य शाखा मुंबई के जॉईंट डायरेक्टर पंधरा वर्षे से अच्छा कार्य निभाते हुए,प्रमोशन मिला I *नागरी सुरक्षा हक्क परिषद CRPC* राज्य संचालक पद के लिये डायरेक्टर जनरल मा. सुरेशजी शुक्ला साहब ने प्रमोशन देकर नियुक्ती किये I इसलिये महाराष्ट्र राज्य शाखा जिल्हा लातूर NCIB के डिस्ट्रिक्ट डायरेक्टर शिरीषकुमार शेरखाने सरने देवेंद्रजी वखारिया साहब का शाल श्रीफळ पुष्पगुच्छ और स्वीट देकर स्वागत किया I और आगे अच्छे काम के लिए शुभकामना दिये I
मालेगाव शहरात फायर करून प्राणघातक हल्ला करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद देशी बनावटीचे पिस्तूल व ०५ जिवंत काडतुसे हस्तगत स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

नाशिक: प्रतिनिधी संतोष रायचंदे मालेगाव शहरातील पवारवाडी पोलीस ठाणे येथे गुरनं १६३/२०२५ भा. न्या. सं. कलम १०९, ३५२, ३५१ (२) (३), सह भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५, २७ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयातील फिर्यादी अनिस अहमद शकिल अहमद, रा. के. जी. एन. नगर, मालेगाव यांनी त्यांचा भाऊ अख्तर काल्या उर्फ शाहीद अख्तर शकिल अहमद यास त्याचे इतर इसमांशी झालेल्या भांडणात मदत केली नाही, या कारणावरून कुरापत काढून फिर्यादी अनिस अहमद यांना शिवीगाळ करून “आज तुझे जानसे मार दूंगा” असे म्हणुन आरोपी अख्तर काल्या याने त्याचे हातातील गावठी कट्टा फिर्यादीचे दिशेने धरून फिर्यादीस जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने राऊंड फायर केले, त्यात एक राऊंड फिर्यादीचे डाव्या पायाचे गुडघ्याला लागुन त्यांना गंभीर दुखापत केली म्हणून गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हा केल्यानंतर यातील आरोपी अख्तर काल्या व त्याचे साथीदार हे फरार झाले होते.
सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री. तेगबीर सिंह संधू, उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव कॅम्प विभाग श्री. सुरज गुंजाळ यांनी यातील आरोपीतास तात्काळ अटक करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा व पवारवाडी पोलीसांचे पथक रवाना केले होते. सदर घटना घडल्यानंतर यातील आरोपी अस्तर काल्या याने त्याचे इतर साथीदारांसह मालेगाव शहरातून पलायन केले होते, त्यानुसार स्थागुशाचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र मगर यांना खब-यांमार्फत मिळालेल्या बातमीनुसार यातील फरार आरोपी हा चाळीसगाव शहरात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यावरून स्थागुशाचे पथकाने वरील गुन्हयाचे समांतर तपासात चाळीसगाव शहरातून यातील सराईत गुन्हेगार अख्तर काल्या उर्फ शाहीद अख्तर शकिल अहमद, वय ४०, 1. के. जी. एन. नगर, मालेगाव, ता. मालेगाव, जि. नाशिक यास ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेवुन चौकशी केली असता, दि.२४/०६/२०२५ रोजी फार्मसी कॉलेज परिसरात त्यास मालेगावातील शफिक उर्फ जॉली दादा यावे इतर ०३ साथीदारांनी मागील भांडणाची कुरापत काढून मारहाण करून चाकुने वार करून जखमी केले होते. सदर भांडण झाल्यानंतर आरोपी अख्तर काल्या याचा मोठा भाऊ अनिस अहमद याने त्यास मदत केली नाही याचा राग मनात धरून त्याचेवर गावठी कट्टयामधून फायर केल्याची कबुली दिली आहे.
यातील आरोपी अख्तर काल्या उर्फ शाहीद अख्तर शकिल अहमद याचे अंगझडतीमधुन एक देशी बनावटीचे गावठी पिस्तूल व ०५ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आले आहे. त्यास वरील गुन्हयाचे पुढील तपासकामी पवारवाडी पोलीस ठाणेस हजर करण्यात आले आहे. सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असुन त्यावेवर यापुर्वी मालेगाव शहरातील पवारवाडी, आझादनगर, मालेगाव शहर पोलीस ठाण्यांमध्ये दरोडा तयारी, आर्म अॅक्ट, खंडणी, प्राणघातक हल्ला, दंगा, दुखापत यासारखे गंभीर स्वरूपाचे एकुण ११ गुन्हे दाखल आहेत.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री. तेगबीर सिंह संधू, उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव कॅम्प विभाग श्री. सुरज गुंजाळ यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थामिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र मगर, पोउनि दत्ता कांभीरे, पोलीस अंमलदार सचिन धारणकर, गोरक्षनाथ संवत्सरकर, शरद मोगल, सचिन वराडे, संदिप राठोड, योगेश कोळी, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम यांचे पथकाने यातील आरोपीस ताब्यात घेवुन घातक अग्निशस्त्र हस्तगत केले आहे.
मालेगावातील सुजन टॉकीज परिसरात झालेल्या खुनाचा १२ तासात उलगडा नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी.

.
नाशिक : प्रतिनिधी संतोष रायचंदे
दि. २६/०६/२०२५ रोजी मालेगाव छावणी पोलीस ठाणे हद्दीत जुना आग्रा रोड परिसरातील सुजन टॉकिजचे आवारात मोकळे जागी एक २५ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळुन आला होता. सदरसा मृतदेह हा युवक नामे अमोल मोहन निकम २५, एकता नगर, गवळीवाडा, मालेगाव यांचा असलेचे तपासात निष्पन्न झाले होते. यातील मयतास कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी रुमालाने (गमछाने) गळा आवळून जिवे ठार मारले म्हणून मालेगाव छावणी पोलीस ठाणे गुरनं १६९/२०२५ भा.न्या
स.कलम १०३(१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंह संधू, उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव कॅम्प विभाग श्री. सुरज गुंजाळ यांनी सदर घटनेचा आढावा घेवुन नमुद खुनाचा गुन्हा उघडकीस आणणेसाठी तपास पथकांना सुचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र मगर यांचे पथकाने घटनास्थळाची बारकाईने पाहणी करुन यातील मयत इसन नामे अमोल मोहन निकम, वय २५, रा. एकता नगर, गवळीवाडा, मालेगाव याचे दैनंदिन कामकाज व राहणीमानबाबत गुप्त बातमीदारांकडे माहिती घेतली. घटनेच्या दिवशी सायंकाळचे सुमारास मयत हा एका मोटर सायकलवर बसुन गेला असल्याचे समजले होते तसेच मयत हा शेवटचा कोणास भेटला याबाबत सविस्तर माहिती घेवुन, तासाची चक्रे फिरवुन स्थानिक गुन्हे शाखेतचे पथकाने संशयीत नामे विशाल मारूती गवळी, वय ३८, रा.एच.पी. गॅस गोडाऊन समोर, कैलास नगर, मालेगाव यास ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेवुन वरील खुनाचे गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी केली असता, यातील मयत अमोल निकम याने आरोपी विशाल गवळी यास शिवीगाळ करुन आपआपसात वाद झाल्याचा राग मनात धरून, भगव्या रंगाचे रुमालाने (गमछाने) मयताचा गळा आवळून जिवे ठार मारले असल्याबाबत कबुली दिली आहे. सदर आरोपीस गुन्हयाचे पुढील तपासकामी मालेगाव छावनी पोलीस ठाणेस हजर करण्यात आले असुन पुढील तपास चालु आहे.
नाशिक ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री. तेगबीर सिंह संधू, उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव कॅम्प विभाग श्री. सुरज गुंजाळ यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रविंद्र मगर, पोउनि दत्ता कांभीरे, पोउनि सुदर्शन बोडके, सपोउनि नवनाथ सानप, पोलीस अंमलदार सचिन धारणकर , गोरक्षनाथ संवत्सरकर, शरद मोगल, गिरीष निकुंभ, नरेंद्र कोळी, योगेश कोळी, संदिप राठोड, विनोद टिळे, नवनाथ शिरोळे, हेमंत गिलबिले,प्रदिप बहिरम यांचे पथकाने वरील खुनाचा गुन्हा उघडकीस आणुन कामगीरी केली आहे.
मालेगावातील मोटर सायकल चोरी करणारे चोरटे स्थानिक गुन्हे शाखेचे जाळयात चोरीच्या ११ मोटर सायकल हस्तगत

नाशिक: प्रतिनिधी संतोष रायचंदे
नाशिक ग्रामीण जिल्हयातील मोटर सायकल चोरीचे वाढत्या गुन्हयांना प्रतिबंध होण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील यांनी नाउघड गुन्हयांचा आढावा घेवून कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्याअनुयंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने मोटर सायकल चोरीचे गुन्हयांतील आरोपीचे सध्याचे वास्तव्याबाबत तसेच चोरीच्या मोटर सायकल कोठे विक्री केल्या जातात याबाबत सविस्तर माहिती घेवून मालेगाव शहरातील मोटर सायकल चोरांना ताब्यात घेवून कारवाई केली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र मगर यांचे पथकातील अधिकारी व अंमलदार हे नाउघड मोटर सायकल चोरीचे गुन्हयांचा समांतर तपास करीत असतांना, गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मालेगाव शहर व नाशिक जिल्हयातील खेडोपाडयांमधून चोरी केलेल्या मोटर सायकल कमी किंमतीचे भावात विकी करण्यासाठी काही संशयीत मालेगाव तालुक्यातील सोयगाव येथे येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती. त्यावरून पोलीस पथकाने सोयगाव, ता. मालेगाव परिसरात सापळा रचुन खालील संशयीतांना ताब्यात घेतले आहे.
१) संदीप सोमनाथ वाघ, वय २१, रा. नव-वसाहत, सोयगाव, ता. मालेगाव
२) पवन निवृत्ती कदम, वय २०, रा. मु. मळगाव, पो. गिरणा डॅम तालुका , ता. नांदगाव, हल्ली विसे मळा, कॉलेजरोड, नाशिक
३) विधीसंघर्षिग्रस्त, रा. लाडगाव, मालुंजे, ता. श्रीरामपुर, जि. अहिल्यानगर
४) नदिम अहमद नासीर अहमद, रा. करीम नगर, मालेगाव (फरार)
ताब्यात घेतलेले वरील संशयीतांचे कब्जात मिळून आलेल्या होण्डा युनिकॉर्न मोटर सायकलचे कागदपत्रांबाबत विचारपुस केली असता, त्यांनी उड़वा उडवीची उत्तरे दिली, त्यांना विश्वासात घेवून सखोल चौकशी केली असता त्यांनी सदरची मोटर सायकल पवारवाडी, मालेगाव परिसरातुन चोरी केल्याची कबुली दिली आहे.
यातील ताब्यात घेतलेले वरील आरोपी क. १ ते २ यांचेकडे मोटर सायकल चोरीचे गुन्हयांचे समांतर तपासात अधिक चौकशी केली असता त्यांनी मालेगाव, सटाणा, कळवण, तसेच नाशिक शहर व जिल्यातील खेडोपाड्यांमधुन एकुण ११ मोटर सायकली चोरी केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपीनी कबुली दिल्यावरून पवारवाडी पोलीस ठाणेकडील गुरनं १५८/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०३(२) प्रमाणे दाखल असलेला गुन्हा उपडकीस आलेला आहे.
यातील ताब्यात घेतलेले आरोपीचे कब्जातुन चोरीच्या ०३ हिरो स्प्लेंडर, ०२ होण्डा युनिकॉर्न, ०१ हिरो एचएफ डिलक्स, ०१ यामाहा आरएक्स १००, ०१ होण्डा शाईन, ०१ सुझुकी अॅक्सेस ०१ पेंशन प्रो., ०१ हिरो ड्युएट अशा एकूण चोरीच्या ११ मोटर सायकल किं. रु. ०४ लाख ६० हजार वा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर आरोपींना पवारवाडी पोलीस स्टेशनकडील वरील गुन्हयात अटक करण्यात आली असून त्यांचेकडून मोटर सायकल चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
मोटर सायकल चोरीचे गुन्हयांमधील अभिलेखावरील आरोपीतांचे सध्याचे ठाव ठिकाणांबाबत माहिती काढण्यास पोलीस पथकांना सुचना देण्यात आलेल्या असून यापुढेही वरीलप्रमाणे सत्वर कारवाई करण्यात येणार आहे.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. आदित्य मिरखेलकर, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री. तेगबीर सिंह संधू यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र मगर, पोउनि दत्ता कांभीरे, पोउनि सुदर्शन बोडके, सपोउनि नवनाय सानप, पोलीस अंमलदार सुभाष चोपडा, दिपक गुंजाळ, विनोद टिळे, विशाल गोसावी, नवनाथ शिरोळे, किरण बैरागी, कैलास मानकर, दत्तात्रय माळी, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम यांचे पथकाने चोरीच्या ११ मोटर सायकल हस्तगत बा
करून कामगिरी केली आहे.
पिंपळगाव बसवंत परिसरात अवैधरित्या गांजाची विक्री करणारे इसमावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा २३ किलो ६१० ग्रॅम वजनावा गांजा जप्त

नाशिक: प्नतिनीधी संतोष रायचंदे नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. बापाटील यांनी अशीत केल्याप्रमाणे, जिल्हयातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन तसेच सराईत गुन्हेगारीस प्रतिबंध होण्यासाठी सत्वर कारवाई करणयात येत आहे. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र मगर यांचे पथकाने पिंपळगाव पोलीस ठाणे हद्दीत अवैधरित्या अंमली पदार्थ गांजावी विक्री करणारे इसमावर छापा टाकून कारवाई केली आहे.
दिनांक २५/०६/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र मगर यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार पिंपळगाव शहरातील रोड परिसरात एक इसम हा अवैधरित्या अंमली पदार्थ विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हा शाखेचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी टाकून अंमली पदार्थ गांजाची अवैधरित्या विक्री करणारा इसम नामे अनिकेत संदिप खैरनार, वय २२, रा. उंबरखेड रोड, भावनगर, पिंपळगाव बसवंत, ता. निफाड, जि. नाशिक यास ताब्यात घेवून त्यातून किं. ४,७२,२००/- या २३ किलो ६१० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. सदर इसम हा विनापरवाना बेकायदेशीररित्या मानवी मनावर विपरीत परिणाम करणारा गांजा नावाचा अंमली पदार्थ कब्जात बाळगुन विक्री करतांना मिळुन आला असून त्याचे विरूद्ध पिंपळगाव पोलीस ठाणेस एन.डी.पी.एल. कायदा कलम ८ (क), २०(ब) ||(ब) प्रमाणे गुन्हा करण्यात आला अहे.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री. आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सुचनां प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र मगर, पोउनि प्रकाश भालेराव पोलीस अंमलदार नवनाथ वाघमोडे, संदिप नागपुरे,सतिष जगताप, किशोर खराटे, सतिष घुटे, विश्वनाथ धारबळे, योगिता काकड, किशोर बोडके, बालाजी कुंटेवाड, चापोहवा संतोष पाटील, तानाजी झुरडे यांचे पथकाने वरील प्रमाणे कारवाई केली आहे.
डिजिटल ॲरेस्ट मधील ऑनलाईन फसवणुकीचे ३ लाख २२ हजार रूपये तक्रारदारास परत
नाशिक: प्नतिनीधी संतोष रियचंदे नाशिक ग्रामीण सायबर पोलीसांची कामगिरी
तकारदार श्री. सुरज भाउसाहेब काळे, रा. टाकाळी विदुर, लासलगाव, ता. निफाड, जिल्हा नाशिक यांना आरोपीनी संपर्क करून Fedx Branch जिल्हा अंधेरी येथुन बोलत आहे, असे सांगुन तुमच्या नावे एक पार्सल प्राप्त झाले असुन त्या मध्ये बेकायदेशीर सामान पाठविण्यात आले असुन त्यात ०४ ईराणी पासपोर्ट व ड्रग्स आणले आहे असे सांगुन तक्रारदार यांना स्काईप या ऑप्लीकेशनव्दारे रेटटमेंट व व्हेरीफिकेशन साठी पोलीस गणवेशात व्हिडीओ कॉल केला व Digital Arrest ची धमकी देवुन तकारदार यांचे बँक खात्याची गोपनीय माहीती प्राप्त करून त्यांचे बँक खात्यावरून १० लाख रूपये पर्सनल लोन मंजुर करून ते पुढे आरोपीतांनी RTGS व्दारे त्यांचे बँक खात्यात वळवुन तक्रारदार यांची फसवणुक केली आहे.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे नाशिक ग्रामीण सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, पोलीस निरीक्षक श्री. नागेश मोहिते व मपोहवा १५८७ सुवर्णा आहिरे यांनी वरील तक्रारीची तात्काळ दखल घेवुन बँकेला पत्रव्यवहार करून सदरचे खाते गोठविण्यात आले व त्यावर शिल्लक असलेली ३,२२,०००/- हआर रक्कम तकारदार यांना मा. व्यायालयाचे आदेशाने परत मिळवुन देण्यात आली आहे.
नागरिकांना आवाहन:-
याव्दारे नाशिक ग्रामीण जिल्हयातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपण अनोळखी फोन कॉल्सवर विश्वास ठेवून आपल्या बँक खात्याची वैयक्तीक माहिती अनोळखी व्यक्तीस देऊ नये. कोणतीही बँक अशा प्रकारची माहिती फोनद्वारे विचारत नाही. बैंक खात्याविषयी माहिती करीता संबंधीत बँकेच्या शाखेत जाऊन खात्री करावी, तसेब फोनवर पाठविण्यात आलेल्या अनोळखी लिंक विषयी माहिती नसल्यास त्यावर क्लिक करू नये. आपल्या नावे कोणते पार्सल आले आहे. किंवा मनीलॉड्रीग असे आहे. अशा बाबत कोषताही फोन आल्यास विश्वास ठेवु नये Digital Arrest बाबत Cyber Police Station किंवा नजीकच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधावा तसेच आपली गोपनीय माहीती (बँक खाते नंबर, ओटीपी) देवु नये. आपल्या बरोबर अशी कोणत्याही प्रकारची फसवणुक झाल्यास लागलीच जवळील पोलीस स्टेशनला किंवा सायबर पोलीस स्टेशनला संपर्क साधावा, अथवा सायबर हेल्पलाईन कमांक १९३० किंवा १९४५ तसेच सायबर काईम पोर्टल cybercrime.gov.in यावर तकार नोंदवावी.
नाशिक ग्रामीण सायबर पोलीस स्टेशन कमांक फोन नं.०२५३-२२००५०८
F.Mail-cybercrime.ur@mahapolice.gov.in
मुसळधार पावसामुळे कोल्हापूरची पंचगंगा नदी पात्रा बाहेर

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होत आहे. पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी २९ फुटांवर पोहोचली असून यामुळं पंचगंगा नदीचे पाणी यंदा पहिल्यांदाच पात्राबाहेर पडले आहे. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील २४ बंधारे सध्या पाण्याखाली गेले आहेत. या मार्गावरील वाहतूक प्रशासनानं बंद केली असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचं चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.
लघु पाटबंधारे प्रकल्प १०० टक्के भरले : राधानगरी धरणातून ३१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या भोगावती नदीपात्रात सुरू आहे. परिणामी कोल्हापूरची वरदायिनी असलेल्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होताना दिसून येत आहे. राधानगरी धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरण ६३ टक्के भरलं आहे. जिल्ह्यातील अनेक लघु पाटबंधारे प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. यामध्ये गगनबावडा तालुक्यातील अकनूर आणि कोगे धरणाचा समावेश असून नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ होत आहे. जिल्ह्यातील पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, सुर्वे, राजापूर, रुई, इचलकरंजी तेरवाड, शिरोळ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कुंभी नदीवरील सांगशी, कासारी नदीवरील ठाणे आळवे, यवलुज बंधाऱ्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असून भोगावती नदीवरील हळदी राशिवडे, शिरगाव, कोगे दुधगंगा नदीवरील दत्तवाड यासह जिल्ह्यातील २५ बंधारे सध्या पाण्याखाली आहेत.
राधानगरी धरण ७३ टक्के भरले, विसर्ग सुरू कोल्हापूर जिल्ह्यातील महत्त्वाचं धरण असलेलं या धरणातून विसर्ग भोगावती नदीपात्रात केला जात आहे. यामुळं जिल्हा प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सोमवारी मध्यरात्री कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्यामुळं आज दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान पंचगंगा नदी यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच पात्राबाहेर पडली. राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगा नदीची पाणी पातळी २९ फूट ११ इंच इतकी नोंदली गेली असून पंचगंगा नदीची इशारा पातळी ३९ फूट तर धोका पातळी ४३ फूट इतकी आहे. जिल्ह्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष सज्ज असल्याचं माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने दिली आहे.
७ जुलै रोजी आझाद मैदानात संत कक्कय्या समाजाचे धरणे आंदोलनासाठी लातूर येथे बैठकीचे आयोजन
७ जुलै रोजी आझाद मैदानात संत कक्कय्या समाजाचे धरणे आंदोलनासाठी लातूर येथे बैठकीचे आयोजन
लातूर:- संत कक्कय्या समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावे, या मागणीसाठी आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी वीरशैव कक्कय्या कल्याण मंडळ, मुंबई यांच्या वतीने सोमवार, दि. ७ जुलै २०२५ रोजी आझाद मैदान येथे एक दिवसीय धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
संत कक्कय्या समाजाच्या महामंडळ स्थापनेच्या मागणीसाठी यापूर्वीही २८ जून २०२४ रोजी आंदोलन करण्यात आले होते. त्या आंदोलनाला राज्यभरातील समाजबांधव, भगिनी, संस्था, महासंघ आणि संघटनांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात समाजाला महामंडळ देण्याचे जाहीर आश्वासन दिले होते. मात्र, त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही.
कल्याण मंडळाचे पदाधिकारी सातत्याने प्रशासनाशी संपर्कात राहून पाठपुरावा करत आहेत. अधिवेशनानंतर निवडणुका जाहीर झाल्या, मंत्रिमंडळ बदल झाला, परंतु शासन निर्णय मात्र अद्याप पारित झालेला नाही.
मागील महिन्याभरात कल्याण मंडळाने समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट व त्यांच्या सचिवांशी चर्चा करून पाठपुरावा सुरू ठेवला आहे. तरीही शासनाकडून सकारात्मक निर्णय घेतला जात नसल्याने, मंडळाच्या वतीने दि. ३ जून रोजी मुंबईत आयोजित सभेत ४० हून अधिक जिल्ह्यांतील सभासदांनी आंदोलनाची गरज व्यक्त केली. त्या पार्श्वभूमीवर शासनाचा निषेध नोंदवण्यासाठी व हक्काचे महामंडळ मिळवण्यासाठी पुन्हा एकदा धरणे आंदोलन करण्यात येत आहे. संत कक्कय्या समाजातील सर्व बांधवांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, माननीय यशवंतराव नारायणकर, शिंदे सर, शशिकांत सोनवणे सर, आधी यांच्यावतीने मार्गदर्शन झाले. असे आवाहन वीरशैव कक्कय्या कल्याण मंडळ, मुंबई यांच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी लातूर जिल्ह्यातील सर्व वीरशैव कक्कया समाजातील ॲड. जांबुवंतराव सोनकवडे, शंकरराव इंगळे, श्रीमंतराव कावळे, आदीसह सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी उद्या होणार पुणे जिल्ह्यात दाखल

पुणे :संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याची तयारी पूर्ण; कसा असेल पालखीमार्ग, पाहा वेळापत्रकपालखी सोहळ्याची संपूर्ण तयारी ही पूर्ण झाली असल्याची माहिती आळंदी देवस्थान कमिटीच्या वतीने देण्यात आली आहे. ज्ञानेश्वर माऊलींची पालखी 20 तारखेला पुणे जिल्ह्यात दाखल होणार आहे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याची तयारी पूर्ण; कसा असेल पालखीमार्ग, पाहा वेळाप
महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचा ओढ लागलीय ती भगवान विठ्ठलाच्या भेटीची. 6 जुलैला आषाढी एकादशी असून महाराष्ट्रातील संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होऊ लागल्या आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान 19 जून ला असून 5 जुलै पालखी पंढरपुरात दाखल होणार आहे. त्यानंतर 5 ते 9 जुलै पंढरपुरात मुक्काम केल्यानंतर माऊलींची पालखी पुन्हा दहा तारखेला पंढरपूरहून आळंदीच्या दिशेने परतीचा प्रवास करणार आहे.

पालखी सोहळ्याची संपूर्ण तयारी ही पूर्ण झाली असल्याची माहिती आळंदी देवस्थान कमिटीच्या वतीने देण्यात आली आहे .पालखी मार्गावरील वाहतूक व्यवस्था वैद्यकीय सेवा पाणीपुरवठा स्वच्छता ग्रह हे अग्निशामन व्यवस्था आधी सुविधांचे याबाबत नियोजन करण्यात आले आहे. माऊलींची पालखी 20 तारखेला पुणे जिल्ह्यात दाखल होणार आहे.
पालखीचा मुक्काम कुठे कुठे असणार?
पुण्यात दोन दिवस पालखी मुक्कामी असल्यानंतर 22 तारखेला पुण्याहून सासवडच्या दिशेला प्रस्थान ठेवणार आहे. 24 तारखेला पुन्हा सासवड होऊन जेजुरीच्या दिशेने पालखीचा प्रवास असेल. 25 तारखेला पालखी वाल्हे येथे पोहोचेल त्या ठिकाणी माऊलींच्या पादुकांना निरास्नान होईल. 27 तारखेला लोणंद येथे पुढे जाताना चांदोबाचा लिंब या ठिकाणी माऊलींच्या पालखीचं पहिलं उभे रिंगण होईल. 1 जुलै नातेपुते येथील पुरंदवडे या ठिकाणी पहिले गोल रिंगण पार पडेल. 2 जुलै रोजी खडूस फाटा येथे दुसरे गोल रिंगण होईल, तीन जुलै वेळापूर येथे तिसरे गोल रिंगण होईल, 4 जुलैला दुसरे उभे रिंगण आणि चौथे गोल रिंगण बाजीरावाची विहीर याठिकाणी होईल त्यानंतर पालखी वाखरी येथे मुक्कामी पोहोचेल. 5 जुलै रोजी वाखरी येथे तिसरे उभे रिंगण पार पडल्यानंतर पालखी पंढरपूर या ठिकाणी दाखल होईल .
संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी वेळापत्रक 2025
19 /06/2025 माऊली पालखी प्रस्थान आळंदी
20/06/2025 आळंदी ते पुणे, 29 कि.मी
21/06/2025 पुणे मुक्काम
22/06/2025 पुणे ते सासवड, 32 कि.मी
23/06/2025 सासवड मुक्काम
24/06/2025 सासवड ते जेजुरी, 16 कि.मी
25 /06/2025 जेजुरी ते वाल्हे, 12 कि.मी
26 /06/2025 वाल्हे ते लोणंद, 20 कि.मी
माऊलींना निरास्मान
27/06/2025 लोणंद ते तरडगाव, 08 कि.मी
28/06/2025 तरडगाव ते फलटण, 21 कि.मी
29/06/2025 फलटण ते बरड, 18 कि.मी
30/06/2025 बरड ते नातेपुते, 21 कि.मी
बरड येथे गोल रिंगण
01/07/2025 नातेपुते ते माळशिरस, 18 कि.मी
सदाशिवनगर येथे गोल रिंगण
02/07/2025 माळशिरस ते वेळापूर, 19 कि.मी
खुडूस येथे गोळ रिंगण
03/07/2025 वेळापूर ते भंडी शेगाव, 21 कि.मी
ठाकूर बुवा समाधी गोल रिंगण आणि टप्पा येथे बंधू भेट सोहळा
04/07/2025 भंडी शेगाव ते वाखरी, 10 कि.मी
बाजीराव विहीर येथे उभे रिंगण
05/07/2025 वाखरी ते पंढरपूर, प्रवास व पौर्णिमेपर्यंत पंढरपूर मुक्काम
वाखरी येथे गोल रिंगण
06/07/2025 देवशयनी आषाढी एकादशी
10 /07/2025 पंढरपुरातून आळंदीकडे परतीचा प्रवास

मदरशातून सुट्टी मिळावी म्हणून अल्पवयीन मुलाने केला अल्पवयीन मुलाचा खून भयंकर कृत्य,कोल्हापूर सह महाराष्ट्र हादरला

कोल्हापूर: Crime News : मदरशात शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याने मदरसा बंद पडून आपल्याला सुट्टी मिळावी यासाठी मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात आळते येथे असलेल्या मदरशात शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याने मदरसा बंद पडून आपल्याला सुट्टी मिळावी यासाठी मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत तोंडात कापडाचा बोळा कोंबून, विजेचा शॉक देऊन हा खून करण्यात आला आहे. फैजान नजिम (वय ११, रा. बिहार) असे अल्पवयीन खून झालेल्या विद्यार्थ्याचं नाव असून पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेत बाल निरीक्षणगृहात त्याची रवानगी केली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान सदर संशयिताची चौकशी केली असता अल्पवयीन मुलगा घाबरून काहीही सांगत नव्हता त्याला बोलतं करण्यासाठी पोलिसांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आणि बालकल्याण समितीच्या सदस्यांना व मानसोपचार तज्ञांना बोलवलं. यानंतर अल्पवयीन मुलगा त्यांच्यासमोर बोलता झाला आणि त्याने सुट्टी मिळावी आणि घरी जाता यावं यासाठी खून केल्याच कबुली दिली. या घटनेनंतर या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या गुन्ह्यात आणखी काही मुलांचा समावेश असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून त्यानुसार आणखी दोन अल्पवयीन मुलांची चौकशी सुरू आहे.
दरम्यान पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. तसेच या घटनेचा खोलवर तपास करण्याचे आदेश त्यांनी पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार संशयिताने खून करण्यासाठी वायर कोठून आणली आणि कोठे लपवले आहे याचा देखील पोलीस शोध घेत आहेत. मात्र अशा मदरशांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि धार्मिक शिक्षणामुळे मानसिकतेवर होणारे परिणाम तसेच त्यांच्या बाल हक्कांवर आलेले बंधन यामुळे हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.ही संस्था बंद पडून आपल्याला घरी जायला मिळावे, यासाठी अल्पवयीन विद्यार्थ्याने फैजानची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
आळते येथे असणाऱ्या या धार्मिक शिक्षण संस्थेत तब्बल 80 विद्यार्थी आहेत. यापैकी बहुतांश म्हणजे 70 विद्यार्थी हे बिहारमधील आहेत. हत्या झालेला फैजान नजीमा आणि हत्या करणारा हे दोघेही बिहारचे होते. हत्या करणाऱ्या विद्यार्थ्याला बिहारमधील आपल्या गावी जायचे होते. त्यासाठी ही संस्था बंद पडावी, या उद्देशाने त्याने फैजानची शॉक देऊन हत्या केली. झोपेतच त्याचा मृत्यू झाल्याचे सुरुवातीला सांगितले जात होते. मात्र, पोलिसांना संशय आल्याने त्यांनी संस्थेतील मुलांची चौकशी केली. त्यावेळी एका अल्पवयीन विद्यार्थ्याने आपणच फैजानला इलेक्ट्रिक वायरचा शॉक देऊन त्याची हत्या केल्याची कबुली दिली.अशा घटना मदरशांमध्ये वारंवार घडू नयेत यासाठी महाराष्ट्र शासनाने सर्व अशा धार्मिक शिक्षण देणाऱ्या मदरशांची चौकशी करावी अशी मागणी सामान्य नागरिकांतून होत आहे.