७ जुलै रोजी आझाद मैदानात संत कक्कय्या समाजाचे धरणे आंदोलनासाठी लातूर येथे बैठकीचे आयोजन

७ जुलै रोजी आझाद मैदानात संत कक्कय्या समाजाचे धरणे आंदोलनासाठी लातूर येथे बैठकीचे आयोजन

लातूर:- संत कक्कय्या समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावे, या मागणीसाठी आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी वीरशैव कक्कय्या कल्याण मंडळ, मुंबई यांच्या वतीने सोमवार, दि. ७ जुलै २०२५ रोजी आझाद मैदान येथे एक दिवसीय धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

संत कक्कय्या समाजाच्या महामंडळ स्थापनेच्या मागणीसाठी यापूर्वीही २८ जून २०२४ रोजी आंदोलन करण्यात आले होते. त्या आंदोलनाला राज्यभरातील समाजबांधव, भगिनी, संस्था, महासंघ आणि संघटनांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात समाजाला महामंडळ देण्याचे जाहीर आश्वासन दिले होते. मात्र, त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही.

कल्याण मंडळाचे पदाधिकारी सातत्याने प्रशासनाशी संपर्कात राहून पाठपुरावा करत आहेत. अधिवेशनानंतर निवडणुका जाहीर झाल्या, मंत्रिमंडळ बदल झाला, परंतु शासन निर्णय मात्र अद्याप पारित झालेला नाही.

मागील महिन्याभरात कल्याण मंडळाने समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट व त्यांच्या सचिवांशी चर्चा करून पाठपुरावा सुरू ठेवला आहे. तरीही शासनाकडून सकारात्मक निर्णय घेतला जात नसल्याने, मंडळाच्या वतीने दि. ३ जून रोजी मुंबईत आयोजित सभेत ४० हून अधिक जिल्ह्यांतील सभासदांनी आंदोलनाची गरज व्यक्त केली. त्या पार्श्वभूमीवर शासनाचा निषेध नोंदवण्यासाठी व हक्काचे महामंडळ मिळवण्यासाठी पुन्हा एकदा धरणे आंदोलन करण्यात येत आहे. संत कक्कय्या समाजातील सर्व बांधवांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, माननीय यशवंतराव नारायणकर, शिंदे सर, शशिकांत सोनवणे सर, आधी यांच्यावतीने मार्गदर्शन झाले. असे आवाहन वीरशैव कक्कय्या कल्याण मंडळ, मुंबई यांच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी लातूर जिल्ह्यातील सर्व वीरशैव कक्कया समाजातील ॲड. जांबुवंतराव सोनकवडे, शंकरराव इंगळे, श्रीमंतराव कावळे, आदीसह सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी उद्या होणार पुणे जिल्ह्यात दाखल

पुणे :संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याची तयारी पूर्ण; कसा असेल पालखीमार्ग, पाहा वेळापत्रकपालखी सोहळ्याची संपूर्ण तयारी ही पूर्ण झाली असल्याची माहिती आळंदी देवस्थान कमिटीच्या वतीने देण्यात आली आहे. ज्ञानेश्वर माऊलींची पालखी 20 तारखेला पुणे जिल्ह्यात दाखल होणार आहे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याची तयारी पूर्ण; कसा असेल पालखीमार्ग, पाहा वेळाप
महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचा ओढ लागलीय ती भगवान विठ्ठलाच्या भेटीची. 6 जुलैला आषाढी एकादशी असून महाराष्ट्रातील संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होऊ लागल्या आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान 19 जून ला असून 5 जुलै पालखी पंढरपुरात दाखल होणार आहे. त्यानंतर 5 ते 9 जुलै पंढरपुरात मुक्काम केल्यानंतर माऊलींची पालखी पुन्हा दहा तारखेला पंढरपूरहून आळंदीच्या दिशेने परतीचा प्रवास करणार आहे.


पालखी सोहळ्याची संपूर्ण तयारी ही पूर्ण झाली असल्याची माहिती आळंदी देवस्थान कमिटीच्या वतीने देण्यात आली आहे .पालखी मार्गावरील वाहतूक व्यवस्था वैद्यकीय सेवा पाणीपुरवठा स्वच्छता ग्रह हे अग्निशामन व्यवस्था आधी सुविधांचे याबाबत नियोजन करण्यात आले आहे. माऊलींची पालखी 20 तारखेला पुणे जिल्ह्यात दाखल होणार आहे.
पालखीचा मुक्काम कुठे कुठे असणार?
पुण्यात दोन दिवस पालखी मुक्कामी असल्यानंतर 22 तारखेला पुण्याहून सासवडच्या दिशेला प्रस्थान ठेवणार आहे. 24 तारखेला पुन्हा सासवड होऊन जेजुरीच्या दिशेने पालखीचा प्रवास असेल. 25 तारखेला पालखी वाल्हे येथे पोहोचेल त्या ठिकाणी माऊलींच्या पादुकांना निरास्नान होईल. 27 तारखेला लोणंद येथे पुढे जाताना चांदोबाचा लिंब या ठिकाणी माऊलींच्या पालखीचं पहिलं उभे रिंगण होईल. 1 जुलै नातेपुते येथील पुरंदवडे या ठिकाणी पहिले गोल रिंगण पार पडेल. 2 जुलै रोजी खडूस फाटा येथे दुसरे गोल रिंगण होईल, तीन जुलै वेळापूर येथे तिसरे गोल रिंगण होईल, 4 जुलैला दुसरे उभे रिंगण आणि चौथे गोल रिंगण बाजीरावाची विहीर याठिकाणी होईल त्यानंतर पालखी वाखरी येथे मुक्कामी पोहोचेल. 5 जुलै रोजी वाखरी येथे तिसरे उभे रिंगण पार पडल्यानंतर पालखी पंढरपूर या ठिकाणी दाखल होईल .
संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी वेळापत्रक 2025
19 /06/2025 माऊली पालखी प्रस्थान आळंदी
20/06/2025 आळंदी ते पुणे, 29 कि.मी
21/06/2025 पुणे मुक्काम
22/06/2025 पुणे ते सासवड, 32 कि.मी
23/06/2025 सासवड मुक्काम
24/06/2025 सासवड ते जेजुरी, 16 कि.मी
25 /06/2025 जेजुरी ते वाल्हे, 12 कि.मी
26 /06/2025 वाल्हे ते लोणंद, 20 कि.मी
माऊलींना निरास्मान
27/06/2025 लोणंद ते तरडगाव, 08 कि.मी
28/06/2025 तरडगाव ते फलटण, 21 कि.मी
29/06/2025 फलटण ते बरड, 18 कि.मी
30/06/2025 बरड ते नातेपुते, 21 कि.मी
बरड येथे गोल रिंगण
01/07/2025 नातेपुते ते माळशिरस, 18 कि.मी
सदाशिवनगर येथे गोल रिंगण
02/07/2025 माळशिरस ते वेळापूर, 19 कि.मी
खुडूस येथे गोळ रिंगण
03/07/2025 वेळापूर ते भंडी शेगाव, 21 कि.मी
ठाकूर बुवा समाधी गोल रिंगण आणि टप्पा येथे बंधू भेट सोहळा
04/07/2025 भंडी शेगाव ते वाखरी, 10 कि.मी
बाजीराव विहीर येथे उभे रिंगण
05/07/2025 वाखरी ते पंढरपूर, प्रवास व पौर्णिमेपर्यंत पंढरपूर मुक्काम
वाखरी येथे गोल रिंगण
06/07/2025 देवशयनी आषाढी एकादशी
10 /07/2025 पंढरपुरातून आळंदीकडे परतीचा प्रवास


मदरशातून सुट्टी मिळावी म्हणून अल्पवयीन मुलाने केला अल्पवयीन मुलाचा खून भयंकर कृत्य,कोल्हापूर सह महाराष्ट्र हादरला


कोल्हापूर: Crime News : मदरशात शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याने मदरसा बंद पडून आपल्याला सुट्टी मिळावी यासाठी मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात आळते येथे असलेल्या मदरशात शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याने मदरसा बंद पडून आपल्याला सुट्टी मिळावी यासाठी मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत तोंडात कापडाचा बोळा कोंबून, विजेचा शॉक देऊन हा खून करण्यात आला आहे. फैजान नजिम (वय ११, रा. बिहार) असे अल्पवयीन खून झालेल्या विद्यार्थ्याचं नाव असून पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेत बाल निरीक्षणगृहात त्याची रवानगी केली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान सदर संशयिताची चौकशी केली असता अल्पवयीन मुलगा घाबरून काहीही सांगत नव्हता त्याला बोलतं करण्यासाठी पोलिसांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आणि बालकल्याण समितीच्या सदस्यांना व मानसोपचार तज्ञांना बोलवलं. यानंतर अल्पवयीन मुलगा त्यांच्यासमोर बोलता झाला आणि त्याने सुट्टी मिळावी आणि घरी जाता यावं यासाठी खून केल्याच कबुली दिली. या घटनेनंतर या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या गुन्ह्यात आणखी काही मुलांचा समावेश असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून त्यानुसार आणखी दोन अल्पवयीन मुलांची चौकशी सुरू आहे.
दरम्यान पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. तसेच या घटनेचा खोलवर तपास करण्याचे आदेश त्यांनी पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार संशयिताने खून करण्यासाठी वायर कोठून आणली आणि कोठे लपवले आहे याचा देखील पोलीस शोध घेत आहेत. मात्र अशा मदरशांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि धार्मिक शिक्षणामुळे मानसिकतेवर होणारे परिणाम तसेच त्यांच्या बाल हक्कांवर आलेले बंधन यामुळे हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.ही संस्था बंद पडून आपल्याला घरी जायला मिळावे, यासाठी अल्पवयीन विद्यार्थ्याने फैजानची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
आळते येथे असणाऱ्या या धार्मिक शिक्षण संस्थेत तब्बल 80 विद्यार्थी आहेत. यापैकी बहुतांश म्हणजे 70 विद्यार्थी हे बिहारमधील आहेत. हत्या झालेला फैजान नजीमा आणि हत्या करणारा हे दोघेही बिहारचे होते. हत्या करणाऱ्या विद्यार्थ्याला बिहारमधील आपल्या गावी जायचे होते. त्यासाठी ही संस्था बंद पडावी, या उद्देशाने त्याने फैजानची शॉक देऊन हत्या केली. झोपेतच त्याचा मृत्यू झाल्याचे सुरुवातीला सांगितले जात होते. मात्र, पोलिसांना संशय आल्याने त्यांनी संस्थेतील मुलांची चौकशी केली. त्यावेळी एका अल्पवयीन विद्यार्थ्याने आपणच फैजानला इलेक्ट्रिक वायरचा शॉक देऊन त्याची हत्या केल्याची कबुली दिली.अशा घटना मदरशांमध्ये वारंवार घडू नयेत यासाठी महाराष्ट्र शासनाने सर्व अशा धार्मिक शिक्षण देणाऱ्या मदरशांची चौकशी करावी अशी मागणी सामान्य नागरिकांतून होत आहे.

पेठ वडगाव हातकणंगले रोड वरती अवजड ट्रक बंद पडल्याने सोमवारी चार तास वाहतुकीची कोंडी

कोल्हापूर: पेठवडगाव वडगाव हातकणंगले रोडवरती हॉटेल कोल्हापुरी कट्टा समोर रस्त्यावर अवजड ट्रक बंद पडल्याने. सोमवारी16 जून रोजी सायंकाळी सुमारे 4 ते 7 चे सुमारास अडीच ते तीन तास वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती पेठ वडगाव हे आसपासच्या 40 खेड्यांना जोडणारे शहर असल्यामुळे जर सोमवारी येथे आठवडा बाजार भरत असतो त्यामुळे सोमवारी बाजार असल्यामुळे पंचक्रोशीतील नागरिकांचे छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर पेठवडगाव येथे बाजारा निमित्ताने येणे जाणे राहते त्यामुळे या रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असते या रस्त्यावरती हा अवजड मालवाहतूक ट्रक बंद पडल्या मुळे नागरिकांना व वाहन चालक यांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे

पेठ वडगाव हातकणंगले रोडवरती अवजड ट्रक बंद पडल्याने झाली वाहतुकीची कोंडी

कोल्हापूर : पेठवडगाव हातकणंगले रोडवरील हॉटेल कोल्हापुरी कट्टा समोर रोडवरती ट्रक बंद पडल्याने सोमवार 16 जून रोजी सायंकाळी सुमारे 4 ते 7 अडीच ते तीन तास वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती पेठवडगाव हे आसपासच्या 40 खेड्यांना जोडणारे शहर असल्यामुळे दर सोमवारी आठवडी बाजार भरत असतो सोमवार बाजार असल्यामुळे पंचक्रोशीतील लोकांचे मोठ्या प्रमाणावर पेठ वडगाव येथे बाजीरा निमित्त बाजारपेठेमध्ये येणे जाणे होत असते त्यामुळे या रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते रोडवरती मध्येच आडवा ट्रक बंद पडल्यावर मुळे नागरिकांना व वहाण चालकांना त्रास सहन करावा लागला.

मनमाड शहरातील धाडसी घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्यास स्थानिक गुन्हे शाखा व मनमाड पोलीसांना यश घरफोडी करणारे ०३ सराईत गुन्हेगार अटक – ०१ किलो ०६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत

नाशिक: प्रतिनिधी, संतोष रायचंदे
मनमाड येथील डमरे कॉलनी परिसरातील व्यावसायीक मुर्तजा अब्दुल हुसेन रस्सीवाला, (धंदा ॲल्युमिनियम व्यापार) हे व त्यांचे कुटुंबीय बाहेरगावी गेलेले असतांना कोणीतरी अज्ञात चोरटयांनी त्यांचे घराचे खिडकीचे गज कापुन व वाकवून त्याव्दारे घरात प्रवेश करून बेडरूममधील कपाटात ठेवलेले १२०० ग्रॅम सोन्याचे दागिने व ०८ लाख रूपये रोख असा मुद्देमाल घरफोडी चोरी करून चोरून नेलेबाबत दि. ११/०६/२०२५ रोजी मनमाड पोलीस स्टेशन येथे गुरनं ३५९/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३३१(३), ३३१ (४), ३०५, ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर धाडसी घरफोडीचे घटनेबाबत नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील यांनी तात्काळ दखल घेवून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व मनमाड पोलीसांना सदर गुन्हा उघडकीस आणणेसाठी मार्गदर्शन करून सुवना दिल्या होत्या. सदर घटना घडल्यानंतर मनमाड शहर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे पथकांनी तात्काळ घटनास्थळावर भेट देवुन पाहणी केली. त्याचप्रमाणे श्वानपथक ,फिंगरप्रिंट तज्ञ तसेच फॉरेन्सिक टिमला देखील घटनास्थळी पाचारण करण्यात आले. सदर प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र मगर व मनमाड पो.स्टे. चे पोलीस निरीक्षक श्री. विजय करे यांनी यातील आरोपीतांची गुन्हा करण्याची पध्दत व घटनास्थळ परिसरातील तांत्रिक बाबींचा काटेकोर पणे अभ्यास करून पडताळणी केली असता सदरचा गुन्हा हा मनमाड शहरातील अभिलेखावरील गुन्हेगारांनीच केला असल्याचा तर्क लावून तपासाची चक्रे फिरविली. त्याप्रमाणे सदर गुन्हयाचे समांतर तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने मनमाड शहर व चांदवड परिसरातुन खालील सराईत गुन्हेगारांना शिताफिने ताब्यात घेतले.
१) संजय किशोर गायकवाड, वय
३५, रा. आनंदवाडी, सुभाषनगर, मनमाड, ता. नांदगाव, जि. नाशिक

२)राकेश अशोक संसारे, वय ३०, रा. आनंदवाडी, सुभाषनगर, मनमाड, ता. नांदगाव, जि. नाशिक

३) राजेश रामशंकर शर्मा उर्फ भैय्या, वय ३०, रा. मदिना चौक, सारडा सर्कल, मारूती मंदिराचे पाठीमागे,
नाशिक मुळ रा. सुलतानपुर चौक, संजुनगर, गोरखपुर, उत्तरप्रदेश
यातील ताब्यात घेतलेले वरील आरोपीतांना तपासाचे कौशल्य वापरून सदर गुन्हयाबाबत सखोल चौकशी केली असता त्यांनी मनमाड शहरातील डमरे कॉलनी परिसरातील एक बंद घराचे खिडकीचे गज कापुन व वाकवून त्याव्दारे आत प्रवेश करून कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम घरफोडी चोरी केल्याची कबुली दिली आहे.
यातील आरोपी क्र. १ ते ३ यांना वरील गुन्हयात अटक करण्यात आली असून तपासात त्यांचे कब्जातून १०५५.८५० ग्रॅम (०१ किलो ५५८५० ग्रॅग.) वजनाचे सोन्याचे दागिने किं. रू. १,०५,४०,०००/- (१ कोटी ५ लाख ४० हजार रू.) चा चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. तसेव यातील आरोपींनी गुन्हा करण्यासाठी वापरलेली बजाज पल्सर मोटर सायकल देखील जप्त करण्यात आली आहे. तसेव सदर गुन्हयातील उर्वरित मु‌द्देमालाबाबत यातील आरोपीतांकडे कसोशिने तपास करण्यात येत आहे.
यातील ताब्यात घेतलेले तीन्ही आरोपी हे सराईत गुन्हेगार असुन त्यांचेवर खालील प्रमाणे गुन्हे दाखल
आहे. यातील ताब्यात घेतलेले तीनही आरोपी हे सराईत गुन्हेगार असुन त्यांचेवर खालील प्रमाणे गुन्हे दाखल

अ.क. आरोपी

१ राजेश रामशंकर शर्मा उर्फ भैय्या, रा. मदिना चौक, बाशिक, गुळ रा. गोरखपुर, उत्तरप्रदेश


२ संजय किशोर गायकवाड, रा. सनगाह
पोलीस ठाणे
भहकाली, गंगापुर, इंदिरानगर, उपनगर, सरकारवाडा, अंबड, नाशिकरोत, आडगाव, मनमाड, वांदवड, जिल्हा पेठ (जळगाव), जळमाद तालुका, वाळूज एम. आय.डी.सी. (छ.संभाजीनगर)

मनमाड पो. स्टे आर.पी.एफ.मनमाड

घरफोडी-२१

दरोडा तयारी-०१

चोरी-०४

जबरी चोरी-०१

एकूण २७ गुन्हे

चोरी-०२

दुखापत-०१

मुंबई पो. ॲक्ट १४२-०१

मुंबई पो. ॲक्ट १२२-०१
एकुन ०८ गुन्हे

३ राकेश अशोक संसारे, रा. मनमाड
मनमाड पो.स्टे.
आर.पी.एफ. मनमाड
गंभीर दुखापत-०१
बोरी-०१
दंगा-०१
रेल्वे ऑक्ट ३७-०१
एकून- ०४ गुन्हे


यातील आरोपी राजेश रामशंकर शर्मा याचेवर यापूर्वी नाशिक शहर, नाशिक ग्रामीन, जगात छत्रपती संभाजीनगर जिल्हयात मालाविरुध्दचे गंभीर गुन्हे दाखल असून तो प्रत्येकवेळी गुन्हा करतांना वेगवेगळे गुन्हेगारांना सोबत घेवून गुन्हे करत असतो, त्याचा राहण्याचा ठावठिकाणा हा, रो नेहमी बदलत असतो. अलीकडील कालावधीतच तो छत्रपती संभाजीनगर जिल्हयातून जामीनावर मुक्त झाला होता, तेव्हापासून त्याने मनमाड येथील त्याचे वरील साथीदारांसह पुन्हा गुन्हा केला आहे. यातील आरोपीलांकडून घरफोडी बोरचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून सदर गुन्हयाया पुढील तपास मनमाड शहर पोलीस वाणेकशातील अधिकारी व अंमलदार करीत आहे.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री. तेगबीर सिंह संधू, उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड विभाग श्री. बाजीराव महाजन यांनी सदर गुन्हा उघडकीस आणणेसाठी केलेले मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे त्यानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र मगर, मनमाड पो.स्टे. पोलीस निरीक्षक श्री. विजय करे, सपोनि भरत जाधव, तसेच स्थागुशावे सपोनि किशोर जोशी, पोउनि दत्ता कांभिरे, पोलीस अंमलदार माधव साळे, धनंजय शिलावटे, प्रविण काकड, विशाल आव्हाड, रावसाहेब कांबळे, प्रितम लोखंडे, श्रीकांत गारूंगे, सागर काकड, शैलेश गांगुर्डे, गोरक्षनाथ संवत्सरकर, योगिला काकड, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, केतन कापसे, दत्ता माळी, हरिष माळी, अमोल गांगुर्डे यांचे पथकाने वरील घरफोडीचा क्लिष्ट स्वरुपाचा गुन्हा उघडकीस आणून कामगिरी केली आहे.

सिन्नर तालुक्यात मोटर सायकल चोरी करणारे चोरटे स्थानिक गुन्हे शाखेचे जाळ्यात चोरीच्या १० मोटर सायकल हस्तगत – मोटर सायकल चोरीचे ०७ गुन्हे उघडकीस


नाशिक : नाशिक ग्रामीण जिल्हयातील मोटर सायकल चोरीचे वाढत्या गुन्हयांना प्रतिबंध होण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील यांनी नाउघड गुन्हयांचा आढावा घेवून कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्याअनूषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने मोटर सायकल चोरीचे गुन्हयांतील आरोपींचे सध्याचे वास्तव्याबाबत तसेच चोरीच्या मोटर सायकल कोठे विक्री केल्या जातात याबाबत सविस्तर सर्विस्तर माहिती घेवून सिन्नर तालुक्यातील मोटर सायकल चोरांना ताब्यात घेवून कारवाई केली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र मगर यांचे पथकातील अंमलदार हे नाउघड मोटर सायकल चोरीचे गुन्हयांचा समांतर तपास करीत असतांना, गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सिन्नर तालुक्यातील पांदुर्ली गावचे शिवारात काही संशयीत चोरीच्या मोटर सायकल विक्री करण्याचे उद्देशाने येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. त्यावरून पोलीस पथकाने सिन्नर पोलीस ठाणे हददीतील पांदुर्ली चौफुली परिसरात सापळा रचुन खालील संशयीतांना ताब्यात घेतले आहे.
१) अजय दत्तात्रय दळवी, वय २१, रा. विंचुरदळवी, भावदेवाडी, ता. सिन्नर, जि. नाशिक २) अनिकेत श्रीधर मानकर, वय २४, रा. राहुरी, भगुर-पांदुर्ली रोड, ता.जि. नाशिक
ताब्यात घेतलेले वरील संशयीतांचे कब्जात मिळून आलेल्या बजाज पल्सर मोटर सायकलचे कागदपत्रांबाबत विचारपूस केली असता, त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यांना विश्वासात घेवून सखोल चौकशी केली असता त्यांनी व त्यांचा साथीदार नामे ३) चेतन उर्फ सख्या नामदेव शेळके, रा. विंचुर दळवी, ता. सिन्नर (फरार ) अशांनी मिळून सदरची मोटर सायकल चिंचोली ता. सिन्नर येथुन चोरी केल्याची कबुली दिली आहे.
यातील ताब्यात घेतलेले वरील आरोपी क. १ ते २ यांचेकडे मोटर सायकल चोरीचे गुन्हयांचे समांतर तपासात अधिक चौकशी केली असता त्यांनी सिन्नर तालुक्यातील चिंचोली, सिन्नर शहर, कुंदेवाडी, दोडी, तसेच घोटी, वणी, संगमनेर, श्रीरामपुर परिसरातून एकुण १० मोटर सायकली चोरी केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपींनी कबुली दिल्यावरून मोटर सायकल चोरीचे खालीलप्रमाणे ०७ गुन्हे उघडकीस आलेले आहे.
१) सिन्नर पो. स्टे. गुरनं ३३३/२०२४ भा.द.वि. कलम ३७९.
२) वावी पो. स्टे. गुरनं २५०/२०२५ भा. न्या. सं. कलम ३०३ (२).
३) संगमनेर शहर पो. स्टे. जिल्हा अहिल्यानगर, गुरनं ६९७/२०२४ भा. न्या.सं. कलम ३०३ (२).
४) वणी पो. स्टे. गुरनं १९२/२०२४ भा.द.वि. कलम ३.
५) वावी पो. स्टे. गुरनं ३०/२०२४ भा.द.वि. कलम ३७९.
६) घोटी पो. स्टे. गुरनं ६३/२०२४ भा.द.वि. कलम ३७९.
७) श्रीरामपुर शहर पो. स्टे. जिल्हा अहिल्यानगर गुरनं ५१२/२०२५ भा. न्या.सं. कलम ३०३ (२).
यातील ताब्यात घेतलेले आरोपींचे कब्जातुन वरील गुन्हयांमध्ये चोरीस गेलेल्या ०४ हिरो स्प्लेंडर, ०१ बजाज २२० पल्सर, ०१ बजाज प्लॅटीना, ०२ बजाज पल्सर, ०१ रॉयल इनफिल्ड बुलेट, ०१ होण्डा युनिकॉर्न अशा एकूण चोरीच्या १० मोटर सायकल किं. रु. ०८ लाख ३५ हजार चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर आरोपींना सिन्नर पोलीस स्टेशनकडील गुरनं ३३३/२०२४ भा.द. वि.क. ३७९ या गुन्हयात अटक अट करण्यात आली असून त्यांचेकडून मोटर सायकल चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. यातील फरार आरोपी चेतन उर्फ सख्या नामदेव शेळके हा अभिलेखावरील गुन्हेगार असुन तो सिन्नर पो. स्टे. कडील भादवि कलम ३७६ सह पॉक्सो कायद्यान्वये दाखल असलेले गुन्हयात सुमारे ०३ वर्षांपासून मध्यवर्ती कारागृहात होता, जामीनावर सुटल्यानंतर त्याने त्याचे वरील वरील साथीदारांसह मोटर सायकल चोरीचे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून पोलीस पथक त्याचा कस चा कसोशिने शोध घेत आहे.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र मगर, सपोउनिरीक्षक नवनाथ सानप, पोलीस अंमलदार विनोद टिळे, नवनाथ शिरोळे, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम यांचे पथकाने मोटर सायकल चोरीचे ०७ गुन्हे उघडकीस आणुन चोरीच्या १० मोटर सायकल हस्तगत केल्या आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पावसाच्या हजेरीने बळीराजा पेरणीसाठी सज्ज

कोल्हापूर : आज, १५ जून २०२५ रोजी कोल्हापूर जिल्ह्यात पेरणीच्या दृष्टीने दिलासादायक वातावरण झाले असून जिल्ह्यात पावसाने चांगली हजेरी लावली असून, पेरणीयोग्य स्थिती आहे.कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे, ज्यामुळे पेरणीसाठी चांगली परिस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी, विशेषतः घाट परिसरात, जोरदार पावसाची शक्यता असल्यामुळे बळीराजाने पेरणीला सुरुवात केली आहे.
जिल्ह्यात भातशेतीची पेरणी अजूनही काही ठिकाणी पूर्ण झालेली नाही, पण पावसाने साथ दिल्यास लवकरच पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.
जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी ‘युनिक फार्मर आयडी’ योजना सुरू करण्यात आली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ घेणे सोपे होणार आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेती आणि घरांचे नुकसान झाले आहे, त्यामुळे प्रशासनाने योग्य ती मदत करण्याची तयारी दर्शविली आहे. हवामान विभागाने १५ जूनपर्यंत पेरणीसाठी वाट पाहण्याचा सल्ला दिला होता, त्यानुसार आता अनेक ठिकाणी पेरणीस सुरुवात झाली आहे.
शासनाच्या विविध योजना आणि मदतीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे.
एकंदरीत, कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी बळीराजा पेरणीच्या कामात व्यस्त असून, पावसाने चांगली साथ दिल्याने दिलासा मिळाला आहे. सुरू झालेल्या पावसामुळे पेरणीसाठी बी बियाणे खते खरेदीसाठी कोल्हापूर शहरातील शाहूपुरी येथील व्यापारी पेठेतील सर्व कृषी सेवा केंद्रात बळीराजांनी केली गर्दी

पुणे बेंगलोर नॅशनल हायवे वरती वारंवार होत आहे वाहतुकीची कोंडी

कोल्हापूर : पुणे बेंगलोर नॅशनल हायवे 48 या महामार्गाचे सध्या काम सुरू असून शनिवार 14 जून रोजी अंबप फाटा ,टोप व नागाव फाटा यादरम्यान उड्डाणपूलाचे काम सुरू असलेने साईड पट्टीवरून वळण रस्ता सुरू केला असल्याने सदरचा रस्ता हा अरुंद झाला असून अवजड वाहने वाहतूक करत असताना वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे आज ही या ठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती काही काळ वाहतूक थांबली होती या ठिकाणी महामार्ग वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ येऊन सदरची वाहतूक पुन्हा सुरू करून दिली अशा घटना वारंवार या महामार्गावरती घडत आहेत गेली दोन वर्षे झाली या महामार्कागाचे काम सुरू झाले असून महामार्गाच्या दोन्ही बाजूस अर्धवट कामे बंद अवस्थेत दिसतआहेत त्यामुळे या महामार्गावरती वारंवार अपघात ही होत आहेत कोणत्याही एका बाजूने महामार्गाचे काम पूर्ण झालेले दिसत नाही किणी टोल नाका ते कोगणोळी टोल नाका दरम्यान या महामार्गाचे काम सध्या बंद असल्याचे दिसत आहे शेजारच्या कर्नाटक राज्यामध्ये या महामार्गाचे काम जलद गतीने पूर्ण होत असलेचे दिसत आहे या महामार्गाचे काम जलद गतीने पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग व राज्य सरकारने लक्ष घालावे अशी मागणी सामान्य नागरिक व वाहन चालकाकडून केली जात आहे.

पूर्व मंत्री मोहोड की पहल पर 9 लोगों का होगा उपचार
सौसर।
भाजपा सरकार की महत्वाकांक्षी मुख्यमंत्री स्वेच्छानुदान योजना से पांढुर्णा जिले के 9 जरूरमंदों का उपचार संभव हो सकेगा। पूर्व मंत्री नानाभाऊ मोहोड की पहल पर मुख्यमंत्री डॉ मोहन यादव द्वारा आर्थिक रूप से कमजोर वर्ग के 8 लोगों को 3 लाख 70 हजार रूपयें की सहायता उपलब्ध कराई है। जिसमें सुभाष गजभिए सौसर 40 हजार, रेखा उईके खैरितायगाव 40 हजार, अमन चिमोटे सौसर 25 हजार, गोकूल ऊकार पांढुर्णा 65 हजार, गणपति गांवडे ढोकदोह 30 हजार, रूपेश रंगारे वार्ड 10 सौसर 30 हजार, महेश बोबडे सौसर 40 हजार, पीयूष ठाकरे रंगारी 50 हजार, पंकज सिंह पांढुर्णा 50 हजार का समावेष है। आर्थिक सहायता मिलने से गंभीर बिमारी से पीडित मरीजो का निजी अस्पताल में इलाज होगा। आर्थिक सहायता मिलने पर परिजनों ने मुख्यमंत्री डॉ मोहन यादव, सांसद विवेक बंटी साहू, पूर्व मंत्री नानाभाऊ मोहोड एवं जिला भाजपा अध्यक्ष संदीप मोहोड का आभार व्यक्त किया है।