10


कोल्हापूर:डोणोली (ता.शाहूवाडी) येथे जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने संपूर्ण देशात 5 जुलै ते 19 जुलै 2026 या कालावधीत “वृक्षारोपण महाअभियान 2026” संपन्न होत आहे.त्याच अनुषंगाने जगद्गुरुंच्या संकल्पनेनुसार “प्रत्येक भक्त का एक वृक्ष” या अभियानाच्या अंतर्गत कोल्हापूर जिल्हा रामानंद सांप्रदाय यांच्यावतीने डोणोली येथील ग्रामपंचायत गायरानामध्ये रविवारी एकाच दिवशी 3000 वृक्ष लागवड करण्याचा संकल्प करण्यात आला.या उपक्रमात आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी सहभागी होऊन वृक्ष लागवडीचा संदेश दिला व श्रीमद जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या प्रेरणेने सुरू असलेल्या कार्याबद्दल गौरव उद्गार काढून शुभेच्छा दिल्या
रामानंद संप्रदायाने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 5 जुलै ते 19 जुलै अखेर 9500 हून अधिक वृक्ष लागवड कोल्हापूर जिल्हा सेवा समिती जिल्हयाच्या वतिन केल्याची माहिती जिल्हाध्यक्ष कृष्णात माळी यांनी दिली
तसेच जिल्हा परिषद सदस्या राजकुवर रणवीरसिंह गायकवाड, डोणीली ग्रामपंचायत सरपंच विठ्ठल पवार, उपसरपंच प्रदीप शेळके, अरुण पाटील, सदाशिव शिंदे इत्यादी ग्रामपंचायत सदस्य व मान्यवर यांनी भेट दिली वेळी जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी प्रणित रामानंद संप्रदाय कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष कृष्णात माळी, जिल्हा-सह अध्यक्ष मधुकर बाबर ,जिल्हा सचिव दिलीप कोळी, जिल्हा महिला अध्यक्षा निता सुतार, जिल्हा युवा अध्यक्ष दशरथ मोहिते, जिल्हा ब्लड कॅम्प प्रमुख उत्तम माळवी ,जिल्हा अध्यात्मिक प्रमुख तुकाराम पाटील, जिल्हा संजीवनी प्रमुख कोमल सुतार, जिल्हा कर्नल रूपेश सुतार ज.न.म प्रवचनकार सीमा पाटील माजी महिला अध्यक्षा तिलोत्तमा नाईक, प्रोटोकॉल अधिकारी सुभाष सुतार, तालुका अध्यक्ष सुरेश शिंदे, शामराव पाटील, अंजली तळवणेकर, दत्तात्रय मोहिते, रमेश लोकरे, बजरंग पाटील, राधिका चव्हाण जिल्ह्यातील सर्व आजी माझी पदाधिकारीही तालुका सेवा समिती व भक्त परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते सुभाष सुतार ,राकेश कुंभार, सुजल भोपळे, करण पाटील, शामसुंदर पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले .

























