Uncategorized

अल्पवयीन मुलांना दुचाकी वाहन चालविणे करीता देणारे एकूण १५ मुलांचे पालक / वाहनाचे मालक यांचे विरुध्द पोलीस ठाणेस गुन्हे दाखल करुन वाहतूक शाखेकरवी विशेष कारवाईची मोहीम

out of 10


कोल्हापूर शहर : उपनगरामध्ये १८ वर्षापेक्षा कमी वयाचे अल्पवयीन मुलांनी दुचाकी वाहन चालवलेमुळे गंभीर अपघात सारख्या घटना घडलेल्या आहेत. अल्पवयीन मुलांना दुचाकी वाहन चालविणेस देणारे त्या मुलांचे पालक व वाहन मालक हे सुज्ञ असून अल्पवयीन मुलास कायदयाचे ज्ञान नाही, तो अज्ञान आहे, त्यास दुचाकी वाहन चालविणेस दिलेस तो इतर वाहन धारकांना धोका निर्माण करु शकतो अगर स्वतः चे नुकसानीस कारणीभुत होवु शकतो हे माहीत असतानाही काही पालक स्वतःचे मुलाचे सुरक्षिततेचा विचार न करता अल्पवयीन मुलास वाहन चालविणेस देत असतात. त्यामुळे अशा प्रकारे दुचाकी वाहन चालविणेस देणारे पालक/मालक यांचेवर वाहतुक शाखेमार्फत वेळोवेळी कारवाई करण्यात येते. तसेच विविध शाळांना भेटी देवुन वाहतुक नियमांबाबत विदयार्थ्यांना प्रबोधन केले जात आहे.

तरी परंतू कोल्हापूर शहरात अल्पवयीन मुले / मुली यांचेमध्ये दुचाकी चालविण्याचे प्रमाणात वाढ झालेली असून या प्रवृत्तीस आळा बसावा या करीता मा. पोलीस अधीक्षक, श्री. नीलोत्पल यांनी दिले सुचनेनुसार, मा. अपर पोलीस अधीक्षक व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग यांचे मार्गदर्शना नुसार शहर वाहतूक नियंत्रण शाखा, कोल्हापूर यांचे वतीने अल्पवयीन मुलांना दुचाकी वाहन चालविण्यास पालकांचे विरुध्द मोटर वाहन (सुधारणा) अधिनियम सन २०१९ मधील कलम १९९ (अ) नुसार शाहुपूरी -०८, राजारामपूरी ०३, जुनाराजवाडा-०१, व लक्ष्मीपुरी-०३ असे एकुण १५ गुन्हे शहरातील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करुन सदर गुन्हयात वाहने जप्त करण्यात आली आहेत.

शकते. अल्पवयीन मुलास वाहन चालविणेस दिलेस खालील प्रमाणे कायदेशीर कारवाई होवू

१. पालक/मालक यांना ३ वर्षापर्यंत तुरुंगवास होवू शकतो त्यासोबत २५०००/- रुपयाचा दंड भरावा लागतो.

२. ज्या वाहनाचा वापर अल्पवयीन मुलाने केला आहे त्या वाहनाचे रजिस्ट्रेशन (आरसी) १२ महिन्यासाठी रद्द केले जाते.

३. संबंधीत मुलांवर बाल न्याय कायदया अंतर्गत खटला चालविला जातो.

४. अल्पवयीन मुलास वयाची २५ वर्षे पुर्ण होईतो पर्यंत ड्रायव्हिंग लायसन्स मिळविणेस अपात्र ठरतो.
5. -२-

तरी शहर वाहतूक शाखा, कोल्हापूरचे वतीने सर्व नागरिक / वाहनचालक यांना आवाहन करण्यात येते की, अल्पवयीन मुलास वाहन चालविण्यास देवू नये. अल्पवयीन मुलास वाहन चालविणेस देवुन नियमांचे उल्लंघन करणारे वाहनधारकांवर कारवाईची मोहीम पुढील काळातही व्यापक स्वरुपात राबविण्यात येणार आहे, तरी नागरीकांनी/वाहनचालकांनी कायदेशीर कारवाई टाळावी,

सदरची कारवाई शहर वाहतुक शाखेकडील पोनि मोरे यांचे निरीक्षणाखाली पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.

Previous Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *