Uncategorized

सोमनाथ पतसंस्थेची अल्पावधीत गरुड झेप-आमदार अशोकराव माने


पेठ वडगांव: येथील सोमनाथ पतसंस्थेची 20 वी वार्षिक सर्वसाधारण सभा येथील सत्य अनंत मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दलित मित्र डॉ.मा.आम. अशोकराव माने (बापू)उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना त्यांनी संस्थेने अल्पावधीत केलेल्या कार्याचे कौतुक केले संस्थापक चेअरमन अशोकराव माळी यांच्या अथक परिश्रमाबद्दल व त्यांनी हजारो बेरोजगारांना नोकरी देण्यासाठी फूड प्रकल्प उभारण्याचे काम सुरू केले त्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या.
व या उद्योग समूहासाठी कोणतीही मदत लागेल त्यावेळी मदत करेन अशी ग्वाही त्यांनी दिली


यावेळी बोलताना सोमनाथ उद्योग समूहाचे संस्थापक चेअरमन अशोकराव माळी यांनी अहवाल वाचन करून प्रास्ताविक मनोगत व्यक्त करताना संस्थेने 31 मार्च 26 अखेर संस्थेने 41 एक कोटी 30 लाखच्या ठेवी व 295 कोटी 87 लाख व्यवसायाचा टप्पा पूर्ण करून 67 लाख 39 हजार इतका नफा झाल्याची माहिती दिली तसेच संस्थेचे कार्यक्षेत्र कोल्हापूर व सांगली जिल्हा असून सभासद ठेवीदार व कर्मचारी सर्व शाखांचे संचालक मंडळ यांचे सहकार्याने लवकरच पुणे विभागीय कार्यक्षेत्र घेणार असल्याची माहिती दिली. तसेच सभासदांनी व ठेवीदारांनी आपले व्यवहार संस्थेच्या सर्व शाखा मध्ये करावे तसेच संस्थेने आरटीजीएस व एनईएफटी सुविधा उपलब्ध केली असल्याची माहिती दिली.


सभेच्या सुरुवातीला दिवंगत सद्गुरु दीनानाथ महाराज (कांडगावकर) तसेच शिक्षण महर्षी माजी राज्यपाल डॉक्टर डी. वाय पाटील यांना व संस्थेचे मॅनेजर प्राची माळी ,दिलीप कुंभार यांना संस्थेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली
यावेळी संस्थेच्या सभासदांच्या इयत्ता दहावी बारावी मध्ये पास झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांचे हस्ते करण्यात आला. तसेच संस्थेचे उत्कृष्ट पिग्मी एजंट व उत्कृष्ट शाखा वडणगे, पेठ वडगाव, वाठार यांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल सत्कार करण्यात आला तसेच संस्थेचे असिस्टंट ज. मॅनेजर नागनाथ माळी यांचा संस्थेच्या वसुलीमध्ये मोलाचे काम करून झिरो टक्के एन.पी.ए करण्यामध्ये त्यांनी व त्यांच्या टीमने काम केले त्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे स्वागत गीत जयवंत हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी गायले यावेळी संस्थापिका रूपाली माळी, व्हा चेअरमन बजरंग माळी संचालक हंबीरराव देसावळे, देवाप्पा चोपडे,महेशकुमार नाझरे, संपतराव पाटील, संतोष जाधव, संजय धोंगडे, संचालिका दिपाली माळी, सर्व शाखांचे चेअरमन व ,संचालक मंडळ शाखा मॅनेजर विक्रांत माळी ,युवराज जाधव व सर्व शाखा मॅनेजर,कर्मचारी उपस्थित होते या मिटींगचे सूत्रसंचालन दिलीप पवार सर यांनी केले प्रास्ताविक नागनाथ माळी यांनी केले आभार कृष्णात माळी यांनी मानले
.

Previous Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *