
लातूर, दि. १५ (जिमाका) : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासोबतच जिल्ह्याला जलसुरक्षित आणि अधिक सक्षम बनविण्याचा संकल्प पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला. भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मुख्य शासकीय समारंभात त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या, तसेच स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाला अभिवादन केले.
या समारंभास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उषाताई पाटील, लातूर शहर महानगरपालिकेच्या महापौर जयश्रीताई सोनकांबळे, जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, महानगरपालिका आयुक्त राहुल कुलकर्णी यांच्यासह लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, शहीद जवानांचे कुटुंबीय, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्वातंत्र्यसैनिकांच्या स्वप्नातील सक्षम, समृद्ध आणि आत्मनिर्भर भारत घडविणे ही आपली जबाबदारी आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ संकल्पनेत महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्य विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत असल्याचे पालकमंत्री श्री. भोसले यांनी सांगितले.
*चौकट*
———–
*५४ हजार ३८८ शेतकऱ्यांची कर्जमुक्तीची पहिली यादी*,
*जलसंधारण सप्ताहात सहभागाचे आवाहन!*
*रस्ते आणि पायाभूत सुविधांना गती*,
*१२ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ*,
*३७ हजार ७५८ लाभार्थ्यांना शासकीय सेवांचा लाभ*
*युवकांनी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पुढे यावे!*
प्रारंभी वंदे मातरम् गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. पोलीस निरीक्षक मोहन ठोंबरे यांच्या पथकाने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. उत्कृष्ट सेवा पदक प्राप्त पोलीस अधिकारी तसेच पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव फड यांनी केले
.