Uncategorized

शहरातून ऊस वाहतूक करणा-या व वेळेचे उल्लंघन करणा-या तसेच मोटार वाहन कायद्याचे उल्लंघण करणा-या ७६ ट्रॅक्टर वर कारवाई ७४,७५०/- रु.दंड केले बाबत.शहर वाहतुक नियंत्रण शाखा, कोल्हापूर यांच्याकडून प्रसिद्ध-नियमावलीचे पालन करण्याचे आव्हान

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सन २०२५-२६ करीता सुरु झाला आहे. शहरातील वाहतुक कोंडी टाळण्यासाठी आणि नागरीकांच्या सुरक्षिततेसाठी मा.पोलीस अधीक्षक, कोल्हापूर, यांचे आदेशान्वये शहरातुन ऊस वाहतुक करणारे वाहनांना दि. ३०/१०/२०२६ रोजी पासून गळीत हंगाम संपेपर्यंत कोल्हापूर शहरातुन रात्री १०.०० वा.ते सकाळी ०६.०० वा.याच वेळेमध्ये करण्याची परवानगी देण्यात आली असुन ताराराणी सिग्नल चौक ते दाभोळकर सिग्नल चौक ते सीपीआर हॉस्पीटल चौक ते छ.शिवाजी महाराज पुतळा चौक ते पापाची तिकटी ते गंगावेश या मार्गावर कोणत्याही प्रकारचे ऊस वाहतुकीचे ऊसाने भरलेले अथवा रिकामे वाहन वाहतुक करणार नाही असे निर्देश दिलेले आहेत.

असे निदर्शनास आले आहे की, काही ऊस वाहतुकदार ट्रॅक्टर चालक हे वरील प्रमाणे दिलेल्या निर्देशांचे पालन करीत नाहीत सदर निर्देशांचे व मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करुन शहरातील प्रतिबंधित मार्गावरुन वाहतुक करतात त्यामुळे शहरातील मुख्य चौकामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होवुन अपघाताचा धोका वाढला आहे.

या पार्श्वभूमीवर मा.पोलीस अधीक्षक,यांचे आदेशान्वये मा.अपर पोलीस अधीक्षक, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग यांचे मार्गदर्शना खाली शहर वाहतुक नियंत्रण शाखेमार्फत विशेष मोहीम राबवुन नियमभंग करणा-या बेशिस्त वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये कठोर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे ती खालील प्रमाणे –
अ.नं. मोटार वाहना कायदा उल्लंघनाचा प्रकार-केसेस -दंड
०१ रिफ्लेक्टर नसणे. -केसेस २५- दंड २५०००
०२ जाहीरनामा – निर्देशाचे पालन न करणे- केसेस १५-दंड ११२५०
०३ विना लायसन्स- केसेस ०२- दंड १००००
०३ लायसन्स जवळ न बाळगणे -केसेस-०९ दंड-७५००
०४ विहीत नमुना नंबरप्लेट नसणे केसेस ०१ – दंड १०००
०५ सिग्नल जंप-केसेस ०३- दंड १५००
०६ वन-वे प्रवेश-केसेस-०९- दंड ४५००
०७ तुटलेली नंबरप्लेट- केसेस ०५- दंड -२५००
०८ मोबाईल टॉकींग- केसेस ०२ दंड – ६०००
०९ पोलीसांचा इशारा न पाळणे- केसेस ०३ दंड- १५००
१० इन्शुरन्स न काढणे- केसेस ०२ दंड-४०००
तरी सर्व ऊस वाहतुकदार,ट्रक,ट्रॅक्टर चालकांनी प्रशासनाने प्रसिध्द केलेल्या वेळेचे काटेकोरपणे पालन करावे शहरामधील रहदारीचे आतील मुख्य रस्ते,किंवा सिग्नल चौकातुन ऊस वाहतुक करताना कोणी आढळुन आल्यास तसेच मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्यास संबंधीत वाहनांवर दंडात्मक कारवाईसह वाहन जप्त करण्याची कठोर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.ऊस वाहतुक करणारे वाहनधारक यांनी मा.पोलीस अधीक्षक,कोल्हापूर यांनी दिलेल्या निर्देशाचे पालन करावे, असे आवाहन
(नंदकुमार मोरे)
पोलीस निरीक्षक
शहर वाहतुक नियंत्रण शाखा, कोल्हापूर यांनी केले आहे.

https://youtu.be/FiRzeB_xT_g

Previous Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *