बैठक में मरीजों एवं परिजनों के हित में सकारात्मक बदलाव हेतु स्वास्थ्य सुविधाओ को बेहतर बनाने एवं अन्य प्रमुख बिंदुओं पर विस्तृत चर्चा कर जिला कलेक्टर महोदय को प्रस्ताव भेजे गए।
बैठक के दौरान पर्यावरण संरक्षण हेतु सार्थक पहल एक पेड़ मां के नाम अंतर्गत पौधारोपण किया ग
RAJESH CHOUDHREEComments Off on आज सौसर विधानसभा क्षेत्र के मोहखेड़ विकासखण्ड अंतर्गत स्थित सामुदायिक स्वास्थ्य केन्द्र मोहखेड में पांढुरना विधायक श्री निलेश जी उइके के साथ रोगी कल्याण समिति की महत्वपूर्ण बैठक में सहभागी हुआ। 200
चौरे साहब अपने पूरे कार्यकाल में झूठा श्रेय लेने में कोई कसर नहीं छोड़ रहे। जिसने कभी बुनकरों की समस्याओं की सुध नहीं ली, वो आज उनके हितैषी बनने की कोशिश कर रहै है — शर्मनाक!
असल हकीकत ये है कि भारतीय जनता पार्टी पांढुर्ना के यशस्वी जिलाध्यक्ष श्री संदीप मोहोड जी ने स्वयं कुटीर एवं ग्रामोद्योग मंत्री श्री दिलीप जायसवाल जी से संपर्क कर बुनकरों की समस्याएं रखीं और उनके बकाया भुगतान को लेकर गंभीरता दिखाई। इसी पहल का नतीजा है कि दिनांक 25-06-2025 को बुनकरों के पक्ष में आदेश जारी किया गया।
अब जब मेहनत किसी और की है और निर्णय भी पहले हो चुका है, तब चोरे साहब बीच में कूदकर झूठा श्रेय बटोरना चाहते हैं —”यही इनकी असली राजनीति है न काम, न योगदान, सिर्फ दिखावा और झूठ का प्रचार!“
RAJESH CHOUDHREEComments Off on झूठा श्रेय लेने में माहिर विधायक विजय चोरे 263
कोल्हापूर: पेठवडगाव हून येत असणारा HR-67 D-4380 हा अवजड ट्रक पुणे बेंगलोर महामार्गावरील टोप येथील पुला खालून वाठारकडे जात असताना टोप येथील पुलाची उंची कमी असल्याने उंच असणारा ट्रक पुलाखाली अडकला त्यामुळे कोल्हापूरहून पेठवडगाव कडे जाणाऱ्या वाहनांची सुमारे एक तास वाहतुकीची कोंडी निर्माण झाली सदर पुलाची उंची कमी असल्याचे ट्रक ड्रायव्हरला अंदाज आला नसल्याने त्यांनी ट्रक गतीने पुलाखालून घेतला जवळपास ट्रकचा अर्धा भाग अडकला होता यावेळी
स्थानिक प्रवाशांच्या मदतीने व वाहन चालकांच्या माध्यमातून ट्रक बाहेर काढण्यास मदत झाली अशा घटना या वारंवार या महामार्गाचे पुला खाली होत आहेत पुलाच्या दोन्ही बाजूला कोणत्याही प्रकारचे जास्त उंचीचे अवजड वाहन जाण्यास व येण्यास बंदी असल्याबाबतचे फलक लावलेले दिसत नाहीत आशा सर्वच ठिकाणी फलक लावणे गरजेचे असल्याने प्रशासनाने या बाबतीत सदर महामार्गावरील सर्वच पुलांच्या दोन्ही बाजूला बोर्ड लावावे त्यामुळे अवजड वाहन चालक सावध होऊन दुसऱ्या मार्गाने वाहतूक करू शकतात त्यामुळे असे कोणतेही प्रकार घडू नयेत व सामान्य नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने दखल घ्यावी अशी मागणी सामान्य नागरिकांतून व वाहन चालकातून होत आहे.
नाशिक: प्रतिनिधी, संतोष रायचंदे दि.०४/०७/२०२५ रोजी दुपारचे सुमारास सैय्यद पिंप्री येथील फिर्यादी श्री धनंजय झोमान यांचे बंद घराचे दरवाजाले कडी-कोंडा तोडून आत प्रवेश करून बेडरूममधील लोखंडी कपाटाचे लॉकर तोडून फिर्यादी यांचे संमतीशिवाय लबाडीचे इराद्याने कोणीतरी अज्ञात चोरटयाने घरफोडी करून सोन्या चांदीचे दागिने एकुन २,५५,०००/- रूपये किंमतीचा ऐवज बोरून नेला म्हणून नाशिक तालुका पोलीस ठाणेस गुरनं १०३/२०२५ भा.न्या. सं. कलम ३०५(अ) ३३१(३) प्रमाणे गुन्हा दाखल होता.
सदर घरफोडीचे गुन्हयाचे तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र मगर व नाशिक तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीमती मृदुला नाईक यांचे पथकाने यातील आरोपीताची गुन्हा करण्याची पध्दत व घटनास्थळांवर मिळून आलेल्या तांत्रिक बाबीचे अचुक विश्लेषन करून मिळविलेल्या गुप्त माहितीचे आधारे, तपास पथकाने सराईत गुन्हेगार नामे योगेशकुमार देविदास तायडे, वय ४३. हल्ली रा. रिगल हिल, खडकी, पुणे मुळ रा. जामनेर रोड, भुसावळ, जि. जळगाव यास शिताफिने ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेवुन सखोल चौकशी केली त्याने दि. ०४/०७/२०२५ रोजी मोटर सायकलवर सैयद पिंप्री या गावी जावुन, बंद घरांची टेहाळणी करून वरील बंद घर फोडून सोन्या-यांदीचे दागिने चोरी केल्याबी कबुली दिली आहे.
यातील आरोपी योगेशकुमार तायडे यास वरील गुन्हयात अटक करण्यात आली असुन त्याचे कब्जातुन गुन्हयामध्ये चोरीस गेलेले सोन्या चांदीचे दागिन्यांपैकी ३६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व चांदीच्या बस्तु, रोख ३४,५००/- रूपये, गुन्हयात वापरलेली यामाहा कंपनीची मोटर सायकल व हेल्मेट, मोबाईल फोन असा एकूण ४,६८,९०० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. सदर आरोपीवर यापूर्वी खडकी पोलीस ठाणे जि. पुणे येथे खुन व शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे, तसेव उपनगर पोलीस ठाणे नाशिक शहर येथे देखील चोरीचा गुन्हा दाखल आहेत. सदर आरोपीकडून वरील गुन्हयाचे तपासात घरफोडीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पेठ उपविभाग श्री. बासुदेव देसले यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र मगर, नाशिक तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीमती मृदुला नाईक, पोउनि अश्विनी मोरे, पोलीस अंमलदार निलेश मराठे, योगेश पाटील, अरूण रहिरे, नवनाथ आडके, नंदु सानप, संतोष घोडेराव, विकास कराड, तसेव स्थागुशाचे पोहवा संदिप नागपुरे, सचिन गवळी, धनंजय शिलावटे, हेमंत गिलबिले प्रदिप बहिरम, नितीन गांगुर्डे यांचे पथकाने सदरचा गुन्हा उघडकीस आणुन कारवाई केली आहे.
नाशिक : प्रतिनिधी,संतोष रायचंदे नाशिक ग्रामीण जिल्हयातील राज्य व राष्ट्रीय महामार्गावरून अंमली पदार्थ गांजाची होणारी अवैध तस्करी रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांचे आदेशान्वये प्रभावी कारवाई करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र मगर यांचे पथकाने समृध्दी महामार्गावर शिवडे, ता. सिन्नर परिसरात सापळा रचुन गांजावी अवैधरित्या तस्करी करणारे दोन चारवाकी वाहनांवर छापा टाकून सुमारे १२१ किलो ४२९ ग्रॅम वजनाचा अवैध गांजा जप्त करून कारवाई केली आहे. दिनांक १२/०७/२०२५ रोजी समृधी महामार्गाने नागपुर कडून मुंबई बाजुकडे दोन वारचाकी वाहनांमध्ये गांजाची मोठयाप्रमाणावर तस्करी होणार असल्याची गोपनीय बातमी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र मगर यांना मिळाली होती. बातमीप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे ०४ पथके तयार करून शिन्नर पोलीस ठाणे हद्दीत समृध्धी महमार्गावर गस्तीवर नेमण्यात आले होते. दरम्यान नागपुर बाजुकडून मुंबईच्या दिशेने एक सफेद रंगाची स्विफ्ट व एक चॉकलेटी रंगाची होण्डा अमेझ कार भरधाव वेगाने येतांना दिसली, सदर वाहनांचा पोलीस पथकाने शिताफिने पाठलाग केला असता, त्यापैकी स्विफ्ट कार यू-टर्न मारून नागपुर दिशेने भरधाव वेगात गेली, व अमेझ कार ही मुंबईच्या दिशेने पळून गेली. दोन्ही वाहनांचा पोलीस पथकाने पाठलाग करून स्विफ्ट कार ही कोकमठाण टोलनाका परिसरात अडविले, तसेच अमेझ कार मधील चालकाने शिवडे गावचे शिवारात वाहन सोडून, तेथून पलायन केले. सदर दोन्ही ठिकाणांवरून ताब्यात घेतलेले इसम व वाहनांची पंचासमक्ष झडती घेतली असता त्यांचे ताब्यात खालीलप्रमाणे मुद्देमाल मिळून आला.
१२१ किलो ४२९ ग्रॅम वजनाचा गांजा (किं.रू. २४,२८,५८०/- चा), वाहतुक करण्यासाठी वापलेली एक सफेद रंगाची मारूती स्विफ्ट कार, एक चॉकलेटी रंगाची होण्डा अमेझ कार, ०३ मोबाईल फोन, १५,००० रूपये रोख असा एकुण ३६,२९,५८०/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपीची नावे:-
१) भारत नारायण चव्हाण, वय ३५, रा. आण्णाभाऊ साठे नगर, नेवासा, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर
यातील आरोपी हे विनापरवाना बेकायदेशीररित्या मानवी मनावर विपरीत परिणाम करणारा गांजा नावाचा अंमली पदार्थ आपले कब्जात करण्यासाठी बाळगुन त्याची अवैधरित्या वाहतुक करतांना मिळुन आले म्हणुन त्यांचेविरूब्द सिन्नर पोलीस ठाणेस एन.डी.पी.एस. कायदा कलम ८ (क), २०(ब), (ग), (क), २२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील ताब्यात असलेले आरोपींना वरील गुन्हयात अटक करण्यात आली असून मा. न्यायालयाने त्यांची १६/०७/२०२५ पावेतो पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास चालु आहे.
सदर गुन्हयातील फरार आरोपी सुनिल भास्कर अनार्थे हा नाशिक शहरातील कुख्यात टिप्पर गॅंगचा सराईत गुन्हेगार असून त्याचेवर यापूर्वी नाशिक शहरातील अंबड, सातपुर, सरकारवाडा पोलीस ठाण्यांमध्ये मोक्का, घरफोडी, चोरी, आर्म अॅक्ट, खुनाचा प्रयत्न यासारखे गंभीर स्वरूपाचे एकुण ११ गुन्हे दाखल आहेत. तो सध्या श्रीरामपुर व शिर्डी परिसरात वास्तव्यास आहे. तसेब त्याचा वरील साथीदार संदिप कचरू भालेराव यावेवर देखील पुणे, बुलढाणा, अहिल्यानगर जिल्ल्यात दरोडा व बोरी याप्रकारचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर आरोपी हे ओडीसा राज्यातून चारचाकी वाहनांमधुन गांजावी तस्करी करत होते, तसेच महाराष्ट्र राज्यात गांजाची विक्री कोठे करणार होते याबाबत पोलीस पथक कसोशिने तपास करीत आहे.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सुचनां प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रविंद्र मगर, सपोनि जिवन बोरसे, पोउनि सुदर्शन बोडके, सपोउनि नवनाथ सानप, पोलीस अंमलदार सचिन धारणकर, विनोद टिळे, सचिन गवळी, माधव साळे, श्रीकांत गारूंगे, सुधाकर बागुल, नवनाथ वाघमोडे, किशोर खराटे, शरद धात्रक, धनंजय शिलावटे, विश्वनाथ धारबळे, प्रितम लोखंडे, नवनाथ शिरोळे, आबा पिसाळ, योगिता काकड, रविंद्र गवळी यांचे पथकांनी सदरची कामगिरी केली आहे.
Krishnat MaliComments Off on समृध्दी महामार्गाने गांजाची तस्करी करणारी टोळी जेरबंद-नाशिक ग्रामीण पोलीसांची धडक कारवाई १२१ किलो ४२९ ग्रॅम गांजा जप्त 404
मुंबई : (विशेष प्रतिनिधी), राष्ट्रीय अपराध ज्यांच ब्युरो नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य शाखा मुंबई के जॉईंट डायरेक्टर पंधरा वर्षे से अच्छा कार्य निभाते हुए,प्रमोशन मिला I *नागरी सुरक्षा हक्क परिषद CRPC* राज्य संचालक पद के लिये डायरेक्टर जनरल मा. सुरेशजी शुक्ला साहब ने प्रमोशन देकर नियुक्ती किये I इसलिये महाराष्ट्र राज्य शाखा जिल्हा लातूर NCIB के डिस्ट्रिक्ट डायरेक्टर शिरीषकुमार शेरखाने सरने देवेंद्रजी वखारिया साहब का शाल श्रीफळ पुष्पगुच्छ और स्वीट देकर स्वागत किया I और आगे अच्छे काम के लिए शुभकामना दिये I
Shirishkumar SherkhaneComments Off on *CRPC महाराष्ट्र राज्य संचालक पदके लिये देवेंद्रजी वखारिया सहाब की नियुक्ती* 257
नाशिक: प्रतिनिधी संतोष रायचंदे मालेगाव शहरातील पवारवाडी पोलीस ठाणे येथे गुरनं १६३/२०२५ भा. न्या. सं. कलम १०९, ३५२, ३५१ (२) (३), सह भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५, २७ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयातील फिर्यादी अनिस अहमद शकिल अहमद, रा. के. जी. एन. नगर, मालेगाव यांनी त्यांचा भाऊ अख्तर काल्या उर्फ शाहीद अख्तर शकिल अहमद यास त्याचे इतर इसमांशी झालेल्या भांडणात मदत केली नाही, या कारणावरून कुरापत काढून फिर्यादी अनिस अहमद यांना शिवीगाळ करून “आज तुझे जानसे मार दूंगा” असे म्हणुन आरोपी अख्तर काल्या याने त्याचे हातातील गावठी कट्टा फिर्यादीचे दिशेने धरून फिर्यादीस जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने राऊंड फायर केले, त्यात एक राऊंड फिर्यादीचे डाव्या पायाचे गुडघ्याला लागुन त्यांना गंभीर दुखापत केली म्हणून गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हा केल्यानंतर यातील आरोपी अख्तर काल्या व त्याचे साथीदार हे फरार झाले होते.
सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री. तेगबीर सिंह संधू, उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव कॅम्प विभाग श्री. सुरज गुंजाळ यांनी यातील आरोपीतास तात्काळ अटक करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा व पवारवाडी पोलीसांचे पथक रवाना केले होते. सदर घटना घडल्यानंतर यातील आरोपी अस्तर काल्या याने त्याचे इतर साथीदारांसह मालेगाव शहरातून पलायन केले होते, त्यानुसार स्थागुशाचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र मगर यांना खब-यांमार्फत मिळालेल्या बातमीनुसार यातील फरार आरोपी हा चाळीसगाव शहरात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यावरून स्थागुशाचे पथकाने वरील गुन्हयाचे समांतर तपासात चाळीसगाव शहरातून यातील सराईत गुन्हेगार अख्तर काल्या उर्फ शाहीद अख्तर शकिल अहमद, वय ४०, 1. के. जी. एन. नगर, मालेगाव, ता. मालेगाव, जि. नाशिक यास ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेवुन चौकशी केली असता, दि.२४/०६/२०२५ रोजी फार्मसी कॉलेज परिसरात त्यास मालेगावातील शफिक उर्फ जॉली दादा यावे इतर ०३ साथीदारांनी मागील भांडणाची कुरापत काढून मारहाण करून चाकुने वार करून जखमी केले होते. सदर भांडण झाल्यानंतर आरोपी अख्तर काल्या याचा मोठा भाऊ अनिस अहमद याने त्यास मदत केली नाही याचा राग मनात धरून त्याचेवर गावठी कट्टयामधून फायर केल्याची कबुली दिली आहे.
यातील आरोपी अख्तर काल्या उर्फ शाहीद अख्तर शकिल अहमद याचे अंगझडतीमधुन एक देशी बनावटीचे गावठी पिस्तूल व ०५ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आले आहे. त्यास वरील गुन्हयाचे पुढील तपासकामी पवारवाडी पोलीस ठाणेस हजर करण्यात आले आहे. सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असुन त्यावेवर यापुर्वी मालेगाव शहरातील पवारवाडी, आझादनगर, मालेगाव शहर पोलीस ठाण्यांमध्ये दरोडा तयारी, आर्म अॅक्ट, खंडणी, प्राणघातक हल्ला, दंगा, दुखापत यासारखे गंभीर स्वरूपाचे एकुण ११ गुन्हे दाखल आहेत.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री. तेगबीर सिंह संधू, उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव कॅम्प विभाग श्री. सुरज गुंजाळ यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थामिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र मगर, पोउनि दत्ता कांभीरे, पोलीस अंमलदार सचिन धारणकर, गोरक्षनाथ संवत्सरकर, शरद मोगल, सचिन वराडे, संदिप राठोड, योगेश कोळी, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम यांचे पथकाने यातील आरोपीस ताब्यात घेवुन घातक अग्निशस्त्र हस्तगत केले आहे.
Krishnat MaliComments Off on मालेगाव शहरात फायर करून प्राणघातक हल्ला करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद देशी बनावटीचे पिस्तूल व ०५ जिवंत काडतुसे हस्तगत स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 1286
. नाशिक : प्रतिनिधी संतोष रायचंदे दि. २६/०६/२०२५ रोजी मालेगाव छावणी पोलीस ठाणे हद्दीत जुना आग्रा रोड परिसरातील सुजन टॉकिजचे आवारात मोकळे जागी एक २५ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळुन आला होता. सदरसा मृतदेह हा युवक नामे अमोल मोहन निकम २५, एकता नगर, गवळीवाडा, मालेगाव यांचा असलेचे तपासात निष्पन्न झाले होते. यातील मयतास कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी रुमालाने (गमछाने) गळा आवळून जिवे ठार मारले म्हणून मालेगाव छावणी पोलीस ठाणे गुरनं १६९/२०२५ भा.न्या स.कलम १०३(१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंह संधू, उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव कॅम्प विभाग श्री. सुरज गुंजाळ यांनी सदर घटनेचा आढावा घेवुन नमुद खुनाचा गुन्हा उघडकीस आणणेसाठी तपास पथकांना सुचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र मगर यांचे पथकाने घटनास्थळाची बारकाईने पाहणी करुन यातील मयत इसन नामे अमोल मोहन निकम, वय २५, रा. एकता नगर, गवळीवाडा, मालेगाव याचे दैनंदिन कामकाज व राहणीमानबाबत गुप्त बातमीदारांकडे माहिती घेतली. घटनेच्या दिवशी सायंकाळचे सुमारास मयत हा एका मोटर सायकलवर बसुन गेला असल्याचे समजले होते तसेच मयत हा शेवटचा कोणास भेटला याबाबत सविस्तर माहिती घेवुन, तासाची चक्रे फिरवुन स्थानिक गुन्हे शाखेतचे पथकाने संशयीत नामे विशाल मारूती गवळी, वय ३८, रा.एच.पी. गॅस गोडाऊन समोर, कैलास नगर, मालेगाव यास ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेवुन वरील खुनाचे गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी केली असता, यातील मयत अमोल निकम याने आरोपी विशाल गवळी यास शिवीगाळ करुन आपआपसात वाद झाल्याचा राग मनात धरून, भगव्या रंगाचे रुमालाने (गमछाने) मयताचा गळा आवळून जिवे ठार मारले असल्याबाबत कबुली दिली आहे. सदर आरोपीस गुन्हयाचे पुढील तपासकामी मालेगाव छावनी पोलीस ठाणेस हजर करण्यात आले असुन पुढील तपास चालु आहे.
नाशिक ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री. तेगबीर सिंह संधू, उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव कॅम्प विभाग श्री. सुरज गुंजाळ यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रविंद्र मगर, पोउनि दत्ता कांभीरे, पोउनि सुदर्शन बोडके, सपोउनि नवनाथ सानप, पोलीस अंमलदार सचिन धारणकर , गोरक्षनाथ संवत्सरकर, शरद मोगल, गिरीष निकुंभ, नरेंद्र कोळी, योगेश कोळी, संदिप राठोड, विनोद टिळे, नवनाथ शिरोळे, हेमंत गिलबिले,प्रदिप बहिरम यांचे पथकाने वरील खुनाचा गुन्हा उघडकीस आणुन कामगीरी केली आहे.
Krishnat MaliComments Off on मालेगावातील सुजन टॉकीज परिसरात झालेल्या खुनाचा १२ तासात उलगडा नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी. 406
नाशिक ग्रामीण जिल्हयातील मोटर सायकल चोरीचे वाढत्या गुन्हयांना प्रतिबंध होण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील यांनी नाउघड गुन्हयांचा आढावा घेवून कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्याअनुयंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने मोटर सायकल चोरीचे गुन्हयांतील आरोपीचे सध्याचे वास्तव्याबाबत तसेच चोरीच्या मोटर सायकल कोठे विक्री केल्या जातात याबाबत सविस्तर माहिती घेवून मालेगाव शहरातील मोटर सायकल चोरांना ताब्यात घेवून कारवाई केली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र मगर यांचे पथकातील अधिकारी व अंमलदार हे नाउघड मोटर सायकल चोरीचे गुन्हयांचा समांतर तपास करीत असतांना, गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मालेगाव शहर व नाशिक जिल्हयातील खेडोपाडयांमधून चोरी केलेल्या मोटर सायकल कमी किंमतीचे भावात विकी करण्यासाठी काही संशयीत मालेगाव तालुक्यातील सोयगाव येथे येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती. त्यावरून पोलीस पथकाने सोयगाव, ता. मालेगाव परिसरात सापळा रचुन खालील संशयीतांना ताब्यात घेतले आहे.
४) नदिम अहमद नासीर अहमद, रा. करीम नगर, मालेगाव (फरार)
ताब्यात घेतलेले वरील संशयीतांचे कब्जात मिळून आलेल्या होण्डा युनिकॉर्न मोटर सायकलचे कागदपत्रांबाबत विचारपुस केली असता, त्यांनी उड़वा उडवीची उत्तरे दिली, त्यांना विश्वासात घेवून सखोल चौकशी केली असता त्यांनी सदरची मोटर सायकल पवारवाडी, मालेगाव परिसरातुन चोरी केल्याची कबुली दिली आहे.
यातील ताब्यात घेतलेले वरील आरोपी क. १ ते २ यांचेकडे मोटर सायकल चोरीचे गुन्हयांचे समांतर तपासात अधिक चौकशी केली असता त्यांनी मालेगाव, सटाणा, कळवण, तसेच नाशिक शहर व जिल्यातील खेडोपाड्यांमधुन एकुण ११ मोटर सायकली चोरी केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपीनी कबुली दिल्यावरून पवारवाडी पोलीस ठाणेकडील गुरनं १५८/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०३(२) प्रमाणे दाखल असलेला गुन्हा उपडकीस आलेला आहे.
यातील ताब्यात घेतलेले आरोपीचे कब्जातुन चोरीच्या ०३ हिरो स्प्लेंडर, ०२ होण्डा युनिकॉर्न, ०१ हिरो एचएफ डिलक्स, ०१ यामाहा आरएक्स १००, ०१ होण्डा शाईन, ०१ सुझुकी अॅक्सेस ०१ पेंशन प्रो., ०१ हिरो ड्युएट अशा एकूण चोरीच्या ११ मोटर सायकल किं. रु. ०४ लाख ६० हजार वा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर आरोपींना पवारवाडी पोलीस स्टेशनकडील वरील गुन्हयात अटक करण्यात आली असून त्यांचेकडून मोटर सायकल चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
मोटर सायकल चोरीचे गुन्हयांमधील अभिलेखावरील आरोपीतांचे सध्याचे ठाव ठिकाणांबाबत माहिती काढण्यास पोलीस पथकांना सुचना देण्यात आलेल्या असून यापुढेही वरीलप्रमाणे सत्वर कारवाई करण्यात येणार आहे.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. आदित्य मिरखेलकर, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री. तेगबीर सिंह संधू यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र मगर, पोउनि दत्ता कांभीरे, पोउनि सुदर्शन बोडके, सपोउनि नवनाय सानप, पोलीस अंमलदार सुभाष चोपडा, दिपक गुंजाळ, विनोद टिळे, विशाल गोसावी, नवनाथ शिरोळे, किरण बैरागी, कैलास मानकर, दत्तात्रय माळी, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम यांचे पथकाने चोरीच्या ११ मोटर सायकल हस्तगत बा करून कामगिरी केली आहे.
Krishnat MaliComments Off on मालेगावातील मोटर सायकल चोरी करणारे चोरटे स्थानिक गुन्हे शाखेचे जाळयात चोरीच्या ११ मोटर सायकल हस्तगत 277
नाशिक: प्नतिनीधी संतोष रायचंदे नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. बापाटील यांनी अशीत केल्याप्रमाणे, जिल्हयातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन तसेच सराईत गुन्हेगारीस प्रतिबंध होण्यासाठी सत्वर कारवाई करणयात येत आहे. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र मगर यांचे पथकाने पिंपळगाव पोलीस ठाणे हद्दीत अवैधरित्या अंमली पदार्थ गांजावी विक्री करणारे इसमावर छापा टाकून कारवाई केली आहे.
दिनांक २५/०६/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र मगर यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार पिंपळगाव शहरातील रोड परिसरात एक इसम हा अवैधरित्या अंमली पदार्थ विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हा शाखेचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी टाकून अंमली पदार्थ गांजाची अवैधरित्या विक्री करणारा इसम नामे अनिकेत संदिप खैरनार, वय २२, रा. उंबरखेड रोड, भावनगर, पिंपळगाव बसवंत, ता. निफाड, जि. नाशिक यास ताब्यात घेवून त्यातून किं. ४,७२,२००/- या २३ किलो ६१० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. सदर इसम हा विनापरवाना बेकायदेशीररित्या मानवी मनावर विपरीत परिणाम करणारा गांजा नावाचा अंमली पदार्थ कब्जात बाळगुन विक्री करतांना मिळुन आला असून त्याचे विरूद्ध पिंपळगाव पोलीस ठाणेस एन.डी.पी.एल. कायदा कलम ८ (क), २०(ब) ||(ब) प्रमाणे गुन्हा करण्यात आला अहे.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री. आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सुचनां प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र मगर, पोउनि प्रकाश भालेराव पोलीस अंमलदार नवनाथ वाघमोडे, संदिप नागपुरे,सतिष जगताप, किशोर खराटे, सतिष घुटे, विश्वनाथ धारबळे, योगिता काकड, किशोर बोडके, बालाजी कुंटेवाड, चापोहवा संतोष पाटील, तानाजी झुरडे यांचे पथकाने वरील प्रमाणे कारवाई केली आहे.
Krishnat MaliComments Off on पिंपळगाव बसवंत परिसरात अवैधरित्या गांजाची विक्री करणारे इसमावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा २३ किलो ६१० ग्रॅम वजनावा गांजा जप्त 238