Krishnat Mali

जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने ४ ते १९ जानेवारी पर्यंत रक्तदान महायज्ञाचे महाराष्ट्र सह इतर राज्यांमध्ये १ लाखांहून अधिक रक्त बाटल्याचे संकलनाचे उद्दिष्ट तर कोल्हापूर जिल्ह्यातून ४ हजार रक्त बॉटल संकलित करण्याचे उद्दिष्ट

कोल्हापूर: जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान तर्फे रक्तदान महायज्ञाचे आयोजन केले जाते प्रतिवर्षाप्रमाणे दिनांक ४ जानेवारी ते १९ जानेवारी २०२५ पर्यंत रक्तदान महायज्ञाचे आयोजन महाराष्ट्र सह इतर राज्यामध्ये करण्यात आले आहे यामध्ये १ लाखाहून अधिक रक्त बॉटल महाराष्ट्र शासनाच्या रक्त पेढ्यांना देण्यात येणार आहे.
महाराष्ट्रात सिकलसेल,ॲनेमिया, हिमोफिलीया, थॅलेसेमिआ, ब्लड कॅन्सर, किडनी फेल्युअर पेशंट जास्त आढळतात अशा रुग्णांना वारंवार रक्ताची नितांत आवश्यकता असते यासाठी महाराष्ट्र शासनाच्या रक्तपेढयांना रक्त बाटल्या देण्याचे संप्रदाया मार्फत निश्चित केले आहे प्रति वर्षाप्रमाणे सांप्रदायाच्या मार्फत ही कोल्हापूर जिल्हा सेवा समिती अंतर्गत १२ तालुक्यात कॅम्प आयोजन केले असुन जिल्ह्यामध्ये ४० कॅम्पच्या माध्यमातून . सुमारे ४ हजार रक्त बॉटल संकलित करण्याचे उद्दिष्टे ‌ पूर्ण करण्याचे जिल्हा सेवा समितीच्या वतीने चालू सुरू आहे

तारीख – ०४-०१-२०२५ तालुका – करवीर ठिकाण – रेडीयंट हॉटेल तालुका – पन्हाळा पोस्ट – सावर्डे ठिकाण – दत्त मंदिर तारीख- ०५-०१-२०२५ तालुका – गगनबावडा ठिकाण – खोपडेवाडी तालुका – भुदरगड पोस्ट – मडीलगे ठिकाण – अंबाबाई मंदिर तालुका – हातकणंगले पोस्ट – कोरोची ठिकाण – भाग शाळा तालुका – कागल पोस्ट – कागल ठिकाण – कागल सिटी तालुका – करवीर पोस्ट – उंचगाव ठिकाण – मंगेश्वर मंदिर तालुका – पन्हाळा पोस्ट – कळे ठिकाण – PHC तालुका – पन्हाळा पोस्ट – सुळे ठिकाण – विद्या मंदीर सुळे तालुका – पन्हाळा पोस्ट – बोरगाव ठिकाण – गणेश मंदीर तालुका – राधानगरी‌ पोस्ट – सोळांकुर ठिकाण – सांस्कृतिक हॉल तालुका – शाहूवाडी पोस्ट – बांबवडे ठिकाण – मारुती मंदीर तारीख – ०६-०१-२०२५ तालुका – हातकणंगले
पोस्ट – शिरोली पुलाची ठिकाण – बिरूदेव मंदीर
तालुका – शिरोळ पोस्ट – यड्राव ठिकाण – रेणुका मंदीर तालुका – शिरोळ पोस्ट – जयसिंगपूर
ठिकाण – प्राथमिक आरोग्य केंद्र तालुका – कागल पोस्ट – बिद्री ठिकाण – कामगार सोसायटी हॉल बिद्री तारीख – ०७-०१-२०२५ तालुका – शाहूवाडी
पोस्ट – पार्ले निनाई ठिकाण – प्राथमिक आरोग्य केंद्र
तालुका – शिरोळ पोस्ट – जयसिंगपूर ठिकाण – प्राथमिक आरोग्य केंद्र तारीख – ०८-०१-२०२५
तालुका – कागल पोस्ट – सिद्धनेर्ली ठिकाण – बिरूदेव मंदीर तालुका – शाहूवाडी पोस्ट – नेर्ले ठिकाण -जोतिबा मंदीर तारीख – १०-०१-२०२५ तालुका – गगनबावडा ठिकाण – सळवन तालुका – भुदरगड पोस्ट – गारगोटी ठिकाण – जय गो माता मॉल तालुका – आजरा पोस्ट – आजरा ठिकाण – आजरा महाविद्यालय तारीख -१२-०१-२०२५ तालुका – आजरा पोस्ट – सरोळी ठिकाण – महादेव मंदिर तालुका – गडहिंग्लज पोस्ट – गडहिंग्लज ठिकाण – शिवाजी चौक तालुका – हातकणंगले पोस्ट – पट्टण कोडोली ठिकाण – बिरुदेव मंदीर तालुका – हातकणंगले पोस्ट – पेठवडगाव ठिकाण – सत्य अनंत मंगल कार्यालय तालुका – हातकणंगले पोस्ट – वाठार ठिकाण – मारुती मंदीर तालुका – राधानगरी पोस्ट – राशिवडे ठिकाण – मारुती मंदीर तालुका – पन्हाळा पोस्ट – माजगाव ठिकाण – विठ्ठल मंदिर तालुका – शाहूवाडी पोस्ट – मालेवाडी ठिकाण – मल्हारी मंदीर तालुका – पन्हाळा पोस्ट – कोडोली तारीख -१३-०१-२०२५ तालुका – चंदगड पोस्ट – शिनोळी ठिकाण – राम मंदीर तालुका – करवीर पोस्ट – सांगरुळ ठिकाण – महादेव मंदिर तारीख – १८-०१-२०२५तालुका – शाहूवाडी पोस्ट – नादांरी ठिकाण -ग्रामपंचायत जवळ तारीख – १९-०१-२०२५ तालुका – भुदरगड पोस्ट – अकुर्डे ठिकाण – ज्योतिर्लिंग मंदीर तालुका – चंदगड पोस्ट – पोवाचीवाडी ठिकाण – रवळनाथ मंदीर तालुका – करवीर पोस्ट – कसबा बावडा ठिकाण – मंगेश्र्वार मंदीर तालुका – हातकणंगले पोस्ट – लाटवडे ठिकाण – नरसिंह मंदीर वरील प्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रक्तदान शिबिराचे कॅम्प आयोजित केले असून यामध्ये जिल्ह्यातील सर्व युवकांनी व रक्तदात्यानी यामध्ये सहभाग घ्यावा असे अहवाहन कोल्हापूर जिल्हा सेवा समिती च्या वतीने करण्यात आले आहे हा रक्तदान महायज्ञ सोहळा संपन्न करण्यासाठी संप्रदायातील युवा सेना हिंदू संग्राम सेना महिला सेना तालुका कमिटी तसेच सेवा केंद्र कमिटी व जिल्हा सेवा समिती व आजी माझी पदाधिकारी व सर्व विशेष कार्यवाहक प्रयत्न करत आहेत.

पुणे बेंगलोर महामार्गावर किनी टोल नाका ते कोगणोळी टोल नाका दरम्यान रस्त्याचे काम सुरू असून अर्धवट कामामुळे वाढले अपघाताचे प्रमाण प्रशासनाचे दुर्लक्ष

पुणे बेंगलोर महामार्गावर किनी टोल नाका ते कोगणोळी टोल नाका दरम्यान रस्त्याचे काम सुरू असून अर्धवट कामामुळे वाढले अपघाताचे प्रमाण प्रशासनाचे दुर्लक्ष

कोल्हापूर; पुणे बेंगलोर या राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे किणी टोल नाका ते कोगणोळी टोल नाका दरम्यान महामार्गाचे काम सुरू असून गेली बरेच दिवस होऊन गेले रस्त्याच्या कामाला गती नाही जागो जागी पुलाचे काम अर्धवट स्थितीत आहे कोणत्याही एका बाजूचे काम पूर्ण झालेले दिसत नसेल प्रत्येक ठिकाणी अर्धवट अर्धवट काम सुरू आहे या रस्त्यावरून कोल्हापूर शहरात आसपासच्या गावातून जिल्ह्यातील गावातून शाळा महाविद्यालय साठी विद्यार्थी तसेच आसपासच्या एरियामध्ये साखर कारखाने सुद्धा आहेत तसेच शिरोली कागल गोकुळ शिरगाव येथे एमआयडीसी असलेले मोठे मोठे उद्योगधंदे या भागात आहेत या रस्त्यावरून एमआयडीसीचीही कर्मचारी इंडस्ट्रियल कंपन्यांची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे हा रस्ता गेले दीड वर्ष पासून काम सुरू आहे परंतु सदर रस्ता कोणत्याही एका बाजूने पूर्ण झालेला दिसत नाही दोन्ही बाजूने अपूर्ण कामे अर्धवट स्थितीत दिसत आहे कोल्हापूर शहर हे महाराष्ट्र राज्यातील पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य व महत्त्वाचे शहर असून या शहरांमध्ये व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटन स्थळ व तीर्थक्षेत्र असून दररोज या शहरांमध्ये महाराष्ट्र मधून व इतर राज्यायातून भाविक व पर्यटक वाहनाच्या माध्यमातून येत आहेत तसेच कोल्हापूर पासून जवळच कागल गोकुळ शिरगाव व पुलाची शिरोली येथे मोठ्या प्रमाणात एमआयडीसी सुरू असून या रोडवरती मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते तसेच या रस्त्यावरून कोल्हापूर शहरात ये जा करत असताना रहदारीमुळे वाहन चालकांना तासंतास तारेवरची कसरत करावी लागत आहे अशा अर्धवट कामामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून प्रशासनाने या बाबतीत लक्ष घालून हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावा अशी मागणी वाहन चालक व नागरिकांतून केली जात आहे.

पुणे बेंगलोर हायवे ते रत्नागिरी रोड जोडणाऱ्या शिये फाटा ते भुयेवाडी या रस्त्यावरती काम चालू असलेने वाहतुकीची होते कोंडी

कोल्हापूर: पुणे बेंगलोर हायवे ते रत्नागिरी रोडला जोडणारा शिये फाटा ते वडणगे रोड वरती शिये ते भुयेवाडी या रस्त्याचे गेली सहा महिने झाले काम सुरू आहे या रस्त्याचे आरसीसी रस्ता बनवण्याचे काम चालू असून रस्त्याच्या एका बाजूचे काम चालू असून एका बाजूची काम अपूर्ण आहे रस्ता अरुंद असल्यामुळे या रस्त्यावरती वाहतूक मोठ्या प्रमाणात चालू असते
या रोडला लागून शिये व टोप या गावची हद्द असून या गावचे हद्दी मध्ये दगडाच्या खाणी व खडी क्रेशर यांची संख्या जास्त आहे त्यामुळे मोठ्या डंपर व ट्रकची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्यातच आता सध्या साखर कारखान्याच्या ऊस वाहतुकीचे ट्रॅक्टरची वाहतूक सुद्धा याच रस्त्याने सुरू असून या रस्त्याला दुसरा पर्याय रस्ता नसल्याने वाहन चालक व नागरिकांना वाहन चालवीत असताना त्रास होत आहे ह्या रस्त्याचे ठेकेदार किंवा प्रशासनाने या ठिकाणी दोन्ही बाजूला वाहन सोडत असताना तिथे दिशा दाखवण्यासाठी मुजरांची व्यवस्था करून दोन्ही बाजूंनी एका एका वेळेची वाहने सोडून वाहतूक सुरळीत करणे गरजेचे आहे सदर काँक्रीट रस्ता भराव करून उंच केला असल्याने साईडला साईड पट्टी कोठेही दिसत नाही त्यामुळे दोन वाहनांनी एकेरी मार्गातून वाहतूक ये जा केल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावा अशी मागणी नागरिकातून होत आहे


चिन्मय कृष्णदास यांच्या सुटकेसाठी, तसेच बांगलादेशी हिंदूंच्या रक्षणासाठी भारत सरकारने हस्तक्षेप करावा !- हिंदु राष्ट्र समन्वय समिती



कोल्हापूर – बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी कायदेशीर मार्गाने आंदोलन करणार्‍या बांगलादेशातील इस्कॉनचे प्रमुख स्वामी चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अन्याय्य अटक करण्यात आली आहे. ही अटक म्हणजे हिंदू अल्पसंख्याकांचे हक्क दडपण्याचा आणखी एक प्रकार आहे, याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. भारत सरकारने तातडीने पावले उचलून चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांची विनाअट सुटका व्हावी आणि हिंदू अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी तेथील सरकारला भाग पाडावे. भारताने बांगलादेशशी असलेले सर्व संबंध तोडावेत आणि प्रसंगी सैनिकी कारवाई करण्यास मागेपुढे पाहू नये, अशी एकमुखी मागणी हिंदु राष्ट्र समन्वय समिती वतीने ३ डिसेंबर या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आलेल्या आंदोलनात करण्यात आली. या वेळी इस्कॉनसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे १५० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते.

स्वामी चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांनी हिंदूंवर होणार्‍या अन्यायाला विरोध करत शांततापूर्ण मार्गाने आपले हक्क मागितले. त्यांच्या अटकेने बांगलादेशातील हिंदूंच्या धर्मस्वातंत्र्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. हिंदूंवरील हे अत्याचार रोखले नाही, तर त्याचे लोण भारतात येण्यास वेळ लागणार नाही; म्हणून हिंदूंना भारत सरकारकडून कठोर भूमिका आणि निर्णायक पावले उचलण्याची मागणी या प्रसंगी करण्यात आली.

या वेळी ह.भ.प. महादेव यादव महाराज, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे, ‘इस्कॉन’चे श्री. राहुल देशपांडे, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे करवीरतालुकाप्रमुख श्री. राजू यादव, हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाप्रमुख श्री. दीपक देसाई आणि शहरप्रमुख श्री. गजानन तोडकर, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. आनंदराव पवळ, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक श्री. अभिजित पाटील, शिवशाही फाऊंडेशनचे संस्थापक श्री. सुनील सामंत, डॉ. अश्‍विनी माळकर, राष्ट्रहित प्रतिष्ठानचे श्री. शरद माळी, श्री. प्रसन्न शिंदे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. या वेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले, श्री. अर्जुन आंबी, श्री. विकास जाधव, ‘इस्कॉन’चे प्रमुख श्री. दीपक खोत, श्री. हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, श्री संप्रदायाचे जिल्हाध्यक्ष श्री. कृष्णात माळी, ‘महाराजा प्रतिष्ठान’चे संस्थापक श्री. निरंजन शिंदे, मराठा तितुका मेळवावाचे श्री. योगेश केरकर, ‘स्वयंसिद्धा’च्या सौ. स्मिता डोंगरकर,हिंदु महासभेच्या महिला आघाडीप्रमुख सौ. शीलाताई माने यांसह अन्य उपस्थित होते.

उपस्थित संघटना आणि पक्ष – शिवसेना, इस्कॉन, हिंदू एकता आंदोलन, हिंदू महासभा, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, महाराष्ट्र मंदिर महासंघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदु जनजागृती समिती, वारकरी संप्रदाय, सनातन संस्था, मराठा तितुका मेळवावा, महाराजा प्रतिष्ठान, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, भाजप
इत्यादी उपस्थित होते यावेळी सर्वानुमते भारताने बांगलादेशाशी असलेले सर्व संबंध तोडावे आणि प्रसंगी सैनिकी कारवाई करावी – १५० हून अधिक हिंदूंची छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकमुखी मागणी केली असलेली माहिती
श्री. आनंदराव पवळ शिवानंद स्वामी
‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’यांनी दिली

कृष्णा नदी वरून उदगाव ते अंकली जाणाऱ्या पुलावरती वाढले अपघाताचे प्रमाण प्रशासनाचे दुर्लक्ष आत्तापर्यंत १८ बळी

कोल्हापूर: कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांच्या सीमेवर कृष्णा नदीवरील उदगाव ते अंकली पुलाच्या परिसरात अपघाताचे प्रमाण वाढले आहे यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग व प्राधिकरण विभागाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते‌ गुरुवारी येथील जुन्या पुलावरून चार चाकी गाडी पडून तिघांचा बळी गेल्याने सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडालीआहे जानेवारी मध्येही याच पुलावरून कार कोसळली पण सुदैवाने तिघांचा जीव वाचला यापूर्वी ही असीच घटना घडली होती सातत्याने होत असलेल्या अपघातांच्या घटनांमुळे नागरिकांचे बळी जात आहेत आतापर्यंत १८ लोकांचे बळी गेले आहेत या घटनांना कोण जबाबदार उदगाव-अंकली जाणारा हा पूल ब्रिटिश कालीन असुन सुमारे १३५ वर्षाचा पुल आहे त्यासोबत नवीन पूल उभारला आहे असे एकूण या मार्गावर दोन पुल आहेत त्यालगत मिरज कोल्हापूर रेल्वे मार्गाचा पुल असून जुन्या पुलावर अनेक खड्डे पडले आहेत पुलाच्या सुरवातीपासून खड्डे भरून डांबरीकरण करणे गरजेचे आहे त्यामुळे अनेक वाहन चालकांचा वाहनावरील ताबा सुटून अपघात वाढत आहेत दोन्ही बाजूला झाडे झुडपे ही वाढली आहेत तीही काढण्यात आलेली नाहीत पुलाच्या दोन्ही बाजूला कोणत्याही प्रकारे माहिती फलक सूचनाफलक लावलेले नाहीत त्यामुळे वाहन चालकांना वाहन चालविताना रस्त्याचा अंदाज येत नाही त्यामुळे वेगाने वाहन जाऊन अपघात होत आहेत गुरुवारी मध्यरात्री याच जुन्या पुलावरून तुटलेल्या संरक्षण कटड्यातून चार चाकी फुलावरून खाली कोसळल्याने तिघांचा बळी गेला आहे अशा घटना वारंवार घडत असल्यामुळे प्रशासन का दुर्लक्ष करीत आहे अशी चर्चा नागरिकांना मधून होत आहे यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय प्राधिकरण विभागाने या पुलाचे तुटलेले संरक्षण कटडे दुरुस्ती करणे गरजेचे आहे तसेच रस्त्याच्या दोन्ही पुलाच्या परिसरात पांढरे पट्टे व व दिशादर्शक फलक लावणे व पूल असल्याच्या सुचना व वाहनाची गती दर्शविणे गरजेचे आहे कृष्णा नदीवरील उदगाव ते अंकली पुलावरील संरक्षण कठड्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय प्राधिकरण विभागाने दखल घेऊन दुरुस्त करावे अशी मागणी नागरिकातून होत आहे.