कोल्हापूर: हातकणंगले तालुक्यातील सर्व नागरी सहकारी पतसंस्थांची 31 जानेवारी रोजी शासनाच्या अंशदान विरोधी तसेच ठेव विमा संरक्षण व पालक अधिकारी नेमणुकी स विरोध या मागण्यासाठी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आहे या दिवशी तालुक्यातील सर्व पतसंस्था कामकाज बंद ठेवून तालुका उपनिबंधक सहकारी संस्था हातकणंगले यांना निवेदन देणार आहेत अशी माहिती परिपत्रकातून दिली आहे या संपात कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पतसंस्थांनी पाठिंबा देण्याचे आवाहन ही करण्यात आले. अंशदान चा फटका राज्यातील सर्व मोठ्या पतसंस्थांना बसणार असून अंशदान विरोधात लढाई संघटितपणे सर्वच पातळ होणे काळाची गरज असल्याने जवाहर छाबडा सहकार भारती यांनी 17 जानेवारी रोजी इचलकरंजी येथील सभेत व्यक्त केली होती यावेळी 31 जानेवारी हातकणंगले तालुक्यातील पतसंस्था लाक्षणिक बंद ठेवून हा बंद आपल्या सर्व सहकार्याने यशस्वी करून शासनाला अंशदान विरोधातील लढाई तीव्रतेने लढली जात आहे याची जाणीव करून देण्यासाठी सर्वांनी निर्धार करून उद्या या संपास सर्व संस्था चेअरमन व्हा चेअरमन मंडळ सदस्य जनरल मॅनेजर मॅनेजर या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्वच स्टाप यानी उपस्थित राहावे असे आवाहन हातकणंगले तालुका ग्रामीण बिगर शेती नागरी महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी सेवक पतसंस्था कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुधाकर पिसे उपाध्यक्ष अनिल हजारे व जनरल सेक्रेटरी महेश कडाले यांनी केले.
Krishnat MaliComments Off on हातकणंगले तालुक्यातील पतसंस्थांचा उद्या उपनिबंधक कार्यालय येथे लाक्षणिक संप 288
कोल्हापूर: हातकणंगले तालुक्यातील सर्व नागरी सहकारी पतसंस्थांची 31 जानेवारी रोजी शासनाच्या अंशदान विरोधी तसेच ठेव विमा संरक्षण व पालक अधिकारी नेमणुकी स विरोध या मागण्यासाठी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आहे या दिवशी तालुक्यातील सर्व पतसंस्था कामकाज बंद ठेवून तालुका उपनिबंधक सहकारी संस्था हातकणंगले यांना निवेदन देणार आहेत अशी माहिती परिपत्रकातून दिली आहे या संपात कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पतसंस्थांनी पाठिंबा देण्याचे आवाहन ही करण्यात आले. अंशदान चा फटका राज्यातील सर्व मोठ्या पतसंस्थांना बसणार असून अंशदान विरोधात लढाई संघटितपणे सर्वच पातळ होणे काळाची गरज असल्याने जवाहर छाबडा सहकार भारती यांनी 17 जानेवारी रोजी इचलकरंजी येथील सभेत व्यक्त केली होती यावेळी 31 जानेवारी हातकणंगले तालुक्यातील पतसंस्था लाक्षणिक बंद ठेवून हा बंद आपल्या सर्व सहकार्याने यशस्वी करून शासनाला अंशदान विरोधातील लढाई तीव्रतेने लढली जात आहे याची जाणीव करून देण्यासाठी सर्वांनी निर्धार करून उद्या या संपास सर्व संस्था चेअरमन व्हा चेअरमन मंडळ सदस्य जनरल मॅनेजर मॅनेजर या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्वच स्टाप यानी उपस्थित राहावे असे आवाहन हातकणंगले तालुका ग्रामीण बिगर शेती नागरी महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी सेवक पतसंस्था कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुधाकर पिसे उपाध्यक्ष अनिल हजारे व जनरल सेक्रेटरी महेश कडाले यांनी केले.
Krishnat MaliComments Off on हातकणंगले तालुक्यातील पतसंस्थांचा उद्या उपनिबंधक कार्यालय येथे लाक्षणिक संप 220
कोल्हापूर : संभाजीनगरमधील सिल्लोडमध्ये एक लाखाहून अधिक बांगलादेशी घुसखोरांना बोगस प्रमाणपत्र वाटप करण्यात आल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अभिनेता सैफ अली खान यांच्या निवासस्थानी घुसून हल्ला करणार्या मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद या बांगलादेशी घुसखोराला अटक करण्यात आली. तो बनावट नावाने मुंबईत वास्तव्य करत होता. केवळ मुंबईच नव्हे, तर नवी मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, सोलापूर यांसह राज्यभरात बांगलादेशी घुसखोरांचा अक्षरश: सुळसुळाट झाला आहे. यातून राज्याच्या सुरक्षेला मोठा गंभीर धोका निर्माण झाला असून सामाजिक अस्थिरता, गुन्हेगारी वाढ, रोजगाराची समस्या, तसेच खोट्या कागदपत्रांवर वास्तव्य करणार्यांचे मोठे रॅकेट राज्यात सक्रिय असल्याचे दिसून येते. तरी सरकारने देशभरात बांगलादेशी घुसखोर शोध मोहीम’ राबवावी आणि घुसखोरांना साहाय्य करणार्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी 27 जानेवारीला शिवाजी महाराज चौक येथे घंटानाद करून हिंदु राष्ट्र जागृती आंदोलनाद्वारे करण्यात आली. या प्रसंगी 175 हून अधिक विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपस्थित होते. देशव्यापी होणार्या या आंदोलनाचा कोल्हापूर येथे शंखनाद करण्यात आला. या आंदोलनात हिंदू एकता आंदोलनाचे शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे आणि करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. आनंदराव पवळ आणि श्री. किरण कुलकर्णी, राष्ट्रहित प्रतिष्ठानचे श्री. शरद माळी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी आणि सौ. राजश्री तिवारी, शिवशाही फाऊंडेशनचे संस्थापक श्री. सुनील सामंत, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे, मंदिर महासंघाचे कोल्हापूर जिल्हा सहसमन्वयक श्री. अभिजित पाटील यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. उपस्थित मान्यवर – शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले, श्री. विकास जाधव, विश्व हिंदु परिषदेचे श्री. अनिल दिंडे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे श्री. सुशील भांदिगरे आणि श्री. शशी बीडकर, श्री. अशोक गुरव, श्री. संजय माळी, हिंदू महासभा महिला आघाडीप्रमुख सौ. शिलाताई माने, हिंदू महासभेचे श्री. राजू तोरस्कर, श्री संप्रदाय जिल्हाध्यक्ष श्री. कृष्णात माळी, सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे रत्नागिरीतील चिपळूण १३ बांगलादेशी नागरिकांपैकी ३ जणांनाच अटक करण्यात आली; त्यातही पोलिसांनी हे प्रकरण नीट न हाताळल्यामुळे बांगलादेशी घुसखोरांना जामीन मिळाला, ही अतिशय गंभीर बाब आहे. नवी मुंबई, ठाणे, सोलापूर,पिंपरी-चिंचवड आदी शहरी भागांमध्येही शेकडो बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना अटक झाली. ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत १८ हजारांहून अधिक बेकायदेशीर घुसखोर राहत असल्याचा अंदाज आहे. तरी राज्यात ‘बांगलादेशी घुसखोर शोध मोहिम’ राबवावी; या अंतर्गत राज्यातील सर्वच जिल्हे, शहरे, तालुके येथील संशयित ठिकाणी ‘सर्च ऑपरेशन’ / ‘कोंम्बींग ऑपरेशन’ राबवून बांगलादेशी घुसखोरांना शोधून काढावे; बनावट ओळखपत्रे तयार करणार्या रॅकेटची पाळेमुळे उखडून त्यावर कठोर कारवाई करावी; भाड्याने खोली देण्याआधी घरमालकाने भाडेकरूंची, तसेच कामावर ठेवतांना कामगारांची योग्य ती चौकशी करावी, संशयास्पद आढळल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे; घुसखोरांना आश्रय देणारे, जामीन देणारे किंवा कोणत्याही प्रकारचे साहाय्य करणारे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशा मागण्या या प्रसंगी करण्यात आल्या.
Krishnat MaliComments Off on बांगलादेशी घुसखोर शोध मोहीम’ राबवा; घुसखोरांना साहाय्य करणार्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा – कोल्हापूर येथे हिंदु राष्ट्र जागृती आंदोलनाद्वारे मागणी 224
कोल्हापूर,:अंगणवाडी सेविकांच्या कामकाजात त्यांनी सातत्याने अपडेट राहणे, ज्ञानात भर घालणे गरजेचे आहे. अंगणवाडी सेविका पुर्व प्राथमिक शिक्षण देत असतात त्यामुळे त्यांचे काम जबाबदारीचे असते. ही जबाबदारी स्पष्ट करणारा हा व्हिडिओ संगोपन मासिकाचे संपादक अतुल देसाई यांनी तयार केला आहे.
Krishnat MaliComments Off on अंगणवाडी चे काम जवाबदारी याविषयी सविस्तर मार्गदर्शन संगोपनचे संपादक श्री अतुल देसाई 335
कोल्हापूर: खोची दुधगाव नदी पूलाला जोडला जाणाऱ्या दुधगाव ते नदी पूल एक किलोमीटर अंतर असणारा रस्ता अरुंद असलेने व पूलाच्या पूर्व व पश्चिम बाजूने अरुंद वळण असल्याने दोन्ही बाजूने दुहेरी वाहतूक सुरू असताना वाहन चालकांना वाहन चालवित असताना होत आहे त्रास सध्या वारणा नदीवरील हे पूल माजी खासदार राजू शेट्टी यांच्या खासदार फंडातून उभारण्यात आला असून नदीला पूर येत असल्याने पुलाची उंची वाढविली आहे पुलाच्या दुधगावकडील व खोची कडील बाजूस भराव नसल्याने रस्त्याचा भाग एकदम खाली आहे व वळण सुद्धा अपुरे असल्याने त्या ठिकाणी वाहतूक धोकादायक बनली आहे हा रस्ता सांगली व कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा जवळचा रस्ता असल्याने या रस्त्यावर वाहतूक नेहमी मोठ्या प्रमाणात होत आहे पूर्वी या नदीवरील जुन्या बंधाऱ्याहून वाहतूक सुरू होती तसेच या बंधाऱ्यावरून पेठवडगाव ते सांगली जाणारी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस सुद्धा सुरू होती हा रस्ता अरुंद वाहतुकीसाठी अडथळा होत असलेने नवीन पुल होऊन सुद्धा एसटी ची वाहतूक या रस्त्यामुळे बंद आहे त्यामुळे पेठवडगावहून सांगलीला जाणाऱ्या प्रवाशांना आष्टा मार्गे किंवा हातकणंगले मार्गे एसटी बस ने प्रवास करावा लागत आहे वारणा नदी परिसर शेतीप्रधान असलेले उसाची शेती मोठ्या प्रमाणात नदीकाठच्या परिसरात आहे त्यामुळे या रस्त्यावरून सध्या साखर कारखान्याचे ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टरांची संख्या भरपूर असलेने या रस्त्यावरून लहान किंवा मोठी दोन वाहने एका वेळेस ये जा करू शकत नाहीत या रस्त्याला ट्रॅक्टर चालक ऊस वाहतूक करत असताना एकदम मोठा चढ उतार लागलत असलेने पुलाजवळ चे वळण अरुंद व धोकादायक आहे प्रत्येक ट्रॅक्टर साठी चढ पास करण्यासाठी डब्बल ट्रॅक्टर जोडून ऊस वाहतूक करावी लागत आहे. वाहतुकीबरोबर दुसरे पाठीमागून येणारे वाहन चालक ही ओव्हरटेक करून जाण्याचा प्रयत्न करत असतात रस्ता रुंद असल्याने अपघात घडण्याचे प्रकार घडण्याची शक्यता येथे होत असल्याचे दिसून आहे त्यामुळे या रस्त्या बाबत सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील लोक प्रतिनिधीने लक्ष घालून हा रस्ता भराव रुंदीकरण करून नदी जवळील दोन्ही बाजूचे अरुंद वळण मोठे करून वाहतूक सुरळीत करावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे. हा रस्ता पूर्ण झाला तर पेठवडगाव ते सांगली जाणारी महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळाची बस पुन्हा आपली सेवा या मार्गाने देऊ शकेल. व या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांना सुद्धा सोयीचे होईल.
Krishnat MaliComments Off on वारणा नदीवरील नवीन पूला जवळील खोची ते दुधगाव जाणारा रस्ता वाहतुकी साठी ठरत आहे धोकादायक 276
कोल्हापूर:जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणिजधाम यांच्या वतीने दिनांक चार जानेवारी ते १९ जानेवारी यादरम्यान महाराष्ट्रामध्ये रक्तदान महायज्ञाचे आयोजन केले होते त्याच पार्श्वभूमीवर सेवा केंद्र लाटवडे यांच्या वतीने आज रविवार दिनांक १९ जानेवारी रोजी नरसिंह मंदिर लाटवडे येथे रक्तदान शिबिर आयोजित शिबिराचा उद्घाटन सोहळा सरपंच रणजीत पाटील सोमनाथ उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक माळी माजी सरपंच संभाजी पवार यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सचिन पाटील शिवदत्त पाटील बी.टी भोपळे सर माझी डेप्युटी सरपंच दिनकर पाटील भाऊ लालशिंग पाटील अशोक यादव भाजपचे शहाजी पाटील शिवाजी कोळी कर्मचारी सुरेश पाटील जयवंत हायस्कूलचे दिलीप पोवार सर इकबाल मुल्ला माजी ग्रामपंचायत सदस्य बापू माळी जिल्हाध्यक्ष कृष्णात माळी तालुकाध्यक्ष शंकरराव पाटील अर्पण ब्लड बँकेचे पी आर ओ माधव ढवळीकर यांच्यासह सेवा केंद्र पदाधिकारी उपस्थित होते. सदर शिबिरामध्ये लाटवडे गावातील सर्व तरुण मंडळाचे कार्यकर्ते विविध संस्थांचे व सोमनाथ उद्योग समूहाचे पदाधिकारी तसेच शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी स्वयंम स्फूर्तीने सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी जिल्हा सचिव दिलीप कोळी जिल्हा महिला अध्यक्षा प्रणाली पाटील जिल्हा कर्नल लक्ष्मण पुणेकर तालुका कॅप्टन सुरेश लोहार गगनबावडा तालुका सचिव शशिकांत पाटील यांनी भेट दिली. सकाळी ९ वाजल्यापासून सुरू झालेल्या कॅम्प मध्ये सायंकाळी ७ वाजेपर्यंत १७३ रक्तदात्यांनी उस्फूर्तपणे सहभाग घेऊन रक्तदान महायज्ञाचा संकल्प पूर्ण केला हे शिबिर संपन्न करण्यासाठी जिल्हा बिन प्रमुख आकाश साळुंखे जि पीठ जनगणना प्रमुख तुषार कदम तालुका बिन प्रमुख गुरुप्रसाद माळी तालुका ब्लड कॅम्प प्रमुख साहिल पाटील सेवा केंद्र कमिटी तानाजी पाटील सूर्यकांत निर्मळे लक्ष्मी निर्मळे प्राची माळी श्रुतिका माळी सुभाष पाटील मिणचेकर यांनी केले तर विशेष सहकार्य यश माळी गुरुप्रसाद माळी यांनी केले. कार्यक्रमाचे स्वागत दिलीप पवार सर यांनी केले तर प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष कृष्णात माळी केले आभार तालुकाध्यक्ष शंकरराव पाटील यांनी मानले.
Krishnat MaliComments Off on जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या वतीने आयोजित रक्तदान महायज्ञात लाटवडे येथे १७३ जणांचे रक्तदान 386
कोल्हापूर : जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेतून नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने महाराष्ट्रातील प्रमुख महामार्गावर ॲम्बुलन्स सेवा सुरू केली असून आत्तापर्यंत ५३ ॲम्बुलन्स महाराष्ट्राच्या राष्ट्रीय महामार्गावर विविध ठिकाणी सेवा बजावत आहेत याच अनुषंगाने सांगली कोल्हापूर रस्त्याला जोडणाऱ्या अंकली पूल येथे नेहमीच अपघात होत असतात जयसिंगपूर ते सांगली यादरम्यान ॲम्बुलन्स सेवा उपलब्ध नसल्याने गेल्या एक दीड महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात या पूल परिसरात अपघात वारंवार होत आहेत याची दखल घेऊन जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाने अंकली पूल येथील जयसिंगपूर पोलीस चौकी येथे आज जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मा.श्री. सत्यवान हाके यांच्या शुभहस्ते व उद्योगपती माजी नगराध्यक्ष जयसिंगपूर नगरपालिका मा. श्री प्रकाश झेले तसेच भाजपा युवा मोर्चा कोल्हापूर पूर्व जिल्हाध्यक्ष मा.श्री.डॉ.अरविंद माने व कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्री.कृष्णात माळी शिरोळ तालुका अध्यक्ष श्री.दिलीप चव्हाण व तालुका पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला त्यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक मा.श्री.सत्यवान हाके यांनी बोलताना संस्थानाने या ठिकाणी ॲम्बुलन्स सेवा सुरू केल्याबद्दल संस्थानाचे आभार मानले तसेच सांगली कोल्हापूर रोडला जोडणाऱ्या अंकली पूल परिसरात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे आणि या ठिकाणी ॲम्बुलन्स उपलब्ध होणे गरजेचे होते जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रेरणेतून आज अंकली पूल येथील जयसिंगपूर पोलीस चौकी येथे ॲम्बुलन्स सेवा सुरू केली या सेवेमुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ये जा करणाऱ्या लोकांना याचा फायदा होईल आणि ही विनामूल्य सेवा असल्यामुळे नागरिकांनी अपघात होताच ८८८८२६३०३० या संस्थानाच्या मोबाईल नंबर वरती कॉल करावा असे अवाहन त्यांनी केले. माजी नगराध्यक्ष श्री प्रकाश झेले यांनी संस्थांनाने केलेल्या विविध सामाजिक कार्याचे कौतुक केले तसेच भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष डॉ.श्री.अरविंद माने यांनी संस्थानाने महापुरामध्ये , रक्तदाना मध्ये देहदाना मध्ये चांगल्या प्रकारे कार्य केल्याबद्दल त्यांनी संस्थांनाचे आभार मानले जिल्हाध्यक्ष श्री कृष्णात माळी यांनी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेने संस्थांच्या आतापर्यंत ५३ ॲम्बुलन्स महाराष्ट्राच्या प्रमुख महामार्गावर विनामूल्य सेवा बजावत आहेत संस्थानाच्या वतिने आतापर्यंत ७६ मरणोत्तर देहदान झाले असल्याची माहिती दिली तसेच संस्थानाच्या वतीने महाराष्ट्रा मध्ये एक लाख रक्त बॉटल संकलित करण्याचे उद्दिष्टिचा रक्तदान महायज्ञ सुरू असल्याची माहिती दिली तर शिरोळ तालुका अध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी तालुक्यामध्ये राबवण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमाची माहिती दिली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका सचिव श्री.राजाराम काळे यांनी केले तर आभार श्री नितीन नरळे यांनी मानले यावेळी हाॲम्बुलन्स लोकार्पण सोहळा संपन्न करण्यासाठी अखिल भारतीय ॲम्बुलन्स विभाग सेक्रेटरी श्री. अभिजीत अवसरे व श्री. कमलाकर हजारे जिल्हा निरीक्षक श्री. विजय लगड यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका सेवा अध्यक्ष दिलीप चव्हाण तालुका महिला अध्यक्ष सुनीता हेरवाडे तालुका सचिव राजाराम काळे तालुका सामाजिक उपक्रम प्रमुख विजय माळी तालुका प्रसिद्धीप्रमुख शिवा घोरपडे सेवा केंद्र अध्यक्ष गणपती मोरे देवराम जंगले युवराज घोरपडे वैभव पाटील रमेश गावडे शशिकांत शिंदे उज्वला पवार तालुका आध्यात्मिक प्रमुख यांच्या सह सर्व पदाधिकारी महिला पदाधिकारी यांनी सहकार्य केले.
Krishnat MaliComments Off on जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या ॲम्बुलन्स सेवेचा लोकार्पण सोहळा अंकली पूल येथे उत्साहात संपन्न 311
कोल्हापूर: वाठार तर्फ वडगाव येथील दादाराव सर्जेराव कामत वय वर्ष ४० हे आज सकाळी ८.३० च्या सुमारास अंबप फाट्या जवळील राजेश मोटर कंपनीमध्ये कामावरती सायकल वरून चालले असता अंबप जवळ पुलाचे काम सुरू असल्याने ते सायकल सायकलवरून रस्ता क्रॉस करीत असताना पुण्याहून येणाऱ्या बोलेरो गाडी नंबर MH 50 U 4266 या गाडीने त्यांना जोराची धडक दिल्याने सायकल स्वार रस्त्याच्या कडेला जाउन पडले. जोराचे धडक बसलेले ते जखमी झालेत व सायकलचा चक्काचुरा झाला असून सदर घटनेची माहिती मिळताच वाठार ब्रिज खाली असलेली जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थांनाच्या ॲम्बुलन्स चे चालक अमित घोटवडे तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन सदर जखमी दादाराव कामत यांना ॲम्बुलन्स नं.MH 08 w 0142 मधून पेठ वडगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले त्यांच्यावर तेथे उपचार सुरू आहेत या आठवड्यातील याच ठिकाणचा हा दुसरा अपघात असून अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. रस्त्याचे काम जलद गतीने व्हावे रस्त्यावरती कोणतेही प्रकारचे वेग मर्यादेचे फलक लावलेले नाहीत तसेच पुलाजवळ काम चालू आहे तोपर्यंत दोन्ही बाजूला स्पीड ब्रेकर नाहीत त्यामुळे वारंवार अपघाताची संख्या वाढत आहे या अपघातामुळे सुमारे अर्धातास रस्त्यावरती एका बाजूने ट्राफिक जाम झाले होते तरी रस्ता प्रशासनाने याची लवकरात लवकर दाखल घ्यावी अशी मागणी नागरिकातून होत आहे.
Krishnat MaliComments Off on पुणे बेंगलोर हायवे अंबप फाट्याजवळ अपघात नरेंद्राचार्य महाराज संस्थांनाची ॲम्बुलन्स तात्काळ घटनास्थळी दाखल 352
कोल्हापूर: शिये कसबा बावडा रोडला जोडला जाणाऱ्या पंचगंगा नदी पुला वरती व पुला शेजारी बावड्या कडील बाजूला प्लॅस्टिक कचऱ्याचे साम्राज्य दिवशी दिवस वाढत आहे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे सध्या येथे कचऱ्याचा खच लागला असून नदीपात्रात सुद्धा कचऱ्याचे थर साचले आहेत नदी पात्रात प्रदूषण झाल्याने माशांचे व जलचर प्राण्यांचे मृत होण्याचे प्रमाण वाढत आहे प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे कित्येक वर्ष या ठिकाणी या रोडवरील असणारे व्यावसायिक कचरा आणून टाकत आहेत सदर कचऱ्याचे विल्हेवाट लावण्यासाठी आतापर्यंत कोणतेही व्यवस्था केलेली दिसत नाही तथापि कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन यांनी लक्ष घालून संबंधित व्यवसायिकांना कचऱ्याचे योग्य नियोजन करून तो कचरा कुंडीत मध्ये कसा ठेवता येईल याचे नियोजन करणं गरजेचे आहे पंचगंगा नदी ही नेहमी कोणत्या ना कोणत्या प्रदूषणाच्या माध्यमातून प्रदूषित होत आहे. या कचऱ्यामध्ये शिळे झालेले व वेस्ट झालेले अन्नपदार्थ टाकले जातात त्यामुळे येथे मुख्या प्राण्यांना पदार्थ खात असताना पोटामध्ये प्लास्टिक जाण्याची शक्यता नाकारता येत नाही या घटनेमुळे मुख्या प्राण्यांच्या जीवितासी खेळण्याचा प्रकार घडत आहे आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी स्वच्छ भारत अभियान हाती घेतले असले तरी कोल्हापूर शहराततून जाणाऱ्या प्रमुख रस्त्यावरच अशी अवस्था आहे तरी प्रशासनाने यामध्ये लक्ष घालून येथील कचऱ्याचे विल्हेवाट लावून पंचगंगा नदीचे या जिवन दायिनीचे प्रदूषणाच्या विळख्यातून रक्षण करावे अशी मागणी नागरिकातून व समाजाच्या विविध स्तरातून होत आहे.
Krishnat MaliComments Off on शिये कसबा बावडा रोडवरती पंचगंगा नदी पुला शेजारी कचऱ्याचे साम्राज्य प्रशासनाचे दुर्लक्ष 278
कोल्हापूर :महाराष्ट्र पत्रकार संघ, हातकणंगले तालुका यांच्या वतीने तहसीलदार कार्यालय येथे ६ जानेवारी आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती व पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी आमदार अशोकराव माने बापू , जि.प सदस्य अरुणराव इंगवले आण्णा,तहसीलदार सुशिल बेल्हेकर साहेब, गट विकास अधिकारी शबाना मोकाशी मॅडम, गटशिक्षणाधिकारी रवींद्र चौगुले साहेब,नगरसेवक राजू इंगवले दादा तसेच महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अनिल उपाध्ये आण्णा तालुकाध्यक्ष पापालाल सनदी व सर्व पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते
Krishnat MaliComments Off on महाराष्ट्र पत्रकार संघ, हातकणंगले तालुका यांच्या वतीने तहसीलदार कार्यालय येथे ६ जानेवारी आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती व पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा 273