कोल्हापूर : आज, १५ जून २०२५ रोजी कोल्हापूर जिल्ह्यात पेरणीच्या दृष्टीने दिलासादायक वातावरण झाले असून जिल्ह्यात पावसाने चांगली हजेरी लावली असून, पेरणीयोग्य स्थिती आहे.कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे, ज्यामुळे पेरणीसाठी चांगली परिस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी, विशेषतः घाट परिसरात, जोरदार पावसाची शक्यता असल्यामुळे बळीराजाने पेरणीला सुरुवात केली आहे. जिल्ह्यात भातशेतीची पेरणी अजूनही काही ठिकाणी पूर्ण झालेली नाही, पण पावसाने साथ दिल्यास लवकरच पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी ‘युनिक फार्मर आयडी’ योजना सुरू करण्यात आली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ घेणे सोपे होणार आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेती आणि घरांचे नुकसान झाले आहे, त्यामुळे प्रशासनाने योग्य ती मदत करण्याची तयारी दर्शविली आहे. हवामान विभागाने १५ जूनपर्यंत पेरणीसाठी वाट पाहण्याचा सल्ला दिला होता, त्यानुसार आता अनेक ठिकाणी पेरणीस सुरुवात झाली आहे. शासनाच्या विविध योजना आणि मदतीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. एकंदरीत, कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी बळीराजा पेरणीच्या कामात व्यस्त असून, पावसाने चांगली साथ दिल्याने दिलासा मिळाला आहे. सुरू झालेल्या पावसामुळे पेरणीसाठी बी बियाणे खते खरेदीसाठी कोल्हापूर शहरातील शाहूपुरी येथील व्यापारी पेठेतील सर्व कृषी सेवा केंद्रात बळीराजांनी केली गर्दी
Krishnat MaliComments Off on कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पावसाच्या हजेरीने बळीराजा पेरणीसाठी सज्ज 134
कोल्हापूर : पुणे बेंगलोर नॅशनल हायवे 48 या महामार्गाचे सध्या काम सुरू असून शनिवार 14 जून रोजी अंबप फाटा ,टोप व नागाव फाटा यादरम्यान उड्डाणपूलाचे काम सुरू असलेने साईड पट्टीवरून वळण रस्ता सुरू केला असल्याने सदरचा रस्ता हा अरुंद झाला असून अवजड वाहने वाहतूक करत असताना वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे आज ही या ठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती काही काळ वाहतूक थांबली होती या ठिकाणी महामार्ग वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ येऊन सदरची वाहतूक पुन्हा सुरू करून दिली अशा घटना वारंवार या महामार्गावरती घडत आहेत गेली दोन वर्षे झाली या महामार्कागाचे काम सुरू झाले असून महामार्गाच्या दोन्ही बाजूस अर्धवट कामे बंद अवस्थेत दिसतआहेत त्यामुळे या महामार्गावरती वारंवार अपघात ही होत आहेत कोणत्याही एका बाजूने महामार्गाचे काम पूर्ण झालेले दिसत नाही किणी टोल नाका ते कोगणोळी टोल नाका दरम्यान या महामार्गाचे काम सध्या बंद असल्याचे दिसत आहे शेजारच्या कर्नाटक राज्यामध्ये या महामार्गाचे काम जलद गतीने पूर्ण होत असलेचे दिसत आहे या महामार्गाचे काम जलद गतीने पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग व राज्य सरकारने लक्ष घालावे अशी मागणी सामान्य नागरिक व वाहन चालकाकडून केली जात आहे.
Krishnat MaliComments Off on पुणे बेंगलोर नॅशनल हायवे वरती वारंवार होत आहे वाहतुकीची कोंडी 210
कोल्हापूर : ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाटासह कोल्हापुरात गुरुवारी १२ जून सायंकाळी ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. जवळपास अर्धा तास पावसाने कोल्हापूर आणि परिसराला झोडपून काढले. गटारी व नाले भरुन पावसाचे पाणी रस्त्यावर पसरले. सखल भागात आणि रस्त्यावर पाणीच पाणी असे चित्र निर्माण झाले. ढगफुटीसदृश्य पावसामुळे काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली. सांय चार वाजण्याच्या जोरदार पावसाला सुरुवात झाली. ढगांचा गडगडाट होता. जोरदार पावसामुळे सगळीकडे पाणी साचले. शहरातील अनेक भागात घरात पाणी शिरले. झाडाच्या फांद्या मोडून वाहनावर पडल्याने दुचाकी व चारचाकीचे नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. पावसामुळे फेरीवाले, विक्रेत्यांची तारांबळ उडाली. वीज पुरवठाही काही वेळ खंडित करण्यात आला होता. पाचनंतर पावसाचा जोर ओसरला. तर १२ते १७ जूनपर्यंत महाराष्ट्रात जोरदार पावसाची हजेरी लागणार असल्याची माहिती भारतीय हवामान केंद्राच्या प्रादेशिक हवामान केंद्रानुसार, मिळाली नैऋत्य मौसमी पावसाने आता मुंबईसह अहिल्यानगरचा पट्टा व्यापला आहे .आता मान्सून पूर्वेकडील भागात म्हणजे विदर्भ ,छत्तीसगड ,ओडिसा या भागात येथे 48 तासात व्यापणार आहे .बंगालच्या उपसागरात दक्षिणेकडील भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय असल्याने कर्नाटका छत्तीसगड मराठवाडा तसेच कर्नाटकातील अंतर्गत भागात पावसाचा जोर वाढणार आहे . १२ ते १७ जून पर्यंत महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाची हजेरी राहणार असल्याचे सांगण्यात आलाय .कोकण मध्य महाराष्ट्रात तीव्र व अति तीव्र पावसाची हजेरी लागणार असून आजपासून पुढील तीन दिवस म्हणजेच १५ जून पर्यंत कोकणपट्ट्यात जोरदार पाऊस पडणार असल्याचं हवामान विभागाने सांगितला आहे .यावेळी वाऱ्याचा वेग ५० ते ६० किलोमीटर प्रति तास राहणार असून सोसाट्याच्या वाऱ्यासह ढगांचा गडगडाट व विजा पडण्याची शक्यता आहे .कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या दोन दिवसात प्रचंड पावसाची शक्यता आहे . पावसाचे तीव्र अलर्ट पुढील दोन दिवस हवामान विभागाने पावसाचे तीव्र अलर्ट दिले असून तळ कोकणासह दक्षिण मध्य महाराष्ट्रात रेड ऑरेंज अलर्ट देण्यात आले आहेत .विदर्भातही पावसाचा जोर येत्या काही दिवसात वाढणार आहे .दरम्यान मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण आहे .काही भागात हलक्या पावसाला सुरुवात झाली आहे
Krishnat MaliComments Off on कोल्हापूर सह राज्यात पाऊसाची दमदार हजेरी 164
कोल्हापूर : कोल्हापूर येथील ‘शिवाजी विद्यापीठ’, चे ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’, असा नामविस्तार करण्यात यावा या मागणीसाठी हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु राष्ट्र समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, 17 मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. १० सहस्रो हिंदूंनी एकमुखाने ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असा नामविस्तार झालाच पाहिजे, अशी मागणी केली. मोर्चाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. दसरा चौकातून चालू झालेला हा मोर्चा लक्ष्मीपुरी, व्हिनस कॉर्नर मार्गे ‘बी’ न्यूजच्या कार्यालयावरून जिल्हाधिकारी कार्यालय येथे समाप्त झाला. जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चा आल्यावर जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले. याच समवेत क्रूर औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण तात्काळ थांबवण्यासाठी कबरीला दिला जाणारा निधी बंद करावा, तसेच औरंगजेबाची कबर काढून टाकण्यात यावी, या मागणीचेही निवेदन देण्यात आले.
या मोर्चात विविध आध्यात्मिक संप्रदाय, हिंदुत्वनिष्ठ संघटना, पक्ष, तरुण मंडळे, विविध सामाजिक संघटना, व्यापारी संघटना यांचा प्रमुख सहभाग होता. या मोर्चात सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गगुरू स्वाती खाडये यांच्यासह निपाणी येथील प.पू. प्राणलिंग स्वामिजी यांचा सहभाग होता.
मोर्चाच्या अंती तेलंगणा येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी.राजासिंह, सनातन संस्थेचे श्री. अभय वर्तक, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट, छत्रपती ग्रुपचे संस्थापक श्री. प्रमोददादा पाटील यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात सहभागी असलेल्या मावळांचे वंशज यांनी मनोगत व्यक्त केले. यात प्रामुख्याने वीर शिवा काशीद यांचे वंशज श्री. आनंदराव काशीद, सरदार मालुसरे यांचे 13 वे वंशज कुनाल मालुसरे आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज यांनीही मनोगत व्यक्त केले.
* मान्यवरांची मनोगते ! –
नामविस्ताराला विरोध करणार्या पुरोगाम्यांना हिंदूंच्या संघटितपणाची शक्ती प्रत्युत्तर देईल ! – टी. राजासिंह, आमदार, तेलंगणा
आज आपण इथे केवळ नामविस्ताराच्या मोर्चासाठी एकत्र आलेलो नसून हिंदूंची अस्मिता, गौरव आणि हिंदवी स्वराज्याचा संकल्प करण्यासाठी एकत्र आलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ हे केवळ विद्यापीठ नसू तो आमचा स्वाभिमान आहे. इतकी वर्षे ‘छत्रपती’ ही पदवी लागू नये यांसाठी प्रयत्न करणे करणारे पुरोगामी आणि सेक्युलरवादी यांना जाहीर आव्हान देण्यासाठीच मी आलोय आणि हिंदूंच्या संघटितपणाची ही शक्ती इथे पाय रोवून उभी आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर आजही अनेक अतिक्रमण शिल्लक असून ही अतिक्रमणे शासनाने तात्काळ हटवली पाहिजेत, अन्यथा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी ती हटवण्याची मोहीम हातात घ्यावी लागेल. एकीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिराला देण्यासाठी प्रशासनाकडे निधी नाही, तर दुसरीकडे तेच पुरातत्व खाते संभाजीनगर येथील औरंगजेबाच्या कबरीवर मात्र लाखो रुपये खर्च करत आहे. हे आम्ही सहन करणार नाही. तरी औरंजेबाच्या कबरीच्या देखभालीसाठी खर्च केला जाणारा निधी तात्काळ सरकारने बंद करावा, तसेच ही कबरही काढून टाकण्यात यावी.
अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत नाव न पालटल्यास, तर संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन छेडणार ! – सुनील घनवट, हिंदु राष्ट्र समन्वय समिती
शिवजयंतीच्या दिवशीच छत्रपती शिवाजी महाराज अशी उपाधी देण्याची मागणी करावी लागते हे दुर्दैवी आहे. हा विरोध केवळ ‘छत्रपती’ या शब्दाला नसून ‘छत्रपती शिवाजी महाराजांना’च आहे. नेहरूंना जर ‘पंडित’ ही उपाधी चालते, गांधीजींना ‘महात्मा’ ही उपाधी चालते, तर शिवाजी महाराज यांचा ‘छत्रपती’ ही पदवी का चालत नाही. पुरोगाम्यांना ‘छत्रपती म्हणण्यास लाज का वाटते ?’, फेब्रुवारी 2011 मध्ये काढलेल्या महाराष्ट्र शासनाच्या आदेशात म्हटले आहे की, राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक यांचा अवमान होता कामा नये हे पुरोगामी स्वतःला शिवप्रेमी समजतात; मात्र हे तथाकथित शिवप्रेमी आहेत. त्यांचा ‘सिलेक्टेड’ शिवप्रेम आहे, कारण हे लोक औरंगजेबाच्या थडग्याचे (कबरीचे) समर्थन करणारे, तसेच औरंगजेबाचे स्टेटस ठेवणारे यांच्याविषयी चकार शब्द उच्चारत नाहीत. महाराष्ट्रात ‘छत्रपती शाहू महाराज, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर विद्यापीठ, राजश्री छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय अशी पूर्ण नावे दिले, तर ते चालते; मात्र शिवाजी विद्यापिठाचे नाव पालटून ते छत्रपती शिवाजी महाराज असे करा म्हटले की, आडकाठीची भूमिका घेतली जाते. आज जवाहरलाला नेहरु युनिर्वसिटी (‘जे.एन्.यु.मध्ये) केवळ ‘भारत तेरे टुकडे होंगे’च्या घोषणा दिल्या जात नसून, स्वामी विवेकानंद यांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली, दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांनी भारतीय सैनिकांची हत्या केल्यावर विद्यापिठात मिठाई वाटण्यात आली. तोच प्रकार आपल्याला कोल्हापूर येथे होऊ द्यायचा नसून कोणत्याही परिस्थितीत शिवाजी विद्यापीठाला ‘जे.एन्.यु.’ होऊ देणार नाही. कोल्हापूर हे कधीही सहन करणार नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असे नाव यात विद्यापिठाला दिले पाहिजे. अन्यथा राज्यभर या विषयी आंदोलन छेडून लढा चालूच ठेवण्यात येईल.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदराने उल्लेख करण्याऐवजी ‘शिवाजी कोण होता ?’, असे पुस्तक लिहिणारे कॉ. पानसरे कोण आहेत ? अशा प्रकारे शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख हा हिंदूंच्या अस्मितेवर आघात असून या पुस्तकावर शासनाने बंदीच घालणे अपेक्षित आहे. २६/११ चे आक्रमण आतंकवादी कसाबने केले हे सर्वोच्च न्यायालयानेही मान्य केलेले असतांना भारतीय गुप्तचर यंत्रणांवर संशय घेणारे जे ‘हू किल्ड करकरे’, असे पुस्तक ज्यांनी लिहिले, त्यांचे समर्थन करणार्या पुरोगाम्यांचा चेहरा या निमित्ताने आता उघड होत आहे.
जोपर्यंत विद्यार्थ्यांमध्ये छत्रपती शिवरायांचा खरा विचार रूजत नाही, तोपर्यंत हा लढा चालूच राहिल ! – अभय वर्तक, सनातन संस्था
जे लोक छत्रपती शिवाजी महाराज यांचा नेहमी ऐकेरी उल्लेख करतात त्या विचारधारेतील लोकांकडूच आज विद्यापीठाचा विस्तार ‘छत्रपती’ होताना सहन होत नाही. या नामविस्तारला मुख्यत्वेकरून पुरोगामी, डावे आणि हिंदूविरोधी यांचाच विरोध असून ‘लघुरूप’ची खोटी कथानके रचली जात आहेत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांनी ‘सेक्युलर’बनवण्याचे षडयंत्र आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. छत्रपतींचे राज्य हे ‘हिंदवी स्वराज्य’ म्हणून ओळखले जाते त्या छत्रपतींच्या विद्यापीठातील मूर्तीसमोर भगवा ध्वज नसावा ही किती दुर्दैवी आहे. त्यामुळे यापुढील आपला लढा केवळ नामविस्तारापुरता मर्यादित नसून जोपर्यंत विद्यार्थ्यांमध्ये छत्रपती शिवरायांचा खरा विचार रूजत नाही, तोपर्यंत हा लढा चालूच राहिल !
समारोपप्रसंगी छत्रपती ग्रुपचे संस्थापक श्री. प्रमोददादा पाटील, भाजप महिला आघाडीच्या सौ.रूपाराणी निकम, किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री. जयसिंगराव शिंदे-सरकार, शिवसेनेचे नेते श्री. सत्यजित कदम, नरवीर तानाजी मालुसरे यांचे १३ वे वंशज यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.
* सहभागी संघटना संप्रदाय आणि जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज प्रणित ‘श्री’ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, स्वामी समर्थ संप्रदाय, इस्कॉन, मंदिर सेवेकरी, गजानन महाराज भक्त मंडळ, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदू एकता आंदोलन, हिंदू महासभा, ‘छत्रपती ग्रुप’, महाराष्ट्र मंदिर महासंघ, ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’, ‘अखिल भारतीय रेशनिंग महासंघ’, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती, शिवसेना, भाजप, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, विविध तरुण मंडळे, तालीम
उपस्थित मान्यवर –
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले आणि श्री. किशोर घाटगे, मंदिर महासंघाचे सहसंयोजक श्री. अभिजित पाटील, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे आणि करवीरतालुकाप्रमुख श्री. राजू यादव, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. आनंदराव पवळ, महाराजा प्रतिष्ठानचे श्री. निरंजन शिंदे, मराठा तितुका मेळवावाचे श्री. योगेश केरकर, श्री संप्रदाय कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्री कृष्णात माळी निरीक्षक श्री विजय लगड सातारा जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे निरीक्षक श्री सूर्यकांत भिकोले बेळगाव ग्रामीण व शहर निरीक्षक श्री संजय वागावकर जिल्हाध्यक्ष श्री आण्णासाहेब भोसले श्री मंजुनाथ कटकोळ मुख्यपीठ महिला निरीक्षक सौ सीमा पाटील जि.महिला अध्यक्षा प्रणाली पाटील वारकरी संप्रदायाचे भ.प. विठ्ठलतात्या पाटील, ह.भ.प. महादेव महाराज यादव, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कोल्हापूर जिल्हा कार्यवाह श्री. सुरेश यादव, शहर कार्यवाह श्री. आशिष लोखंडे यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.
* विशेष !
१. अत्यंत शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध झालेल्या मोर्चाने सर्वांचे लक्ष वेधले. मोर्चासाठी सातारा, सांगली, बेळगावसह कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून भगवे ध्वज घेऊन आणि गटा-गटाने युवक उत्स्फूर्तपणे ‘जयघोष’ करत सहभागी झाले होते.
२. मोर्चासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात सहभागी असलेल्या सरदार-मावळे यांचे वंशज उपस्थित
३. या मोर्चात अनेक पथकांचा सहभाग. ढोल-ताशा पथक, मर्दानी खेळ, शिवकालीन युद्धपथक, टाळ-मृदंग यांचे पथक, विविध संप्रदायांचे भक्त, मावळ्यांची वेशभूषा यांसह पारंपरिक वेशभूषा, महिलांचे रणरागिणी पथक सहभागी.
* फलकांवरील वैशिष्ट्यपूर्ण मजकूर – ‘शिवाजी विद्यापीठ’ नव्हे, तर छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ म्हणा अन् जपा हिंदवी बाणा !
Krishnat MaliComments Off on ‘शिवाजी विद्यापीठा’चा नामविस्तार ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ झालाच पाहिजे ! – १० सहस्र हिंदूंची मोर्चाद्वारे ललकारी 180
कोल्हापूर : जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज दक्षिण पीठ नाणिजधाम, महाराष्ट्र. यांच्या प्रेरणेने अखिल भारतीय महिला सेनेचा महिला मेळावा कोल्हापूर जिल्हा सेवा समितीच्या वतीने रविवार दिनांक ०९/०२/२०२५ रोजी आजरा तालुका येथील सरोळी गावातील सरस्वती विद्यालयात उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात सर्व तालुक्यातील महिला भगिनींनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून कलाविष्कार सादर केले. यावेळी बोलताना अखिल भारतीय महिला सेना सेक्रेटरी सौ. वृंदा जोशी ताई यानी गुरु आदेशाने, ग्रामीण भागातील महिलांनी चूल आणि मूल सांभाळून, आपल्या संसारातून वेळ काढून सर्व भगिनी एकत्र यावे व आपल्या कलागुणांचे सादरीकरण करावे या उद्देशाने हा महिला मेळावा आयोजित केला होता. या महिला मेळाव्यातून महिलांच्या कला गुणांना वाव दिला गेला. त्यांना विविध कलाविष्कार सादर करण्याची संधी दिली गेली. यावेळी व्याख्यानात बोलताना सौ. जोशी ताई म्हणाल्या की, “आपण महिला स्वतःवरच प्रेम करत नाही पण संपूर्ण कुटुंबाचा कार्यभार मात्र सांभाळतो. ते जरी आपले कर्तव्य असले तरी आपण प्रत्येकीने स्वतःची काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर प्रपंच करता करता परमार्थ कसा करता येईल सेवेला, वेळ कसा देता येईल हे देखील विविध उदाहरणाच्या माध्यमातून त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर भक्ती आणि साधनेत सातत्य ठेवल्यामुळे आपल्यामध्ये सकारात्मकता कशी निर्माण होते व त्यामुळे आपण आपल्यावर येणाऱ्या कोणत्याही अडचणींवर मात करण्यासाठी मानसिकरित्या कशा खंबीर होऊ शकतो हे देखील दाखवून दिले. यासाठी वापरलेली व्यवहारिक उदाहरणे ऐकताच महिलांच्या मध्ये खूप सकारात्मकता निर्माण झाली व त्यांना सेवा व साधना या गोष्टी दैनंदिन जीवनामध्ये खरंच किती महत्त्वाच्या आहेत हे देखील लक्षात आले.” यावेळी मुख्य पीठ सहाय्यक मा.श्री. दीपक खरूडे साहेब ,मुख्य पीठ महिला निरीक्षक सौ. सीमा पाटील ताई ,जिल्हा निरीक्षक मा. श्री. विजय लगड साहेब व जिल्हा अध्यक्ष मा. श्री. कृष्णात माळी साहेब यांनी उपस्थित महिला भगिनींचे मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल स्वागत व आभार मानले व त्यांना शुभेच्छा ही दिल्या. यावेळी उपस्थित मुख्य पीठ जनगणना प्रमुख श्री. तुषार कदम, महिला अध्यक्ष सौ प्रणाली पाटील ताई ,जिल्हा सचिव श्री. दिलीप कोळी, जिल्हा कर्नल श्री. लक्ष्मण पुणेकर, जिल्हा युवा प्रमुख श्री. अमोल पाटील, जिल्हा सामाजिक उपक्रम प्रमुख श्री. अमित लाड, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख श्री. विजय पाटील, जिल्हा धर्मक्षेत्र प्रमुख श्री. महेश पाटील, जिल्हा शिबिर प्रमुख सौ.गायत्री सुदेवाड, जिल्हा बिनप्रमुख श्री. आकाश साळुंखे, जिल्हा देणगी प्रमुख श्री. दशरथ मोहिते, जिल्हा संजीवनी प्रमुख श्री. बलराज पाटील तसेच सर्व जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा विशेष कार्यवाहक श्री मधुकर बाबर व आजरा तालुक्याचे अध्यक्ष श्री. आकाराम देसाई यांनी व त्यांच्या सर्व तालुका पदाधिकारी, सेवा केंद्र पदाधिकारी तसेच चंदगड व गडहिंग्लज तालुक्यातील सर्व पदाधिकारी गुरुबंधू, गुरु भगिनी यांनी खूप असं सुंदर केले होते. महिलांची उपस्थिती देखील अगदी मोठ्या प्रमाणात होती. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुका महिला अध्यक्षा व तालुका अध्यक्ष यांनी सुद्धा आपल्या तालुक्यातील सेवा केंद्रा पर्यंत पोहचून या कार्यक्रमाचे नियोजन सुंदर केले. दिलेल्या फोल्डर प्रमाणे जबाबदारी चांगल्या पद्धतीने बजावली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राधानगरी तालुका महिला अध्यक्ष सौ. काजल सुतार व कुमारी संजीवनी सुतार यांनी केले. तर प्रास्ताविक जिल्हा महिला अध्यक्षा सौ. प्रणाली पाटील ताई यांनी केले. आभार करवीर तालुका महिला अध्यक्षा सौ. राधिका पाटील ताई यांनी मानले.
Krishnat MaliComments Off on जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेने अखिल भारतीय महिला सेनेच्या वतीने हजारो महिलांच्या उपस्थितीत महिला मेळावा उत्साहात संपन्न 435
कोल्हापूर: पेठ वडगाव येथील सोमनाथ पतसंस्थेच्या १५ व्या शाखेचे उद्घाटन माआमदार दलितमित्र मा. डॉ. अशोकराव माने यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी बोलताना त्यांनी सोमनाथ पतसंस्थेने अल्पावधीत वडणगे ते १५ व्या शाखेत पदार्पण करून सभासदांचा विश्वास सार्थ ठरविला असून या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोकराव माळी यांनी सभासद अल्प भूधारक शेतकरी छोटे-मोठे व्यावसायिक यांना कर्ज पुरवठा करून संस्था नावारूपाला आणली त्याबद्दल त्यांनी त्यांचे कौतुक केले व त्यांना शुभेच्छा दिल्या मा.उपसरपंच सयाजी घोरपडे यांनी बोलताना सोमनाथ पतसंस्था गावामध्ये सुरू झाल्याने गावच्या विकासाला हातभार लागेल तसेच छोटे-मोठे व्यवसायिकांना मदत होईल यामुळे गावातील ग्राहकांचे व्यवहार ही वाढतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी संस्थापक चेअरमन यांनी बोलताना संस्थेच्या सुरू असणाऱ्या योजना बद्दल माहिती दिली सध्या संस्थेची ५० कोटी ठेवीकडे वाटचाल सुरू असून कोअर बँकिंग सुविधेची माहिती दिली सभासदांना व ग्राहकांना ग्राहक सेवा केंद्र सुरू करणार असल्याची माहिती दिली यावेळी पंचगंगा पाणीपुरवठा संस्थेचे चेअरमन मा. बाजीराव सदाशिव पाटील (नाना) सरपंच सौ.संगीता पाटील उपसरपंच उमाजी शेलार शाखा चेअरमन सुभाष पाटील संस्थापिका सौ रूपाली माळी शाखा सल्लागार हंबीरराव वळके संजय जौंदाळ नामदेव फल्ले तंटामुक्त अध्यक्ष पंडितराव चौगुले सेवा सोसायटीचे चेअरमन कृष्णात जौदाळ मा. पंचायत समिती सदस्या वैशाली पाटील उद्योजक अमर कांबळे छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना संचालक सर्जेराव पाटील बोणे डॉ.एम बी किडगावकर किसान मोर्चा उपाध्यक्ष बाळासो पाटील दुध उत्पादक संघटना ज्योतीराम घोडगे उपसरपंच सयाजी घोरपडे तोडणी वाहतूक संघटना व्हा चेअरमन बाळासाहेब पाटील कुशिरे हेड ऑफिस व्हा. चेअरमन बजरंग माळी संचालक हंबीरराव देसावळे पोपट खाडे चंद्रकांत माळी संजय धोंगडे लाटवडेचे मा. ग्रामपंचायत सदस्य बापूसो माळी जनरल मॅनेजर कृष्णात माळी असि. जनरल मॅनेजर नागनाथ माळी शाखा मॅनेजर विक्रात माळी तसेच सर्व शाखांचे चेअरमन शाखाधिकारी सल्लागार मंडळ कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार दिलीप पोवार सर यांनी केले
Krishnat MaliComments Off on सोमनाथ नागरी सहकारी पतसंस्था आजपासून वडणगे येथे कार्यरत आमदार अशोकराव माने यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न 258
कोल्हापूर: हातकणंगले तालुक्यातील सर्व नागरी सहकारी पतसंस्थांचा आज शासनाच्या अंशदान विरोधी तसेच ठेव विमा संरक्षण ५ लाखापर्यंत मिळावे व पालक अधिकारी नेमणुकीस विरोध या मागण्यासाठी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला होता तालुक्यातील सर्व पतसंस्था कर्मचारी व संचालक मंडळ कामकाज बंद ठेवून तालुका उपनिबंधक सहकारी संस्था हातकणंगले यांना निवेदन देण्यासाठी उपस्थित होते. यावेळी हातकणंगले तालुका उपनिबंधक सहकारी संस्था एस. डी. जाधव निवेदन यांना देण्यात आले या वेळी बोलताना त्यानी सर्व पतसंस्था कर्मचारी व संचालक मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित राहून एकजूट दाखवली त्याबद्दल त्यांनी सर्वांचे कौतुक केले तसेच सर्वांचे वतीने दिलेले निवेदन मा. सहकार आयुक्त पुणे व सहकार राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्यापर्यंत पाठवून सदर निवेदनाबाबत पाठपुरावा करणार असल्याबाबत त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुधाकर पिसे यांनी निवेदनातील जाचक अटीबाबत सर्वांना माहिती दिली या संपास कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पतसंस्थांनी पाठिंबा देऊन सर्व संस्थांचे एक दिवसाचे कामकाज बंद ठेवण्यात आले अंशदान विरोधात लढाई संघटितपणे सर्वच पातळीवर होणे काळाची गरज असल्याने हातकणंगले तालुका ग्रामीण बिगर शेती नागरी महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी सेवक पतसंस्था कर्मचारी संघटनेने सुरू केलेल्या उठावास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे यावेळी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुधाकर पिसे उपाध्यक्ष अनिल हजारे व जनरल सेक्रेटरी महेश कडाले, शांतिनाथ पाटील विलास सनगर सुनील बारवाडे यांच्यासह तालुक्यातील सर्व पतसंस्थांचे कर्मचारी संचालक मंडळ या संख्येने उपस्थित होते त्यामध्ये महिला कर्मचाऱ्यांची उपस्थिती लाक्षणिक होती.
Krishnat MaliComments Off on हातकणंगले तालुक्यातील पतसंस्थांचा उपनिबंधक कार्यालय येथे लाक्षणिक संप यशस्वी 363
कोल्हापूर: हातकणंगले तालुक्यातील सर्व नागरी सहकारी पतसंस्थांची 31 जानेवारी रोजी शासनाच्या अंशदान विरोधी तसेच ठेव विमा संरक्षण व पालक अधिकारी नेमणुकी स विरोध या मागण्यासाठी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आहे या दिवशी तालुक्यातील सर्व पतसंस्था कामकाज बंद ठेवून तालुका उपनिबंधक सहकारी संस्था हातकणंगले यांना निवेदन देणार आहेत अशी माहिती परिपत्रकातून दिली आहे या संपात कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पतसंस्थांनी पाठिंबा देण्याचे आवाहन ही करण्यात आले. अंशदान चा फटका राज्यातील सर्व मोठ्या पतसंस्थांना बसणार असून अंशदान विरोधात लढाई संघटितपणे सर्वच पातळ होणे काळाची गरज असल्याने जवाहर छाबडा सहकार भारती यांनी 17 जानेवारी रोजी इचलकरंजी येथील सभेत व्यक्त केली होती यावेळी 31 जानेवारी हातकणंगले तालुक्यातील पतसंस्था लाक्षणिक बंद ठेवून हा बंद आपल्या सर्व सहकार्याने यशस्वी करून शासनाला अंशदान विरोधातील लढाई तीव्रतेने लढली जात आहे याची जाणीव करून देण्यासाठी सर्वांनी निर्धार करून उद्या या संपास सर्व संस्था चेअरमन व्हा चेअरमन मंडळ सदस्य जनरल मॅनेजर मॅनेजर या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्वच स्टाप यानी उपस्थित राहावे असे आवाहन हातकणंगले तालुका ग्रामीण बिगर शेती नागरी महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी सेवक पतसंस्था कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुधाकर पिसे उपाध्यक्ष अनिल हजारे व जनरल सेक्रेटरी महेश कडाले यांनी केले.
Krishnat MaliComments Off on हातकणंगले तालुक्यातील पतसंस्थांचा उद्या उपनिबंधक कार्यालय येथे लाक्षणिक संप 259
कोल्हापूर: हातकणंगले तालुक्यातील सर्व नागरी सहकारी पतसंस्थांची 31 जानेवारी रोजी शासनाच्या अंशदान विरोधी तसेच ठेव विमा संरक्षण व पालक अधिकारी नेमणुकी स विरोध या मागण्यासाठी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आहे या दिवशी तालुक्यातील सर्व पतसंस्था कामकाज बंद ठेवून तालुका उपनिबंधक सहकारी संस्था हातकणंगले यांना निवेदन देणार आहेत अशी माहिती परिपत्रकातून दिली आहे या संपात कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पतसंस्थांनी पाठिंबा देण्याचे आवाहन ही करण्यात आले. अंशदान चा फटका राज्यातील सर्व मोठ्या पतसंस्थांना बसणार असून अंशदान विरोधात लढाई संघटितपणे सर्वच पातळ होणे काळाची गरज असल्याने जवाहर छाबडा सहकार भारती यांनी 17 जानेवारी रोजी इचलकरंजी येथील सभेत व्यक्त केली होती यावेळी 31 जानेवारी हातकणंगले तालुक्यातील पतसंस्था लाक्षणिक बंद ठेवून हा बंद आपल्या सर्व सहकार्याने यशस्वी करून शासनाला अंशदान विरोधातील लढाई तीव्रतेने लढली जात आहे याची जाणीव करून देण्यासाठी सर्वांनी निर्धार करून उद्या या संपास सर्व संस्था चेअरमन व्हा चेअरमन मंडळ सदस्य जनरल मॅनेजर मॅनेजर या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्वच स्टाप यानी उपस्थित राहावे असे आवाहन हातकणंगले तालुका ग्रामीण बिगर शेती नागरी महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी सेवक पतसंस्था कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुधाकर पिसे उपाध्यक्ष अनिल हजारे व जनरल सेक्रेटरी महेश कडाले यांनी केले.
Krishnat MaliComments Off on हातकणंगले तालुक्यातील पतसंस्थांचा उद्या उपनिबंधक कार्यालय येथे लाक्षणिक संप 190
कोल्हापूर : संभाजीनगरमधील सिल्लोडमध्ये एक लाखाहून अधिक बांगलादेशी घुसखोरांना बोगस प्रमाणपत्र वाटप करण्यात आल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अभिनेता सैफ अली खान यांच्या निवासस्थानी घुसून हल्ला करणार्या मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद या बांगलादेशी घुसखोराला अटक करण्यात आली. तो बनावट नावाने मुंबईत वास्तव्य करत होता. केवळ मुंबईच नव्हे, तर नवी मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, सोलापूर यांसह राज्यभरात बांगलादेशी घुसखोरांचा अक्षरश: सुळसुळाट झाला आहे. यातून राज्याच्या सुरक्षेला मोठा गंभीर धोका निर्माण झाला असून सामाजिक अस्थिरता, गुन्हेगारी वाढ, रोजगाराची समस्या, तसेच खोट्या कागदपत्रांवर वास्तव्य करणार्यांचे मोठे रॅकेट राज्यात सक्रिय असल्याचे दिसून येते. तरी सरकारने देशभरात बांगलादेशी घुसखोर शोध मोहीम’ राबवावी आणि घुसखोरांना साहाय्य करणार्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी 27 जानेवारीला शिवाजी महाराज चौक येथे घंटानाद करून हिंदु राष्ट्र जागृती आंदोलनाद्वारे करण्यात आली. या प्रसंगी 175 हून अधिक विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपस्थित होते. देशव्यापी होणार्या या आंदोलनाचा कोल्हापूर येथे शंखनाद करण्यात आला. या आंदोलनात हिंदू एकता आंदोलनाचे शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे आणि करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. आनंदराव पवळ आणि श्री. किरण कुलकर्णी, राष्ट्रहित प्रतिष्ठानचे श्री. शरद माळी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी आणि सौ. राजश्री तिवारी, शिवशाही फाऊंडेशनचे संस्थापक श्री. सुनील सामंत, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे, मंदिर महासंघाचे कोल्हापूर जिल्हा सहसमन्वयक श्री. अभिजित पाटील यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. उपस्थित मान्यवर – शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले, श्री. विकास जाधव, विश्व हिंदु परिषदेचे श्री. अनिल दिंडे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे श्री. सुशील भांदिगरे आणि श्री. शशी बीडकर, श्री. अशोक गुरव, श्री. संजय माळी, हिंदू महासभा महिला आघाडीप्रमुख सौ. शिलाताई माने, हिंदू महासभेचे श्री. राजू तोरस्कर, श्री संप्रदाय जिल्हाध्यक्ष श्री. कृष्णात माळी, सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे रत्नागिरीतील चिपळूण १३ बांगलादेशी नागरिकांपैकी ३ जणांनाच अटक करण्यात आली; त्यातही पोलिसांनी हे प्रकरण नीट न हाताळल्यामुळे बांगलादेशी घुसखोरांना जामीन मिळाला, ही अतिशय गंभीर बाब आहे. नवी मुंबई, ठाणे, सोलापूर,पिंपरी-चिंचवड आदी शहरी भागांमध्येही शेकडो बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना अटक झाली. ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत १८ हजारांहून अधिक बेकायदेशीर घुसखोर राहत असल्याचा अंदाज आहे. तरी राज्यात ‘बांगलादेशी घुसखोर शोध मोहिम’ राबवावी; या अंतर्गत राज्यातील सर्वच जिल्हे, शहरे, तालुके येथील संशयित ठिकाणी ‘सर्च ऑपरेशन’ / ‘कोंम्बींग ऑपरेशन’ राबवून बांगलादेशी घुसखोरांना शोधून काढावे; बनावट ओळखपत्रे तयार करणार्या रॅकेटची पाळेमुळे उखडून त्यावर कठोर कारवाई करावी; भाड्याने खोली देण्याआधी घरमालकाने भाडेकरूंची, तसेच कामावर ठेवतांना कामगारांची योग्य ती चौकशी करावी, संशयास्पद आढळल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे; घुसखोरांना आश्रय देणारे, जामीन देणारे किंवा कोणत्याही प्रकारचे साहाय्य करणारे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशा मागण्या या प्रसंगी करण्यात आल्या.
Krishnat MaliComments Off on बांगलादेशी घुसखोर शोध मोहीम’ राबवा; घुसखोरांना साहाय्य करणार्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा – कोल्हापूर येथे हिंदु राष्ट्र जागृती आंदोलनाद्वारे मागणी 199