Krishnat Mali

चिन्मय कृष्णदास यांच्या सुटकेसाठी, तसेच बांगलादेशी हिंदूंच्या रक्षणासाठी भारत सरकारने हस्तक्षेप करावा !- हिंदु राष्ट्र समन्वय समिती



कोल्हापूर – बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी कायदेशीर मार्गाने आंदोलन करणार्‍या बांगलादेशातील इस्कॉनचे प्रमुख स्वामी चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अन्याय्य अटक करण्यात आली आहे. ही अटक म्हणजे हिंदू अल्पसंख्याकांचे हक्क दडपण्याचा आणखी एक प्रकार आहे, याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. भारत सरकारने तातडीने पावले उचलून चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांची विनाअट सुटका व्हावी आणि हिंदू अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी तेथील सरकारला भाग पाडावे. भारताने बांगलादेशशी असलेले सर्व संबंध तोडावेत आणि प्रसंगी सैनिकी कारवाई करण्यास मागेपुढे पाहू नये, अशी एकमुखी मागणी हिंदु राष्ट्र समन्वय समिती वतीने ३ डिसेंबर या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आलेल्या आंदोलनात करण्यात आली. या वेळी इस्कॉनसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे १५० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते.

स्वामी चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांनी हिंदूंवर होणार्‍या अन्यायाला विरोध करत शांततापूर्ण मार्गाने आपले हक्क मागितले. त्यांच्या अटकेने बांगलादेशातील हिंदूंच्या धर्मस्वातंत्र्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. हिंदूंवरील हे अत्याचार रोखले नाही, तर त्याचे लोण भारतात येण्यास वेळ लागणार नाही; म्हणून हिंदूंना भारत सरकारकडून कठोर भूमिका आणि निर्णायक पावले उचलण्याची मागणी या प्रसंगी करण्यात आली.

या वेळी ह.भ.प. महादेव यादव महाराज, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे, ‘इस्कॉन’चे श्री. राहुल देशपांडे, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे करवीरतालुकाप्रमुख श्री. राजू यादव, हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाप्रमुख श्री. दीपक देसाई आणि शहरप्रमुख श्री. गजानन तोडकर, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. आनंदराव पवळ, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक श्री. अभिजित पाटील, शिवशाही फाऊंडेशनचे संस्थापक श्री. सुनील सामंत, डॉ. अश्‍विनी माळकर, राष्ट्रहित प्रतिष्ठानचे श्री. शरद माळी, श्री. प्रसन्न शिंदे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. या वेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले, श्री. अर्जुन आंबी, श्री. विकास जाधव, ‘इस्कॉन’चे प्रमुख श्री. दीपक खोत, श्री. हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, श्री संप्रदायाचे जिल्हाध्यक्ष श्री. कृष्णात माळी, ‘महाराजा प्रतिष्ठान’चे संस्थापक श्री. निरंजन शिंदे, मराठा तितुका मेळवावाचे श्री. योगेश केरकर, ‘स्वयंसिद्धा’च्या सौ. स्मिता डोंगरकर,हिंदु महासभेच्या महिला आघाडीप्रमुख सौ. शीलाताई माने यांसह अन्य उपस्थित होते.

उपस्थित संघटना आणि पक्ष – शिवसेना, इस्कॉन, हिंदू एकता आंदोलन, हिंदू महासभा, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, महाराष्ट्र मंदिर महासंघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदु जनजागृती समिती, वारकरी संप्रदाय, सनातन संस्था, मराठा तितुका मेळवावा, महाराजा प्रतिष्ठान, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, भाजप
इत्यादी उपस्थित होते यावेळी सर्वानुमते भारताने बांगलादेशाशी असलेले सर्व संबंध तोडावे आणि प्रसंगी सैनिकी कारवाई करावी – १५० हून अधिक हिंदूंची छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकमुखी मागणी केली असलेली माहिती
श्री. आनंदराव पवळ शिवानंद स्वामी
‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’यांनी दिली

कृष्णा नदी वरून उदगाव ते अंकली जाणाऱ्या पुलावरती वाढले अपघाताचे प्रमाण प्रशासनाचे दुर्लक्ष आत्तापर्यंत १८ बळी

कोल्हापूर: कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांच्या सीमेवर कृष्णा नदीवरील उदगाव ते अंकली पुलाच्या परिसरात अपघाताचे प्रमाण वाढले आहे यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग व प्राधिकरण विभागाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते‌ गुरुवारी येथील जुन्या पुलावरून चार चाकी गाडी पडून तिघांचा बळी गेल्याने सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडालीआहे जानेवारी मध्येही याच पुलावरून कार कोसळली पण सुदैवाने तिघांचा जीव वाचला यापूर्वी ही असीच घटना घडली होती सातत्याने होत असलेल्या अपघातांच्या घटनांमुळे नागरिकांचे बळी जात आहेत आतापर्यंत १८ लोकांचे बळी गेले आहेत या घटनांना कोण जबाबदार उदगाव-अंकली जाणारा हा पूल ब्रिटिश कालीन असुन सुमारे १३५ वर्षाचा पुल आहे त्यासोबत नवीन पूल उभारला आहे असे एकूण या मार्गावर दोन पुल आहेत त्यालगत मिरज कोल्हापूर रेल्वे मार्गाचा पुल असून जुन्या पुलावर अनेक खड्डे पडले आहेत पुलाच्या सुरवातीपासून खड्डे भरून डांबरीकरण करणे गरजेचे आहे त्यामुळे अनेक वाहन चालकांचा वाहनावरील ताबा सुटून अपघात वाढत आहेत दोन्ही बाजूला झाडे झुडपे ही वाढली आहेत तीही काढण्यात आलेली नाहीत पुलाच्या दोन्ही बाजूला कोणत्याही प्रकारे माहिती फलक सूचनाफलक लावलेले नाहीत त्यामुळे वाहन चालकांना वाहन चालविताना रस्त्याचा अंदाज येत नाही त्यामुळे वेगाने वाहन जाऊन अपघात होत आहेत गुरुवारी मध्यरात्री याच जुन्या पुलावरून तुटलेल्या संरक्षण कटड्यातून चार चाकी फुलावरून खाली कोसळल्याने तिघांचा बळी गेला आहे अशा घटना वारंवार घडत असल्यामुळे प्रशासन का दुर्लक्ष करीत आहे अशी चर्चा नागरिकांना मधून होत आहे यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय प्राधिकरण विभागाने या पुलाचे तुटलेले संरक्षण कटडे दुरुस्ती करणे गरजेचे आहे तसेच रस्त्याच्या दोन्ही पुलाच्या परिसरात पांढरे पट्टे व व दिशादर्शक फलक लावणे व पूल असल्याच्या सुचना व वाहनाची गती दर्शविणे गरजेचे आहे कृष्णा नदीवरील उदगाव ते अंकली पुलावरील संरक्षण कठड्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय प्राधिकरण विभागाने दखल घेऊन दुरुस्त करावे अशी मागणी नागरिकातून होत आहे.