Uncategorized

नवरात्र उत्सव सन २०२६ कालावधीतील शहरातील रहदारी नियमन व नियंत्रणाबाबत. शहर वाहतूक नियंत्रण शाखा कोल्हापूर यांच्यावतीने अहवाहन

out of 10


कोल्हापूर: कोल्हापूर शहरात दि. ११/१०/२०२६ ते दि. २०/१०/२०२६ रोजी अखेर मोठ्या प्रमाणात नवरात्र उत्सव साजरा होत आहे. श्री अंबाबाई देवीच्या दर्शनाकरिता महाराष्ट्र राज्यातून व इतर राज्यांतून मोठ्या प्रमाणात भाविक आपापल्या मोटार वाहनांनी येत असतात.
श्री अंबाबाई मंदिराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच सदर परिसरामधील वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहावी, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, नागरिक व भाविकांना रस्ता सुरक्षा प्रस्थापित होणे आवश्यक आहे. त्याकरिता मा. पोलीस अधीक्षक, कोल्हापूर यांनी खालीलप्रमाणे निर्देश दिले आहेत.
अ) जड, अवजड व हलकी मालवाहू वाहने यांच्यावरील निर्बंध
क्रमांक ५३ वाहि/जाहिरनामा/९९/२०१९, दि. २४/०१/२०१९ च्या जाहिरनाम्यानुसार अवजड वाहनांना सकाळी १०:०० ते रात्री ०८:०० वाजेपर्यंत घालण्यात आलेली शहरातील प्रवेशबंदी नेहमीप्रमाणे कायम राहील.
ब) अवजड वाहनांसाठी वाढीव प्रवेशबंदी
श्री अंबाबाई मंदिर परिसरामध्ये भाविकांची होणारी गर्दी पाहता सदर भागामध्ये अवजड वाहनांना प्रवेशबंदी करणे आवश्यक आहे. त्याकरिता रात्री ०८:०० ते रात्री १०:०० वाजेपर्यंत खालील नमूद चौकांतून अंबाबाई मंदिर परिसरामध्ये येणाऱ्या अवजड वाहनांना नवरात्र उत्सव कालावधीमध्ये वाढीव निर्बंध घालण्यात येत आहेत.
अवजड वाहनांसाठी वाढीव प्रवेशबंदीची ठिकाणे :
सीपीआर हॉस्पिटल चौक – सोन्या मारुती चौक – तोरस्कर चौक – गायकवाड बंगला – गंगावेश – रंकाळा स्टँड – तटाकडील तालीम – तांबट कमान – जुना वाशी नाका – देवकर पानंद पेट्रोल पंप – देवकर पानंद चौक – इंदिरासागर चौक – रेसकोर्स नाका – गोखले कॉलेज – सावित्रीबाई फुले हॉस्पिटल – उमा टॉकीज चौक – रिलायन्स मॉल – फोर्ड कॉर्नर सिग्नल चौक – कोंडा ओळ चौक – दसरा चौक.
क) एकेरी मार्गावर घालण्यात आलेले निर्बंध
१. प्रथमेश ऑईल स्पेअर पार्ट कॉर्नर ते संघवी हॉस्पिटल ते गुंदेशा भांडी दुकान कॉर्नर ते एम.एल.जी. हायस्कूल कॉर्नर ते बालगोपाल तालीम हा मार्ग एकेरी मार्ग असून, अत्यावश्यक सेवेतील वाहने व स्थानिक पासधारक रहिवासी वगळता सर्व वाहनांना प्रवेश बंद आहे. सदर मार्गावरील एम.एल.जी. हायस्कूल ग्राउंडवर दुचाकी पार्किंगची सुविधा देण्यात आलेली आहे.
२. भवानी मंडप कमान ते बिंदू चौक कमान (जेल रोड) हा रस्ता एकेरी मार्ग असून, त्यावर विरुद्ध दिशेने येण्यास मनाई करण्यात येत आहे.
३. बिंदू चौक ते शिवाजी चौक आणि वणकुंद्रे भांडी दुकान महाद्वार रोड ते पापाची तिकटी तसेच भेंडे गल्ली रोड हे नेहमीप्रमाणे एकेरी मार्ग कायम राहतील.
४. बिनखांबी, महाद्वार रोड ते पापाची तिकटी जाणारा एकेरी मार्ग दुपारी ०४:०० ते रात्री १०:०० वाजेपर्यंत सर्व रिक्षांसाठी बंद करण्यात येत आहे.
५. बिनखांबी, महाद्वार ते पापाची तिकटी रोडवर चारचाकी वाहनांना नवरात्र उत्सव कालावधीत नऊ दिवस प्रवेश बंद करण्यात येत आहे.
६. दुचाकी वाहनांना आवश्यकतेनुसार प्रवेश देण्यात येईल.
७. महाद्वार रोडवरील व्यावसायिकांच्या मालाची ने-आण करणाऱ्या वाहनांना रात्री १०:०० ते सकाळी ०६:०० या वेळेतच प्रवेश देण्यात येईल.
ड) आवश्यकतेनुसार प्रवेश बंद व सुरू करण्यात येणारे मार्ग
१. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते भवानी मंडप या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना आवश्यकतेनुसार प्रवेश बंद व सुरू करण्यात येईल.
२. बिंदू चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना आवश्यकतेनुसार प्रवेश बंद व सुरू करण्यात येईल.
इ) दुचाकी वाहन पार्किंगकरिता मार्ग नियोजन
१. एम.एल.जी. हायस्कूल
पार्किंगची वेळ : सायंकाळी ०६:०० ते रात्री १०:०० वाजेपर्यंत.
मार्ग : मिरजकर तिकटी ते बालगोपाल तालीममार्गे एम.एल.जी. हायस्कूल.
२. जेल रोड – उजवी बाजू
मार्ग : छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक ते भवानी मंडप.
३. मेन राजाराम हायस्कूल
पार्किंगची वेळ : सायंकाळी ०५:०० ते रात्री १०:०० वाजेपर्यंत.
मार्ग : छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक ते भवानी मंडप.
४. गुजरी पेठ – दोन्ही बाजू
मार्ग : छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक ते भवानी मंडप.
५. महाद्वार रोड
पार्किंगची वेळ : सायंकाळी ०६:०० ते रात्री १०:०० वाजेपर्यंत.
मार्ग : मिरजकर तिकटी ते खरी कॉर्नर ते बिनखांबी.
६. पुढारी ऑफिस ते मराठा बँक – डावी बाजू
मार्ग : सीपीआर सिग्नल येथून.
७. करवीर पंचायत समिती कार्यालयासमोरील पटांगण
मार्ग : सीपीआर सिग्नल येथून.
ई) नवरात्र उत्सवामध्ये के.एम.टी. बसेससाठी रहदारी नियमन
नवरात्र उत्सवामध्ये छत्रपती शिवाजी चौक परिसर व भवानी मंडप परिसरामध्ये भाविकांची फार मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. त्यामुळे छत्रपती शिवाजी चौकातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या मार्गाने धावणाऱ्या के.एम.टी. बसेसच्या मार्गामध्ये बदल करणे आवश्यक आहे.
के.एम.टी.साठी निर्देश :
नवरात्र उत्सव काळामध्ये सकाळी ०८:०० ते रात्री १०:०० वाजेपर्यंत बिंदू चौक ते छत्रपती शिवाजी पुतळा ते माळकर चौक ते लुगडी ओळ या मार्गाने धावणाऱ्या के.एम.टी. बसेस बिंदू चौक ते आईसाहेब महाराज पुतळा ते स्वयंभू गणेश मंदिर या मार्गाने मार्गस्थ होतील. त्यांना शिवाजी चौकाकडे येण्यास मनाई करण्यात येते.
उ) छत्रपती शिवाजी चौक येथील रिक्षा स्टॉपकरिता निर्देश
नवरात्र उत्सव काळामध्ये बिंदू चौकाकडून येणाऱ्या प्रवासी वाहतुकीच्या रिक्षांना छत्रपती शिवाजी चौकामध्ये प्रवासी उतरविण्यास मनाई करण्यात येत आहे. त्यांनी शिवाजी चौकाच्या अगोदर किंवा पुढील भागामध्ये प्रवासी उतरवावेत.
तेथून रिक्षा स्टॉपवर येण्यासाठी पापाची तिकटी ते गंगावेश ते डॉ. पिशवीकर हॉस्पिटल ते कसबा गेट पोलीस चौकीमार्गे भेंडे गल्लीतून शिवाजी चौक या मार्गाचा वापर करावा. त्यांनी आपल्या रिक्षा संवाद वाचा व श्रवण केंद्र ते मानसी मेडिकल या दरम्यान रस्त्याच्या एका बाजूस क्रमानुसार पार्क कराव्यात.
ऊ) भवानी मंडप, छत्रपती शिवाजी महाराज चौक व माधुरी बेकरी येथील रिक्षा स्टॉपकरिता निर्देश
नवरात्र उत्सव काळामध्ये भवानी मंडप, छत्रपती शिवाजी महाराज चौक व माधुरी बेकरी येथील रिक्षा स्टॉप बंद राहतील. सदर ठिकाणच्या रिक्षांसाठी पर्यायी रिक्षा स्टॉपचा वापर करावयाचा आहे.
१) कोल्हापूर शहरात प्रवेश करणाऱ्या मार्गनिहाय लक्झरी बस यांच्यासाठी पार्किंग व्यवस्था
नवरात्र उत्सव काळात कोल्हापूर शहरात भाविक आणि त्यांच्या वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. वाहनांच्या गर्दीमुळे शहरात रहदारीचा खोळंबा होऊ नये, याकरिता खालील ठिकाणी लक्झरी व मिनी बस पार्किंगची सुविधा देण्यात आलेली आहे.
लक्झरी बस पार्किंगची ठिकाणे :
१. १०० फुटी रोड
२. एस्तेर पॅटर्न स्कूल
३. अमेरिकन बंगला
४. पंचगंगा घाट
५. निर्माण चौक
६. तपोवन मैदान
७. शाहू दयानंद हायस्कूल येथील प्रशस्त मैदान.
अ) पुणे, सातारा व सांगली विभागाकडून येणाऱ्या लक्झरी/मिनी बसेस
मार्ग क्रमांक १ : टोप संभापूर ते नागाव फाटा ते सांगली फाटा ओव्हरब्रिज ते तावडे हॉटेल ते ताराराणी पुतळा चौक ते धैर्यप्रसाद चौक ते एस्तेर पॅटर्न (ई.पी. स्कूल) मैदान पार्किंग व अमेरिकन बंगला ते जिल्हाधिकारी कार्यालय चौक ते खानविलकर पेट्रोल पंप ते १०० फुटी रोड पार्किंग.
मार्ग क्रमांक २ : टोप संभापूर ते शिये फाटा ते कसबा बावडा ते पोस्ट ऑफिस चौक ते खानविलकर पेट्रोल पंप ते १०० फुटी रोड पार्किंग.
ब) कागल, कर्नाटक व बेळगाव विभागाकडून येणाऱ्या लक्झरी/मिनी बसेस
शाहू टोल नाका ते हायवे कॅन्टीन ते सायबर चौक ते एस.एस.सी. बोर्ड ते शेंडा पार्क चौक ते हॉकी स्टेडियम चौक ते शाहू दयानंद हायस्कूल तसेच निर्माण चौक/तपोवन मैदान या ठिकाणी पार्किंग करतील.
टीप : संबंधित वाहनांना सायबर चौक, एन.सी.सी. भवन चौक, एस.एस.सी. बोर्ड, शेंडा पार्क चौक व हॉकी स्टेडियम चौक या ठिकाणांहून महालक्ष्मी मंदिराकडे जाण्यास मनाई करण्यात येत आहे.
क) गारगोटी व कळंबा मार्गावरील लक्झरी/मिनी बसेस
कळंबा साई मंदिर ते इंदिरा सागर सिग्नल चौक ते निर्माण चौक/तपोवन मैदान या ठिकाणी पार्किंग करतील.
तसेच इंदिरा सागर ते हॉकी स्टेडियम ते शाहू दयानंद हायस्कूल येथे पार्किंगची व्यवस्था राहील.
टीप : संबंधित वाहनांना इंदिरा सागर सिग्नल चौक या ठिकाणी महालक्ष्मी मंदिराकडे जाण्यास मनाई करण्यात येत आहे.
ड) राधानगरी मार्गावरील लक्झरी/मिनी बसेस
नवीन वाशी नाका ते क्रशर चौक ते देवकर पानंद चौक ते संभाजीनगर चौक ते इंदिरा सागर सिग्नल चौक ते निर्माण चौक/तपोवन मैदान या ठिकाणी पार्किंग करतील.
टीप : संबंधित वाहनांना क्रशर चौक, देवकर पानंद चौक व इंदिरा सागर सिग्नल चौक या ठिकाणी महालक्ष्मी मंदिराकडे जाण्यास मनाई करण्यात येत आहे.
ई) गगनबावडा आणि कोकण विभागाकडून येणाऱ्या लक्झरी/मिनी बसेस
फुलेवाडी नाका ते फुलेवाडी रिंग रोड ते आपटे नगर ते क्रशर चौक ते देवकर पानंद चौक या मार्गाने येणारी वाहने क्रशर चौक ते राजकपूर पुतळा, रंकाळा बाजूस रस्त्याच्या कडेला पार्किंग करतील. तसेच संभाजीनगर चौक ते इंदिरा सागर सिग्नल चौक ते निर्माण चौक/तपोवन मैदान या ठिकाणी पार्किंग करतील.
टीप : संबंधित वाहनांना फुलेवाडी नाका, पी.एन. पाटील गॅरेज, क्रशर चौक, देवकर पानंद चौक व इंदिरा सागर सिग्नल चौक या ठिकाणी महालक्ष्मी मंदिराकडे जाण्यास मनाई करण्यात येत आहे.
फ) शाहूवाडी, रत्नागिरी आणि कोकण विभागाकडून येणाऱ्या लक्झरी/मिनी बसेस
केर्ली ते छत्रपती शिवाजी महाराज पूल ते पंचगंगा घाट पार्किंग या मार्गाचा वापर करावा.
२) चारचाकी कार, जीप, रिक्षा व क्रुझर वाहनांची पार्किंग व्यवस्था
१. बिंदू चौक पे अँड पार्क
२. व्हिनस कॉर्नर गाडी अड्डा पे अँड पार्क
३. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम परिसर
४. प्रायव्हेट हायस्कूल
५. छत्रपती शिवाजी रोड पी-१ व पी-२
६. आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल
७. माधुरी बेकरी ते कॉमर्स कॉलेज डावी बाजू
८. दिलबहार चौक ते रावणेश्वर मंदिराच्या रस्त्याची डावी बाजू
९. पेटाळा/न्यू एज्युकेशन सोसायटीचा परिसर
१०. गांधी मैदान
११. शाहू दयानंद हायस्कूल
१२. तांबट कमान ते जॉकी बिल्डिंग रस्त्याची डावी बाजू
१३. मेन राजाराम हायस्कूल
१४. ससुर बाग शाळा
१५. सरस्वती टॉकीज बहुमजली पार्किंग
१६. गोकुळ हॉटेलजवळील पार्किंग
१७. ससुर बाग शाळा.
३) मार्गनिहाय चारचाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था
पुणे, सातारा व सांगली विभागाकडून येणारी वाहने : बिंदू चौक पार्किंग, व्हिनस गाडी अड्डा व दोन्ही पे अँड पार्क येथे वाहन पार्किंग करावे. तावडे हॉटेल ते ताराराणी पुतळा ते दसरा चौक ते बिंदू चौक तसेच संबंधित पर्यायी मार्गांचा वापर करावा.
कागल, कर्नाटक व बेळगाव विभागाकडून येणारी वाहने : शिवाजी स्टेडियम परिसर पार्किंग, प्रायव्हेट हायस्कूल पार्किंग, रावणेश्वर मंदिर रस्त्याच्या एका बाजूचे पार्किंग व पेटाळा पार्किंगचा वापर करावा.
गारगोटी व कळंबा मार्गावरील वाहने : पेटाळा पार्किंग व गांधी मैदान पार्किंगचा वापर करावा.
राधानगरी मार्गावरील वाहने : पेटाळा पार्किंग व गांधी मैदान पार्किंगचा वापर करावा.
कोकण व गगनबावडा विभागाकडून येणारी वाहने : संध्यामठ परिसरातील एका बाजूच्या पार्किंगचा वापर करावा.
शाहूवाडी, रत्नागिरी व कोकण विभागाकडून येणारी वाहने : बिंदू चौक पार्किंग, प्रायव्हेट हायस्कूल पार्किंग व पंचगंगा घाट पार्किंगचा वापर करावा.
कोल्हापूर शहरात प्रवेश केलेली वाहने : छत्रपती शिवाजी रोड पी-१ व पी-२, माधुरी बेकरी ते कॉमर्स कॉलेजची डावी बाजू (रिक्षा स्टॉप वगळून) आणि मेन राजाराम हायस्कूलसमोरील पटांगण येथे आवश्यकतेनुसार पार्किंगची व्यवस्था राहील.
४) पोलीस मुख्यालय येथील फ्लॉवर फेस्टिव्हल अनुषंगाने रहदारी नियमन
१. जिल्हा व सत्र न्यायालय चौक येथून पोलीस अधीक्षक कार्यालय चौकमार्गे पितळी गणपती चौकाकडे जाणारी वाहतूक एकाच मार्गावर संथ गतीने सुरू राहील. सदर मार्गावर कोणतेही वाहन पार्क होणार नाही.
२. भगवा चौक व पितळी गणपती चौकाकडून पोलीस अधीक्षक कार्यालय चौकाकडे जाणाऱ्या जड-अवजड व मध्यम आकाराच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत असून, सदर वाहनांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा.
३. भगवा चौक व पितळी गणपती चौक येथून पोलीस अधीक्षक कार्यालय चौकाकडे जाणाऱ्या व येणाऱ्या चारचाकी वाहनांसाठी आवश्यकतेनुसार वाहतूक नियमन करण्यात येईल.
४. भगवा चौक ते पितळी गणपती चौक या मार्गावर एकाच बाजूने दोन्ही बाजूची वाहतूक संथ गतीने होणार असल्याने वाहनधारकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे.
वरीलप्रमाणे मोटार वाहनांना वाहतुकीस प्रवेश बंद करणे, एकेरी वाहतूक मार्ग निश्चित करणे, वाहतूक वळविणे, मोटार वाहने थांबविण्यास व पार्किंग करण्यास मनाई करणे तसेच आवश्यकतेनुसार शहरातील इतर मार्ग तात्पुरत्या स्वरूपात सुरू किंवा बंद करण्याचे निर्देश देण्यात येत आहेत.
तसेच आवश्यक वेळी परिस्थितीनुसार योग्य ते निर्देश वेळोवेळी देण्यात येतील. तरी वाहनधारक व नागरिक यांनी पोलिसांनी दिलेल्या निर्देशांचे पालन करावे. असे आवाहन(नंदकुमार मोरे)पोलीस निरीक्षक
शहर वाहतूक नियंत्रण शाखाकोल्हापूर
यांच्यावतीने करण्यात आले आहे

Previous Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *