Uncategorized

पुणे बेंगलोर महामार्गावरती बंद पडलेल्या महामार्गाच्या कामामुळे वारंवार होत आहे वाहतुकीचीकोंडी निर्माण – प्रशासनाचे दुर्लक्ष नागरिकांतून संताप व्यक्त

कोल्हापूर: पुणे बेंगलोर एन एच 48 या महामार्गाचे सहा पदरी चे काम सातारा ते कोल्हापूर या दरम्यान काम सुरू आहे सध्या सातारा ते पेठ नाका यादरम्यानचे काम बहुतांशी पूर्ण झाले असून वाहतूक थोड्याफार प्रमाणात सुरळीत झाल्याचे दिसत आहे परंतु पेठ नाका ते कोगनोळी टोल नाका यादरम्यान चे काम रखडले आहे या कामामुळे या महामार्गावरती छोटे-मोठे अपघात व जागोजागी वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे याचा हा त्रास आम जनतेला व वाहन चालकांना होत आहे भारतीय राजमार्ग प्राधिकरण कोल्हापूर विभाग यांनी मार्च 26अखेर या महामार्गाचे काम पूर्ण होईल असे एका माहिती अधिकारा मध्ये माहिती दिली आहे. तथापि या महामार्गावरती कागल, गोकुळ शिरगाव, उचगाव फाटा, तावडे हॉटेल, सांगली फाटा, पुलाची शिरोली नागाव फाटा, शिरोली एमआयडीसी फाटा, शिये फाटा,
टोप, मंगरायाचीवाडी फाटा, अंबप फाटा, वॉटर उड्डाणपूल, किणी टोल नाका, तांदुळवाडी, येलूर फाटा, कामेरी ईश्वरपुर फाटा, वाघवाडी फाटा तसेच पेठनाका उड्डाणपूल या सर्व ठिकाणी अर्धवट कामे राहिली आहेत गेली तीन ते चार वर्षे झाली या महामार्गाचे सहा पदरीचे काम सुरू असून पेठ नाका ते कोगनोळी टोल नाका यादरम्यान सर्वच ठिकाणी अपूर्ण कामे तसेच पावसामुळे महामार्गावर जागोजागी खड्डे पडले आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे तसेच अपघात ही होत आहेत कोल्हापूर हे जिल्ह्याचे केंद्रस्थान असल्याने या ठिकाणी कागल, गोकुळ शिरगाव शिरोली पुलाची या ठिकाणी एमआयडीसी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे महामार्गावरती ट्रान्सपोर्टच्या गाड्या व एमआयडीसी कामगार यांची मोठ्या प्रमाणात रहदारी होत आहे. वाहतूक दोन्ही बाजूने सर्विस रोडनेच सुरू असल्याने काही ठिकाणी अवजड वाहने ट्रान्सपोर्ट मध्ये गाडी भरणे करता जात असताना एकच मार्गाने जात आहेत त्यामुळे सुद्धा वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे.
गांधीनगर येथे कापड मार्केट मोठ्या प्रमाणात असल्याने कर्नाटक महाराष्ट्र व कोकण या विभागातून सुद्धा मोठ्या प्रमाणात नागरिक येत असतात ,भाजीपाला फळे, कडधान्य व गुळाचे मार्केट मार्केटयार्ड मध्ये मोठ्या प्रमाणात व्यापार होत असतो कोल्हापूर शहरामध्ये जग प्रसिद्ध अर्धशक्ती पीठ महालक्ष्मी देवीचे मंदिर आहे श्रावण महिना व दसऱ्यामध्ये खूप खूप गर्दी असते लाखो भाविक दररोज दर्शनासाठी येत असतात रंकाळा तलाव तलाव, किल्ले पन्हाळा गड येथे ही पर्यटक मोठ्या प्रमाणात रोज येत असतात,वाडी रत्नागिरी येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत केदारलिंग (ज्योतिबा) देवालयाची मंदिर असल्याने लाखो भाविक दर्शनासाठी दररोज येत असतात व पर्यटनासाठी पर्यटक सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दररोज येत असतात अशा सर्व पर्यटकांना या महामार्गाच्या अर्धवट कामामुळे त्रास सहन करावा लागत आहे दिवशेनं दिवस वाहतूककोंडी ,रहदारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे प्रशासनाने तात्काळ या बाबीकडे लक्ष घालावे व या महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.

Previous Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *