पुणे, दि. १० ऑगस्ट २०२६ :
मानवतेची सेवा आणि गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जगद्गुरु श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी, रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणिजधाम यांच्या प्रेरणेने युवा सेनेमार्फत सुरू असलेल्या ‘ब्लड इन नीड’ या सेवाकार्याचा विस्तार करण्यासाठी ‘ऋणानुबंध ॲप’ चा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
हा लोकार्पण सोहळा रविवार, दि. १६ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २.०० ते ४.०० वाजता महालक्ष्मी लॉन्स, खराडी, पुणे येथे होणार आहे.
आता पर्यंत २७,६३८ गरजू रुग्णांना ब्लड इन निड या सेवेच्या माध्यमातून जीवनदान!
जगद्गुरु श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी, रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणिजधाम
यांच्या प्रेरणेतून युवा सेनेमार्फत सुरू असलेल्या ‘ब्लड इन नीड’ सेवेतून आतापर्यंत २७,६३८ गरजू रुग्ण आणि अपघातग्रस्तांना वेळेवर रक्तदाते उपलब्ध करून देत त्यांचे प्राण वाचविण्यात आले आहेत. रक्ताची गरज असताना योग्य रक्तदाता वेळेत उपलब्ध करून देण्याचे हे सेवाकार्य आज अनेकांसाठी जीवनदायी ठरत आहे.
याच सेवाकार्याला अधिक व्यापक, गतिमान आणि तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी ‘ऋणानुबंध ॲप’ च्या माध्यमातून रक्तदाते आणि रक्तमित्रांची नोंदणी करण्यात येणार आहे. गरज पडल्यास रक्ताची आवश्यकता असलेल्या व्यक्तीला उपलब्ध रक्तदात्याशी जलदगतीने जोडण्याचे कार्य या माध्यमातून अधिक सुलभ होणार आहे.
‘गरज तिथे रक्तदाता’ या संकल्पनेतून सुरू असलेल्या या अभियानाचा उद्देश समाजातील अधिकाधिक नागरिकांना रक्तदानाच्या सेवेशी जोडणे आणि एका रक्तदात्याच्या माध्यमातून अनेकांचे जीवन वाचविण्याची साखळी निर्माण करणे हा आहे.
रक्तदाता बना, जीवन वाचवा!
मानवतेच्या या सेवाकार्यात सहभागी व्हा!
या लोकार्पण सोहळ्यास सेवाभावी कार्यकर्ते, रक्तदाते, रक्तमित्र तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ब्लड इन नीड विभाग, युवा सेना, जगद्गुरु श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी, रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणिजधाम यांच्या वतीने करण्यात आले आहे.
“तुम्ही जागा, दुसऱ्याला जगवा!”




