Uncategorized

जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रणेतून 200 हुन अधिक मरणोत्तर देहदान

out of 10

कोल्हापूर:जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रणेतून 2016 पासून देहदान ,अवयव दान हा उपक्रम समाजाच्या सेवेसाठी देशभरात अहोरात्र सुरू आहे या उपक्रमामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा फायदा होत आहे याचबरोबर अववयव दानामुळे बऱ्याच गरजू रुग्णांना त्याचा लाभ होत आहे. तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या संदेशाचे समाजामध्ये कौतुक होत आहे
आत्तापर्यंत 200 देहदान 156 अवयवदान जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणिजधाम रत्नागिरी यांच्या वतीने विविध राज्यात व जिल्ह्यात होत आहे ज.न.म संस्थानाकडून जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून ही चळवळ मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे. याचाच एक भाग कै. विवेकानंद बाळकृष्ण रावळ मु.पो. कोल्हापूर नाका स्वामी मळा इचलकरंजी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर वय वर्षे ६४ यांचे वृद्धाप काळाने बुधवार दिनांक १५/४/२०२६ रोजी मृत्यू झाला त्यांनी मृत्यू पश्चात देहदान करण्याचा संकल्प जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणिजधाम रत्नागिरी यांच्याकडे देहदान करण्यासंदर्भात फॉर्म भरून दिला होता त्या अनुषंगाने त्यांची मरणोत्तर देहदान करण्याची इच्छा होती त्यांची मुले श्री सुनील रावळ व अनिल रावळ यांनी ज.न.म. संस्थान नाणिजधाम यांच्याशी संपर्क साधून आपल्या वडिलांची मरणोत्तर देहदानाच्या इच्छापूर्तीसाठी कळवले संस्थानाने तात्काळ दखल घेऊन कोल्हापूर जिल्हा रामानंद संप्रदाय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क करून सदरचे 198 मरणोत्तर देहदान हे राजर्षि छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर यांच्याकडे केले यावेळी डॉक्टर. सौ.संध्याराणी पाटील प्राध्यापक व विभाग प्रमुख शरीररचना शास्त्र व त्यांचा स्टाफ तसेच मरणोत्तर देहदान दात्यांच्या वतीने नातेवाईक बाळकृष्ण आप्पाजी रावळ — वडील श्रीमती विमल विवेकानंद रावळ– पत्नी सुनील रावळ मोठा मुलगा अनिल रावळ — लहान मुलगा ,स्नेहल सुनील रावळ — मोठी सुनशोभा रावळ–मुलगी हणमंत रावळ — जावई नातवंडे ज्ञानेश्वरी रावळ रुद्र रावळ पूजा रावळ श्रीकांत रावळ श्रीहरी रावळ सहर्ष रावळ अरुण रावळ– भाऊ कल्पना रावळ — भावज
तसेच रामानंद सांप्रदाय कोल्हापूर जिल्हा कार्यकर्ते जिल्हा सेवा अध्यक्ष श्री कृष्णात माळी,जिल्हा सह अध्यक्ष श्री मधुकर बाबर,जिल्हा सचिव श्री दिलीप कोळी,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख श्री रमेश मगदूम,जिल्हा सामाजिक उपक्रम प्रमुख श्री अमित लाड,मुख्यपीठ महिला निरीक्षक सौ राधिका पाटील,गोवा उपपीठ महिला सपोर्टर सौ सीमा पाटील,मुख्यपिठ जनगणना प्रमुख श्री तुषार कदम, श्री अप्पासो कोणे,करवीर तालुका अध्यक्ष सौ अंजली तळवणेकर,श्री अमोल तळवणेकर,माजी जिल्हा युवा अध्यक्ष श्री अमोल पाटील,सौ लीना मोरस्कर, श्री विलास मोरस्कर,सौ आरती लाड, प्रोटोकॉल अधिकारी श्री एम आर पाटील, प्रोटोकॉल अधिकारी श्री विजय धनवडे,हातकणंगले माजी तालुका आध्यक्ष श्री सागर चव्हाण,श्री राम बन्ने,श्री विलास साळोखे,हातकणंगले तालुका ब्लड इन नीड प्रमुख श्री गुरुप्रसाद माळी,हातकणंगले तालुका अध्यक्ष सुरेश लोहार, सौ शीतल पाटील, गणेश कोळी,तसेच भक्त शिष्य उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यातून आत्तापर्यंत तीन मरणोत्तर देहदान व अवयव दान झाल्याची माहिती व ही चळवळ मोठ्या प्रमाणात राबवणार असल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष कृष्णात माळी यांनी दिले.

Previous Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *