Uncategorized

पुणे बेंगलोर हायवे अंबप फाट्याजवळ अपघात नरेंद्राचार्य महाराज संस्थांनाची ॲम्बुलन्स तात्काळ घटनास्थळी दाखल


कोल्हापूर: वाठार तर्फ वडगाव येथील दादाराव सर्जेराव कामत वय वर्ष ४० हे आज सकाळी ८.३० च्या सुमारास अंबप फाट्या जवळील राजेश मोटर कंपनीमध्ये कामावरती सायकल वरून चालले असता अंबप जवळ पुलाचे काम सुरू असल्याने ते सायकल सायकलवरून रस्ता क्रॉस करीत असताना पुण्याहून येणाऱ्या बोलेरो गाडी नंबर MH 50 U 4266 या गाडीने त्यांना जोराची धडक दिल्याने सायकल स्वार रस्त्याच्या कडेला जाउन पडले. जोराचे धडक बसलेले ते जखमी झालेत व सायकलचा चक्काचुरा झाला असून सदर घटनेची माहिती मिळताच वाठार ब्रिज खाली असलेली जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थांनाच्या ॲम्बुलन्स चे चालक अमित घोटवडे तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन सदर जखमी दादाराव कामत यांना ॲम्बुलन्स नं.MH 08 w 0142 मधून पेठ वडगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले त्यांच्यावर तेथे उपचार सुरू आहेत
या आठवड्यातील याच ठिकाणचा हा दुसरा अपघात असून अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. रस्त्याचे काम जलद गतीने व्हावे रस्त्यावरती कोणतेही प्रकारचे वेग मर्यादेचे फलक लावलेले नाहीत तसेच पुलाजवळ काम चालू आहे तोपर्यंत दोन्ही बाजूला स्पीड ब्रेकर नाहीत त्यामुळे वारंवार अपघाताची संख्या वाढत आहे या अपघातामुळे सुमारे अर्धातास रस्त्यावरती एका बाजूने ट्राफिक जाम झाले होते तरी रस्ता प्रशासनाने याची लवकरात लवकर दाखल घ्यावी अशी मागणी नागरिकातून होत आहे.

Previous Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *