कोल्हापूर: शिये कसबा बावडा रोडला जोडला जाणाऱ्या पंचगंगा नदी पुला वरती व पुला शेजारी बावड्या कडील बाजूला प्लॅस्टिक कचऱ्याचे साम्राज्य दिवशी दिवस वाढत आहे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे सध्या येथे कचऱ्याचा खच लागला असून नदीपात्रात सुद्धा कचऱ्याचे थर साचले आहेत नदी पात्रात प्रदूषण झाल्याने माशांचे व जलचर प्राण्यांचे मृत होण्याचे प्रमाण वाढत आहे प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे कित्येक वर्ष या ठिकाणी या रोडवरील असणारे व्यावसायिक कचरा आणून टाकत आहेत सदर कचऱ्याचे विल्हेवाट लावण्यासाठी आतापर्यंत कोणतेही व्यवस्था केलेली दिसत नाही तथापि कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन यांनी लक्ष घालून संबंधित व्यवसायिकांना कचऱ्याचे योग्य नियोजन करून तो कचरा कुंडीत मध्ये कसा ठेवता येईल याचे नियोजन करणं गरजेचे आहे पंचगंगा नदी ही नेहमी कोणत्या ना कोणत्या प्रदूषणाच्या माध्यमातून प्रदूषित होत आहे. या कचऱ्यामध्ये शिळे झालेले व वेस्ट झालेले अन्नपदार्थ टाकले जातात त्यामुळे येथे मुख्या प्राण्यांना पदार्थ खात असताना पोटामध्ये प्लास्टिक जाण्याची शक्यता नाकारता येत नाही या घटनेमुळे मुख्या प्राण्यांच्या जीवितासी खेळण्याचा प्रकार घडत आहे आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी स्वच्छ भारत अभियान हाती घेतले असले तरी कोल्हापूर शहराततून जाणाऱ्या प्रमुख रस्त्यावरच अशी अवस्था आहे तरी प्रशासनाने यामध्ये लक्ष घालून येथील कचऱ्याचे विल्हेवाट लावून पंचगंगा नदीचे या जिवन दायिनीचे प्रदूषणाच्या विळख्यातून रक्षण करावे अशी मागणी नागरिकातून व समाजाच्या विविध स्तरातून होत आहे.