Uncategorized

‘शिवाजी विद्यापीठा’चा नामविस्तार ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ झालाच पाहिजे ! – १० सहस्र हिंदूंची मोर्चाद्वारे ललकारी

5 out of 10


कोल्हापूर : कोल्हापूर येथील ‘शिवाजी विद्यापीठ’, चे ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’, असा नामविस्तार करण्यात यावा या मागणीसाठी हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु राष्ट्र समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, 17 मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. १० सहस्रो हिंदूंनी एकमुखाने ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असा नामविस्तार झालाच पाहिजे, अशी मागणी केली. मोर्चाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. दसरा चौकातून चालू झालेला हा मोर्चा लक्ष्मीपुरी, व्हिनस कॉर्नर मार्गे ‘बी’ न्यूजच्या कार्यालयावरून जिल्हाधिकारी कार्यालय येथे समाप्त झाला. जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चा आल्यावर जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले. याच समवेत क्रूर औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण तात्काळ थांबवण्यासाठी कबरीला दिला जाणारा निधी बंद करावा, तसेच औरंगजेबाची कबर काढून टाकण्यात यावी, या मागणीचेही निवेदन देण्यात आले.

या मोर्चात विविध आध्यात्मिक संप्रदाय, हिंदुत्वनिष्ठ संघटना, पक्ष, तरुण मंडळे, विविध सामाजिक संघटना, व्यापारी संघटना यांचा प्रमुख सहभाग होता. या मोर्चात सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गगुरू स्वाती खाडये यांच्यासह निपाणी येथील प.पू. प्राणलिंग स्वामिजी यांचा सहभाग होता.

मोर्चाच्या अंती तेलंगणा येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी.राजासिंह, सनातन संस्थेचे श्री. अभय वर्तक, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट, छत्रपती ग्रुपचे संस्थापक श्री. प्रमोददादा पाटील यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात सहभागी असलेल्या मावळांचे वंशज यांनी मनोगत व्यक्त केले. यात प्रामुख्याने वीर शिवा काशीद यांचे वंशज श्री. आनंदराव काशीद, सरदार मालुसरे यांचे 13 वे वंशज कुनाल मालुसरे आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज यांनीही मनोगत व्यक्त केले.

* मान्यवरांची मनोगते ! –

नामविस्ताराला विरोध करणार्‍या पुरोगाम्यांना हिंदूंच्या संघटितपणाची शक्ती प्रत्युत्तर देईल ! – टी. राजासिंह, आमदार, तेलंगणा

आज आपण इथे केवळ नामविस्ताराच्या मोर्चासाठी एकत्र आलेलो नसून हिंदूंची अस्मिता, गौरव आणि हिंदवी स्वराज्याचा संकल्प करण्यासाठी एकत्र आलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ हे केवळ विद्यापीठ नसू तो आमचा स्वाभिमान आहे. इतकी वर्षे ‘छत्रपती’ ही पदवी लागू नये यांसाठी प्रयत्न करणे करणारे पुरोगामी आणि सेक्युलरवादी यांना जाहीर आव्हान देण्यासाठीच मी आलोय आणि हिंदूंच्या संघटितपणाची ही शक्ती इथे पाय रोवून उभी आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर आजही अनेक अतिक्रमण शिल्लक असून ही अतिक्रमणे शासनाने तात्काळ हटवली पाहिजेत, अन्यथा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी ती हटवण्याची मोहीम हातात घ्यावी लागेल. एकीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिराला देण्यासाठी प्रशासनाकडे निधी नाही, तर दुसरीकडे तेच पुरातत्व खाते संभाजीनगर येथील औरंगजेबाच्या कबरीवर मात्र लाखो रुपये खर्च करत आहे. हे आम्ही सहन करणार नाही. तरी औरंजेबाच्या कबरीच्या देखभालीसाठी खर्च केला जाणारा निधी तात्काळ सरकारने बंद करावा, तसेच ही कबरही काढून टाकण्यात यावी.

अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत नाव न पालटल्यास, तर संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन छेडणार ! – सुनील घनवट, हिंदु राष्ट्र समन्वय समिती

शिवजयंतीच्या दिवशीच छत्रपती शिवाजी महाराज अशी उपाधी देण्याची मागणी करावी लागते हे दुर्दैवी आहे. हा विरोध केवळ ‘छत्रपती’ या शब्दाला नसून ‘छत्रपती शिवाजी महाराजांना’च आहे. नेहरूंना जर ‘पंडित’ ही उपाधी चालते, गांधीजींना ‘महात्मा’ ही उपाधी चालते, तर शिवाजी महाराज यांचा ‘छत्रपती’ ही पदवी का चालत नाही. पुरोगाम्यांना ‘छत्रपती म्हणण्यास लाज का वाटते ?’, फेब्रुवारी 2011 मध्ये काढलेल्या महाराष्ट्र शासनाच्या आदेशात म्हटले आहे की, राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक यांचा अवमान होता कामा नये हे पुरोगामी स्वतःला शिवप्रेमी समजतात; मात्र हे तथाकथित शिवप्रेमी आहेत. त्यांचा ‘सिलेक्टेड’ शिवप्रेम आहे, कारण हे लोक औरंगजेबाच्या थडग्याचे (कबरीचे) समर्थन करणारे, तसेच औरंगजेबाचे स्टेटस ठेवणारे यांच्याविषयी चकार शब्द उच्चारत नाहीत. महाराष्ट्रात ‘छत्रपती शाहू महाराज, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुण्यश्‍लोक आहिल्याबाई होळकर विद्यापीठ, राजश्री छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय अशी पूर्ण नावे दिले, तर ते चालते; मात्र शिवाजी विद्यापिठाचे नाव पालटून ते छत्रपती शिवाजी महाराज असे करा म्हटले की, आडकाठीची भूमिका घेतली जाते. आज जवाहरलाला नेहरु युनिर्वसिटी (‘जे.एन्.यु.मध्ये) केवळ ‘भारत तेरे टुकडे होंगे’च्या घोषणा दिल्या जात नसून, स्वामी विवेकानंद यांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली, दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांनी भारतीय सैनिकांची हत्या केल्यावर विद्यापिठात मिठाई वाटण्यात आली. तोच प्रकार आपल्याला कोल्हापूर येथे होऊ द्यायचा नसून कोणत्याही परिस्थितीत शिवाजी विद्यापीठाला ‘जे.एन्.यु.’ होऊ देणार नाही. कोल्हापूर हे कधीही सहन करणार नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असे नाव यात विद्यापिठाला दिले पाहिजे. अन्यथा राज्यभर या विषयी आंदोलन छेडून लढा चालूच ठेवण्यात येईल.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदराने उल्लेख करण्याऐवजी ‘शिवाजी कोण होता ?’, असे पुस्तक लिहिणारे कॉ. पानसरे कोण आहेत ? अशा प्रकारे शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख हा हिंदूंच्या अस्मितेवर आघात असून या पुस्तकावर शासनाने बंदीच घालणे अपेक्षित आहे. २६/११ चे आक्रमण आतंकवादी कसाबने केले हे सर्वोच्च न्यायालयानेही मान्य केलेले असतांना भारतीय गुप्तचर यंत्रणांवर संशय घेणारे जे ‘हू किल्ड करकरे’, असे पुस्तक ज्यांनी लिहिले, त्यांचे समर्थन करणार्‍या पुरोगाम्यांचा चेहरा या निमित्ताने आता उघड होत आहे.

जोपर्यंत विद्यार्थ्यांमध्ये छत्रपती शिवरायांचा खरा विचार रूजत नाही, तोपर्यंत हा लढा चालूच राहिल ! – अभय वर्तक, सनातन संस्था

जे लोक छत्रपती शिवाजी महाराज यांचा नेहमी ऐकेरी उल्लेख करतात त्या विचारधारेतील लोकांकडूच आज विद्यापीठाचा विस्तार ‘छत्रपती’ होताना सहन होत नाही. या नामविस्तारला मुख्यत्वेकरून पुरोगामी, डावे आणि हिंदूविरोधी यांचाच विरोध असून ‘लघुरूप’ची खोटी कथानके रचली जात आहेत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांनी ‘सेक्युलर’बनवण्याचे षडयंत्र आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. छत्रपतींचे राज्य हे ‘हिंदवी स्वराज्य’ म्हणून ओळखले जाते त्या छत्रपतींच्या विद्यापीठातील मूर्तीसमोर भगवा ध्वज नसावा ही किती दुर्दैवी आहे. त्यामुळे यापुढील आपला लढा केवळ नामविस्तारापुरता मर्यादित नसून जोपर्यंत विद्यार्थ्यांमध्ये छत्रपती शिवरायांचा खरा विचार रूजत नाही, तोपर्यंत हा लढा चालूच राहिल !

समारोपप्रसंगी छत्रपती ग्रुपचे संस्थापक श्री. प्रमोददादा पाटील, भाजप महिला आघाडीच्या सौ.रूपाराणी निकम, किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री. जयसिंगराव शिंदे-सरकार, शिवसेनेचे नेते श्री. सत्यजित कदम, नरवीर तानाजी मालुसरे यांचे १३ वे वंशज यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.

* सहभागी संघटना संप्रदाय आणि जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज प्रणित ‘श्री’ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, स्वामी समर्थ संप्रदाय, इस्कॉन, मंदिर सेवेकरी, गजानन महाराज भक्त मंडळ, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदू एकता आंदोलन, हिंदू महासभा, ‘छत्रपती ग्रुप’, महाराष्ट्र मंदिर महासंघ, ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’, ‘अखिल भारतीय रेशनिंग महासंघ’, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती, शिवसेना, भाजप, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, विविध तरुण मंडळे, तालीम

उपस्थित मान्यवर –

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले आणि श्री. किशोर घाटगे, मंदिर महासंघाचे सहसंयोजक श्री. अभिजित पाटील, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे आणि करवीरतालुकाप्रमुख श्री. राजू यादव, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. आनंदराव पवळ, महाराजा प्रतिष्ठानचे श्री. निरंजन शिंदे, मराठा तितुका मेळवावाचे श्री. योगेश केरकर, श्री संप्रदाय कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्री कृष्णात माळी निरीक्षक श्री विजय लगड सातारा जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे निरीक्षक श्री सूर्यकांत भिकोले बेळगाव ग्रामीण व शहर निरीक्षक श्री संजय वागावकर जिल्हाध्यक्ष श्री आण्णासाहेब भोसले श्री मंजुनाथ कटकोळ मुख्यपीठ महिला निरीक्षक सौ सीमा पाटील जि.महिला अध्यक्षा प्रणाली पाटील वारकरी संप्रदायाचे
भ.प. विठ्ठलतात्या पाटील, ह.भ.प. महादेव महाराज यादव, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कोल्हापूर जिल्हा कार्यवाह श्री. सुरेश यादव, शहर कार्यवाह श्री. आशिष लोखंडे यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.

* विशेष !

१. अत्यंत शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध झालेल्या मोर्चाने सर्वांचे लक्ष वेधले. मोर्चासाठी सातारा, सांगली, बेळगावसह कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून भगवे ध्वज घेऊन आणि गटा-गटाने युवक उत्स्फूर्तपणे ‘जयघोष’ करत सहभागी झाले होते.

२. मोर्चासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात सहभागी असलेल्या सरदार-मावळे यांचे वंशज उपस्थित

३. या मोर्चात अनेक पथकांचा सहभाग. ढोल-ताशा पथक, मर्दानी खेळ, शिवकालीन युद्धपथक, टाळ-मृदंग यांचे पथक, विविध संप्रदायांचे भक्त, मावळ्यांची वेशभूषा यांसह पारंपरिक वेशभूषा, महिलांचे रणरागिणी पथक सहभागी.

* फलकांवरील वैशिष्ट्यपूर्ण मजकूर – ‘शिवाजी विद्यापीठ’ नव्हे, तर छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ म्हणा अन् जपा हिंदवी बाणा !



Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *