कोल्हापूर: जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणीजधाम येथील जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या रामानंद संप्रदायाच्या वतीने उपपीठ तेलंगणा ते नाणिजधाम रत्नागिरी (महाराष्ट्र) या वसुंधरा पायी दिंडीचे कोल्हापूर जिल्ह्यात जल्लोषात स्वागत करण्यात आले कोल्हापूर जिल्हा सेवा समिती व शिरोळ तालुका सेवा समिती यांच्या वतीने जयसिंगपूर येथे हलगीच्या गजरात अश्वाच्या नाचात उत्साहात स्वागत करण्यात आले अतिशय मनमोहक सुंदर सजावट केलेल्या रथामध्ये जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुका पूजन शिरोळ तालुक्यातील यजमानांच्या हस्ते संपन्न करण्यात आले तसेच सुहासिनीनी पादुकांचे औक्षण करून वातावरण मंगलमय केले तसेच शुभारंभ मल्टीपर्पज हॉल जयसिंगपूर येथे पादुकांचे मुक्कामाच्या ठिकाणी आगमन झाले यावेळी यजमानांच्या हस्ते पूजन करून स्वागत केले.
ही वसुंधरा पायी दिंडी रामानंद संप्रदायाच्या तेलंगणा पिठावरून दि 27 सप्टेंबर 2025 रोजी निघाली असून या वसुंधरा दिंडीमध्ये जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने पर्यावरण रक्षणासाठी ही वसुंधरा पायी दिंडी चे आयोजन केले असून यामध्ये ग्लोबल वॉर्मिंग जनजागृती करत जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचे हजारो अनुयायी हजारो किलोमीटर पायी प्रवास करून 21 ऑक्टोबर रोजी रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या जन्मोत्सासाठी श्री क्षेत्र नाणीजधाम येथे पोहोचणार आहेत ही दिंडी ग्लोबल वार्मिंग चे धोके काय आहेत पर्यावरणाचा समतोल कसा राखावा निसर्गाचे रक्षण कसे करावे पृथ्वीचे रक्षण कसे करावे प्लॅस्टिक वापर करू नये झाडे लावा झाडे जगवा झाडे तोडू नका प्रदूषण टाळा नदी नाले स्वच्छ ठेवा परिसरात स्वच्छता राखा अशी संदेश देणारे फलक घेऊन चालणारे युवायुवती जनजागृती करत आहेत त्याचप्रमाणे युवा युवती ग्लोबल वॉर्मिंगचे पथनाट्य सादर करत जनजागृती करत आहेत या दिंडीतील हजारो अनुयायी दररोज 25 किलोमीटर पायी प्रवास करत जगद्गुरु रामानंदाचार्यजींच्या सिद्धपादका घेऊन अध्यात्म आणि सामाजिक जनजागरण करत कोल्हापूर जिल्ह्यातून हातकणंगले करवीर कोल्हापूर शहरातून तसेच पन्हाळा शाहूवाडी या तालुक्यातून नाणिजधाम च्या दिशेने मार्गस्थ होणार आहेत. या दिंडीमध्ये पर्यावरण रक्षणाचा एक भाग म्हणून दिंडी मुक्काम व दुपारची भोजन या मार्गावरती एक पेड माँ के नाम या अनुषंगाने जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने वृक्ष लागवड ही मान्यवरांच्या हस्ते करण्यात येत आहे. पर्यावरण संवर्धनाचा हा उपक्रम फक्त संदेशापुरता मर्यादित न राहता कृतीतही उत्तरविला जात आहे या संपूर्ण यात्रेची व्यवस्था अत्यंत शिस्तबद्ध आणि अध्यात्मिक वातावरणात केली गेली आहे यात्रिकेसाठी सात्विक पौष्टिक आणि शुद्ध अन्नाची विशेष भोजन व्यवस्था केली आहे स्वच्छ पिण्याचे पाणी टॉयलेट व्हॅन आरोग्य पथक औषधे रुग्णवाहिका याची व्यवस्था केली आहे प्रत्येक मुक्कामी निवास आणि विश्रांतीची सोय केली आहे या दिंडीमध्ये प्लास्टिकचा पूर्णतः निषेध करण्यात आला आहे प्रत्येक यात्रेकी स्वतःची स्टीलचे ताट वाटी ग्लास आणि पाण्याची बाटली सोबत ठेवतो सेवक रस्त्यातील स्वच्छतेची विशेष काळजी घेतात रस्त्यावर कचरा टाकणे उघड्यावर शौच विसर्जन टाळणे यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून चालणारी ही वसुंधरा पायी दिंडी सामाजिक सेवांचे एक मोठे उदाहरण आहे त्यांच्या नेतृत्वात देहदान अवयव दान रुग्णवाहिका सेवा रक्तदान व्यसनमुक्ती ग्राम स्वच्छता मोफत वेदपाठ शाळा मोफत शैक्षणिक सुविधा ही दिल्या जात आहेत भावी पिढीसाठी हा उपक्रम दीपस्तंभ ठरत आहे. यावेळी पीठ महिला निरीक्षका सीमा पाटील मुख्य पीठ जनगणना प्रमुख तुषार कदम कोल्हापूर जिल्हा सेवा समितीचे जिल्हा निरीक्षक विजय लगड सह जिल्हा निरीक्षक रमेश लोकरे, जिल्हाध्यक्ष कृष्णात माळी सह जिल्हा अध्यक्ष मधुकर बाबर जिल्हा सचिव दिलीप कोळी महिला जिल्हा अध्यक्षा प्रणाली पाटील जिल्हा अध्यात्मिक प्रमुख तुकाराम पाटील जिल्हा देणगी प्रमुख दशरथ मोहीते जिल्हा युवा अध्यक्ष अमोल पाटील जिल्हा कर्नल रुपेश सुतार प्रोटोकॉल अधिकारी विजय धनवडे पीठ विकास ब्रिगेडियर शोभा धनवडे हातकलंगले तालुका अध्यक्ष सुरेश लोहार ब्लड इन प्रमुख गुरुप्रसाद माळी शिरोळ तालुका अध्यक्ष महेश फल्ले महिला तालुका अध्यक्षा सुनीता हेरवाडे माजा तालुका महिला अध्यक्षा सुमित्रा गावडे सचिव राजाराम काळे माजी तालुकाध्यक्ष दिलीप चव्हाण रमेश गावडे नितीन नरळे दीपक पाटील यांच्यासह विजय माळी शंकर बेनाडे मारुती नंदीवाले गणपती मोरे देवराम जंगले वैभव पाटील विवेक पाटील सुभाष माने शिवाजी जाधव राहुल राजमाने परशराम नंदीवाले यांच्यासह तालुक्यातील युवा सेना संग्राम सेना महिला सेना उपस्थित होते.