
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील रस्त्यांची दुरवस्था – नागरिकांच्या आरोग्य, सुरक्षितता व जनतेच्या कररुपी पैशांचा अपव्यय याविषयी मागणीपत्र.“हिंदू जन संघर्ष समिती, कोल्हापूर” यांच्यावतीने महानगरपालिका आयुक्त
कार्यालयास हे निवेदन देण्यात आले. सध्या कोल्हापूर शहरातील रस्त्यांची परिस्थिती भयावह झालेली आहे. शहरातील प्रमुख व आंतररस्त्यांवर प्रचंड खड्डे, उखडलेला डांबर, पावसाळ्यात साचलेले पाणी आणि आता पावसाळ्यानंतर सर्वत्र उडणारी धूळ यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन अक्षरशः संकटात आले आहे.
या रस्त्यांमुळे झालेल्या अपघातांमध्ये अनेकांना गंभीर दुखापती, कायमचे अपंगत्व व मृत्यू देखील ओढवले आहेत.धुळीमुळे श्वसनाचे आजार मोठ्या प्रमाणात वाढले असून, मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांचा जीव धोक्यात आला आहे.कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीत एवढ्या मोठ्या प्रमाणात कर आकारणी केली जाते, परंतु त्यातून होणाऱ्या विकासकामांचा दर्जा अत्यंत निकृष्ट असून नागरिकांचे कराचे पैसे वाया जात आहेत.
⚖️ कायदेशीर व सार्वजनिक हिताचा आधारा बाबत ही माहिती त्यानी दिली
1. भारतीय संविधानातील अनुच्छेद 21 – नागरिकांना “सुरक्षित व आरोग्यदायी जीवनाचा अधिकार” आहे
2. महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यानुसार शहरातील रस्त्यांची देखभाल ही महानगरपालिकेची कायद्याने बंधनकारक जबाबदारी आहे.
3. करदात्यांचे पैसे खर्च करून केलेली कामे ही दर्जेदार असणे आवश्यक असून, पारदर्शकता व जबाबदारी ही लोकशाहीतील मूलभूत अपेक्षा आहे.
तसेच त्यानी ठोस मागण्या ही पुढील प्रमाणे केलेल्या आहेत
कृपया पुढील माहिती ७ ते १५ दिवसांच्या आत लेखी स्वरूपात तसेच ई-मेलवर उपलब्ध करून द्यावी –
1. मागील ३ वर्षांत (२०२२–२०२५) नव्याने बनविलेले / डांबरीकरण / दुरुस्ती केलेले सर्व रस्त्यांची यादी.
2. प्रत्येक रस्त्याच्या कामासाठी जारी करण्यात आलेल्या वर्क ऑर्डरची प्रत.
3. संबंधित काम करणाऱ्या ठेकेदारांची संपूर्ण माहिती (नाव, पत्ता, परवाना इ.).
4. प्रत्येक रस्त्यासाठी मंजूर व खर्च केलेला निधी व त्याचा स्रोत (फंड/योजना).
5. सदर कामांचे निरीक्षण अहवाल (Inspection Reports) असल्यास त्यांची प्रत.
6. प्रलंबित व मंजूर रस्ते कामांची अद्ययावत यादी.
तसेच सदरच्या मागण्या मान्य नाही झाल्यास त्यांनी इशाराही दिला आहे जर ही माहिती व कागदपत्रे लवकर उपलब्ध करून दिली नाहीत तर आम्हाला माहिती अधिकार कायदा 2005 चा वापर करून सर्व माहिती मागवावी लागेल. तसेच पुढील टप्प्यात आम्ही लोकायुक्त, ACB, ग्राहक न्याय मंच, न्यायालय व जनआंदोलन यांचा मार्ग अवलंब करू.तसेच त्यांनी आम जनतेला ही आवाज उठवण्याचे आवाहन केले आहे
तसेच बोलताना त्यांनी शहरातील प्रत्येक नागरिक आपले वेळेवर कर भरतो. हेच पैसे रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी व विकासासाठी खर्च केले जाणे अपेक्षित आहे. पण सध्या रस्त्यांची झालेली दुर्दशा हा जनतेच्या विश्वासघात झाल्याचे त्यानी स्पष्ट केले आहेस्पष्ट आहे. म्हणूनच नागरिकांच्या हक्कासाठी हे निवेदनअतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, शहर अभियंता रमेश मस्कर यांना सदरचे निवेदन देण्यात आल्याची माहिती
हिंदू जनसंघर्ष समिती, कोल्हापूर अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी दिली