




कोल्हापूर : पेठ वडगांव येथील सोमनाथ नागरी सहकारी पतसंस्थेने अल्पावधीतच गरूड भरारी घेत हेडऑफीस सह १५ शाखे मध्ये कामकाज सुरू असुन आज संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुरुवातीला शिराळा बँकेचे माजी जनरल मॅनेजर चंद्रकांत माळी यांच्या हस्ते प्रतिमापूजन व के.डी.सी.सी. बँकेचे माजी बँक निरीक्षक हंबीरराव वडणगे शाखा चेअरमन सुभाष पाटील व सर्व संचालक मंडळ यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने संस्थेच्या संस्थापक चेअरमन अशोकराव माळी यांनी ३१ मार्च २५ अखेर संस्थेने केलेल्या प्रगतीचा अहवाल वाचन करून अल्पावधीत संस्थेने ३१ मार्च अखेर वसुल भाग भांडवल १कोटी ८३ लाख ५२ हजार ५०० रुपये ,
निधी २ कोटी १६ लाख १० हजार, ठेवी ३१ कोटी ५१ लाख ६५ हजार, गुंतवणूक ८ कोटी ६ लाख ९ हजार , कर्जे २६ कोटी ५३ लाख २९ हजार ,नफा ५१ लाख १६ हजार, खेळते भांडवल ५० कोटी ४३ लाख २० हजार इतका वाढता आलेख सांगितला असून संस्थेचा मुख्य उद्देश कुटीर उद्योग धंद्यांना अर्थ पुरवठा व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन संकल्पनेच्या साह्याने सभासदांचे व समाजाचे जीवनमान उंचवण्यासाठी सतत कार्यरत आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी विविध कर्ज योजना करून आर्थिक पुरवठा करणेस कटीबद्ध राणार तसेच पुढील सात वर्षाची उद्दिष्टे व ध्येय धोरण संस्थेच्या रोप्यमहोत्सवा पर्यंत १०० कोटी ठेवी, ५०० कोटी व्यवसाय ,२०० कर्मचारी, ३ कोटी प्रती कर्मचारी व्यवसाय, ७० कोटी कर्जे ,कार्यक्षेत्र महाराष्ट्र,शाखा ४० अशी उद्दिष्टे असल्याची माहिती दिली तसेच संस्थेस स्थापनेपासून सतत ऑडिट वर्ग ‘अ’ शासनाकडून कोल्हापूर व सांगली जिल्हा कार्यक्षेत्रास मंजुरी असून सर्व शाखा मध्ये कोअर बँकिंग प्रणालीद्वारे NEFT/RTGS त्वरित उपलब्ध लवकरच सांगली जिल्ह्यात चार शाखा सुरू करणार असल्याची माहिती दिली तसेच सभासदांनी आपले व्यवहार संस्थेमध्ये करण्याचे आव्हान केले.







यावेळी तात्यासाहेब मोहिते प्रशिक्षण केंद्राचे उपप्राचार्य श्री पी.बी. घाडगे यांनी सभासदांना प्रशिक्षण दिले व सहकाराचे महत्व पटवून दिले तसेच सहकार कायद्या बद्दल माहिती दिली संस्थेने चांगली कामगिरी केल्याबद्दल संस्थेच्या संचालक मंडळ व कर्मचारी व सभासद यांचे कौतुक केले.
यावेळी सभासदांच्या दहावी व बारावी ७५ टक्के च्यापुढे मार्क मिळालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व संस्थेच्या गुणवंत कर्मचारी व पिग्मी एजंट यांचा सत्कार करण्यात आला तसेच शाखा वडणगे यांनी चार महिन्यांमध्ये १ एक कोटी ठेवीचा टप्पा पूर्ण केला त्याबद्दल संचालक मंडळ व कर्मचारी यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थापिका सौ रूपाली माळी व्हा चेअरमन बजरंग माळी संचालक देवप्पा चोपडे, हंबीरराव देसावळे, महेशकुमार नाझरे, संतोष जाधव, पोपट खाडे, संपतराव पाटील, संजय धोंगडे संचालिका दिपाली माळी ,नयन पाडळकर, राजाराम कारखान्याचे संचालक डॉ. एम बी किडगावकर तसेच सर्व शाखांचे चेअरमन व सल्लागार समिती उपस्थित होते


या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप पवार सर यांनी केले प्रस्ताविक असिस्टंट जनरल मॅनेजर नागनाथ माळी यांनी केले अहवाल वाचन संस्थेचे संस्थापक चेअरमन श्री अशोकराव माळी यांनी केले आभार जनरल मॅनेजर कृष्णात माळी यांनी मांणले.














