Uncategorized

सोमनाथ पतसंस्थेची अल्पावधीत गरुड भरारी 16 व्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना : आमदार जयंतराव पाटील

out of 10


ईश्वरपूर: सोमनाथ ना.पत संस्था मर्या पेठवडगाव या संस्थेच्या ईश्वरपूर येथे सोळाव्या शाखेचा उद्घाटन सोहळा माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाला
यावेळी बोलताना जयंतराव पाटील म्हणाले सोमनाथ पतसंस्थेने अल्पावधीत कोल्हापूर व सांगली जिल्ह्यामध्ये कार्यक्षेत्र वाढ करून शासनाचे निकषाचे पालन करून ईश्वरपूर येथे १६ व्या शाखेचा शुभारंभ आज माझ्या हस्ते संपन्न होत आहे एक आनंदाची गोष्ट आहे या संस्थेचा प्रत्येक वर्षीचा चढता आलेख पाहता या संस्थेचे कोल्हापूर सांगली व पुढील काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शाखा विस्तार होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली व ईश्वरपूर येथील सर्व ग्राहक,ठेवीदार सभासद तसेच हितचिंतक यांना आपले व्यवहार सोमनाथ पतसंस्थेत करण्याबाबतचे अवाहन केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष दलित मित्र डॉक्टर आमदार अशोकराव माने उपस्थित होते यावेळी त्यांनी संस्थेच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या या
संस्थापक अध्यक्ष अशोक माळी यांनी बोलताना संस्थेने अल्पावधीत 38 कोटी ठेवीचा टप्पा पूर्ण केला असून संस्थेच्या सर्व शाखा नफ्यात असलेचे सांगून संस्थेचा महाराष्ट्र भर विस्तार करणार असले बाबत संस्थेने विविध कर्ज योजना राबवत असल्याचे माहिती दिली तसेच संस्थेच्या सर्व शाखेमध्ये आरटीजीएस एनईएफटी सुविधा सुरू असून सर्व शाखा कोअर बँकिंग प्रणाली मध्ये सुरू असल्याची माहिती दिली यावेळी प्रमुख उपस्थितीत मा. अतुल पाटील, हणमंत माळी,संचालक राजाराम बापू सह साखर कारखाना संचालक नगरसेवक आनंदराव पवार हिंदुराव माळी, तसेच शहाजी बापू पाटील संस्थापिका सौ.रूपाली माळी,व्हा.चेअरमन बजरंग माळी, संचालक हंबीरराव देसावळे , संपतराव पाटील , संजय धोंगडे ,चंद्रकांत माळी, जनरल मॅनेजर कृष्णात माळी असि.ज. मॅनेजर नागनाथ माळी, शाखा चेअरमन महेश माळी व्हा चेअरमन विष्णू माळी सदस्य शिव प्रसाद माळी, जयकर नागरे पाटील, जयंत पाटील, श्रीरंग माळी, बाबासाहेब हावलदार, रमेश माळी, दिग्विजय माळी, प्रकाश कोकितकर, अरुण माळी, शाखाधिकारी विक्रांत माळी ,उमेश पाटील, राजाराम कारखान्याचे संचालक डॉ. एम.बी.किडगावकर शाखा वडणगे चेअरमन सुभाष पाटील सदस्य सयाजी घोरपडे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागनाथ माळी यांनी केले आभार शाखा चेअरमन महेश माळी यांनी मानले

Previous Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *