
नाशिक: प्रतिनिधी, संतोष रायचंदे दि.०४/०७/२०२५ रोजी दुपारचे सुमारास सैय्यद पिंप्री येथील फिर्यादी श्री धनंजय झोमान यांचे बंद घराचे दरवाजाले कडी-कोंडा तोडून आत प्रवेश करून बेडरूममधील लोखंडी कपाटाचे लॉकर तोडून फिर्यादी यांचे संमतीशिवाय लबाडीचे इराद्याने कोणीतरी अज्ञात चोरटयाने घरफोडी करून सोन्या चांदीचे दागिने एकुन २,५५,०००/- रूपये किंमतीचा ऐवज बोरून नेला म्हणून नाशिक तालुका पोलीस ठाणेस गुरनं १०३/२०२५ भा.न्या. सं. कलम ३०५(अ) ३३१(३) प्रमाणे गुन्हा दाखल होता.
सदर घरफोडीचे गुन्हयाचे तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र मगर व नाशिक तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीमती मृदुला नाईक यांचे पथकाने यातील आरोपीताची गुन्हा करण्याची पध्दत व घटनास्थळांवर मिळून आलेल्या तांत्रिक बाबीचे अचुक विश्लेषन करून मिळविलेल्या गुप्त माहितीचे आधारे, तपास पथकाने सराईत गुन्हेगार नामे योगेशकुमार देविदास तायडे, वय ४३. हल्ली रा. रिगल हिल, खडकी, पुणे मुळ रा. जामनेर रोड, भुसावळ, जि. जळगाव यास शिताफिने ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेवुन सखोल चौकशी केली त्याने दि. ०४/०७/२०२५ रोजी मोटर सायकलवर सैयद पिंप्री या गावी जावुन, बंद घरांची टेहाळणी करून वरील बंद घर फोडून सोन्या-यांदीचे दागिने चोरी केल्याबी कबुली दिली आहे.
यातील आरोपी योगेशकुमार तायडे यास वरील गुन्हयात अटक करण्यात आली असुन त्याचे कब्जातुन गुन्हयामध्ये चोरीस गेलेले सोन्या चांदीचे दागिन्यांपैकी ३६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व चांदीच्या बस्तु, रोख ३४,५००/- रूपये, गुन्हयात वापरलेली यामाहा कंपनीची मोटर सायकल व हेल्मेट, मोबाईल फोन असा एकूण ४,६८,९०० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. सदर आरोपीवर यापूर्वी खडकी पोलीस ठाणे जि. पुणे येथे खुन व शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे, तसेव उपनगर पोलीस ठाणे नाशिक शहर येथे देखील चोरीचा गुन्हा दाखल आहेत. सदर आरोपीकडून वरील गुन्हयाचे तपासात घरफोडीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पेठ उपविभाग श्री. बासुदेव देसले यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र मगर, नाशिक तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीमती मृदुला नाईक, पोउनि अश्विनी मोरे, पोलीस अंमलदार निलेश मराठे, योगेश पाटील, अरूण रहिरे, नवनाथ आडके, नंदु सानप, संतोष घोडेराव, विकास कराड, तसेव स्थागुशाचे पोहवा संदिप नागपुरे, सचिन गवळी, धनंजय शिलावटे, हेमंत गिलबिले प्रदिप बहिरम, नितीन गांगुर्डे यांचे पथकाने सदरचा गुन्हा उघडकीस आणुन कारवाई केली आहे.