




कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात हवामान ढगाळ राहण्याची शक्यता आहे आणि काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडू शकतो, विशेषतः गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी आणि भुदरगड तालुक्यांमध्ये. हवामान विभागाने जिल्ह्यातील काही भागांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे, त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगावी.
सविस्तर माहिती:
हवामान :आज, ०१ सप्टेंबर २०२५ रोजी, कोल्हापूरमध्ये हवामान ढगाळ राहील आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
अतिवृष्टीचा इशारा: हवामान विभागाने जिल्ह्याला मंगळवारपासून पुढील ३ दिवसांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे.
प्रमुख पावसाची ठिकाणे: गगनबावडा, शाहूवाडी, आजरा आणि भुदरगड या तालुक्यांमध्ये अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे.
धरणांमधील स्थिती: धरणक्षेत्रातही पाऊस वाढल्याने धरणातील पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरूच राहिल्याने धरण पाणीसाठ्यात वाढ होत आहे.
राधानगरी धरणाचे दरवाजे उघडल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पंचगंगा नदीची पातळी वाढत असून काही बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.
नागरिकांसाठी सूचना:
पावसामुळे काही भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी सावध राहावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी.
धरण परिसरातील गावांमधील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे.
ऑगस्ट महिन्यात अनेक भागात धुव्वाधार पावसाच्या सऱ्या कोसळल्याने आधीच बळीराजाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. शेतात पावसाचे पाणी साचत अनेक पिके पाण्याखाली गेली आहे. खास करून महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भात पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. नांदेडसारख्या जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूर आला, घरात पाणी शिरलं. आता ऑगस्ट महिना सरला असून सप्टेंबर महिना चालू झाला आहे, मात्र या महिन्यातही धडकी भरवणारा पाऊस पडेल असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आला आहे. नद्यांच्या पाणी पातळीती ही वाढ होत असलेली दिसत आहे सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल अशी शक्यता आहे काही राज्याची चिंता वाढणार
भारतीय हवामान विभागाने संपूर्ण सप्टेंबर महिन्यात पाऊस कसा असेल, याचा एक अंदाज व्यक्त केला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सप्टेंबर २०२५ मध्ये मासिक सरासरी पाऊस १६७.९ मिमी या दीर्घकालीन सरासरीच्या १०९% पेक्षा जास्त होईल. देशाच्या बहुतेक भागात सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या या इशाऱ्यामुळे काही राज्याची चिंता वाढणार आहे, तर काही राज्यांना पावसाचा थेट धोका नसला तरी खबरदारी घ्यावी लागणार आहे. सप्टेंबर महिन्यात वायव्य, मध्य आणि दक्षिण भारतात पावसाचे प्रमाण सरासरी पेक्षा कमी राहील.

आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी एका ऑनलाइन पत्रकार परिषदेत बोलताना म्हंटल कि, सप्टेंबर महिन्यात उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन आणि पूर येऊ शकतात आणि दक्षिण हरियाणा, दिल्ली आणि उत्तर राजस्थानमधील सामान्य जनजीवन विस्कळीत होऊ शकते. छत्तीसगडमधील महानदीच्या वरच्या पाणलोट क्षेत्रातही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. सप्टेंबर मध्ये महाराष्ट्रातील पाऊस समाधानकारक असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आज कसं असेल पावसाचे वातावरण?
महाराष्ट्रात आज पूर्व विदर्भ, मराठवाडा आणि कोकण किनारपट्टीसह घाटमाथ्यावर जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांमध्येही हलक्या रिमझिम पावसाचे वातावरण राहणार आहे. हवामान विभागाने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा घाटमाथा, पुणे घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, वर्धा, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्याना येलो अलर्ट जारी केला आहे.

