

कोल्हापूर: गणेशोत्सव २०२५ कोल्हापूरातील गणेशभक्तांसाठी यंदाचा गणेशोत्सव एक अनोखा आणि ऐतिहासिक क्षण ठरला आहे शिवतेज मित्र मंडळ, शाहूपुरी ३ री गल्ली यांच्या मंडळाने पहिल्यांदाच श्रींच्या मूर्तीस तब्बल १ किलो सोन्याचा हार अर्पण करण्याचा संकल्प त्यांनी केला होता राज्याचे उद्योग मंत्री मराठी भाषा मंत्री महाराष्ट्रा तसेच मा.नामदार श्री उदय सामंत व यांच्या शुभ हस्ते व मा.नामदार श्री प्रकाश आबिटकर सार्वजनिक आरोग्य मंत्री व कुटुंब कल्याणी विभाग मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्यासह आमदार अमल महाडिक माजी खासदार प्रा.संजय मंडलिक शिवसेनेचे समन्वयक सत्यजित कदम युवा नेते ऋतुराज क्षीरसागर,अमित हुक्कीरेकर, माजी नगरसेवक प्रकाश नाईकनवरे, रामानंद संप्रदायाचे जिल्हाध्यक्ष कृष्णात माळी सचिव दिलीप कोळी सह जिल्हाअध्यक्ष मधुकर बाबर तसेच मंडळाचे कार्यकर्ते व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना मंत्री सामंत यांनी कोल्हापूर वासियाना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या कोल्हापूरच्या गणेश बाप्पाच्या दर्शन येत असताना मनस्वी आनंद होत आहे तसेच गणेशास त्यानी महाराष्ट्रातील बळीराजा सुखावला पाहिजे कोणत्या ही नागरिकाला महाराष्ट्रामध्ये अडचण कोणतीही येऊनये महायुती च्या सरकारकडून जणतेची सेवा गणेश बाप्पानी करुन घ्यावी अशी प्रार्थना यावेळी सर्वांनी बाप्पांच्या चरणी केल्याची माहिती त्यांनी दिली.
या संकल्पास परिसरातील व शहरातील असंख्य भाविकांनी उत्स्फूर्त व मनोभावे साथ दिली असून, श्रींवरील अखंड श्रद्धा आणि भक्तीचे हे जिवंत प्रतीक ठरले आहे.


मंडळाच्या अध्यक्ष मोहित खोत यांनी सांगितले की, “मनोकामना पूर्ण झाल्यानंतर श्री गणेशा विषयीच्या भक्तिभावातून हा संकल्प साकारला गेला आहे.” नवसाला पावणारे शिवतेज गणेश या स्वरूपात भाविकांच्या जीवनात प्रसन्नता, यश व समाधान देतात, अशी श्रद्धा भाविकांमध्ये असून, या वर्षी सुवर्णहार अर्पण सोहयाद्वारे त्या श्रद्धेला एका वैभवशाली रूपाची जोड मिळली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून शिवतेज मित्र मंडळाची मूर्ती ही ‘प्रसन्नतेचे प्रतीक’ म्हणून भाविकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करत आली आहे. शहरातील भाविकांसोबतच बाहेरगावच्या भाविकांचीही मंडळाच्या श्रींच्या दर्शनासाठी वर्षानुवर्षे गर्दी होत आली आहे.
यंदाचा सुवर्णहार अर्पण सोहळा हा भाविकांच्या सामूहिक भावनांचे प्रतिक आहे. भाविकांनी आपल्या-आपल्या मनोकामना पूर्ण झाल्यानंतर केलेले नवस व त्यातून जमा झालेली भक्तीशक्ती या संकल्पाच्या पाठीशी उभी राहिली आहे. हा हार म्हणजे सर्वांच्या भावनेतून साकार झालेला भक्तीचा सुवर्णहार आहे.

मंडळाचे पदाधिकारी आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. मंडळ परिसरात भाविक या ऐतिहासिक क्षणासाठी उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
मंडळाच्या वतीने सांगण्यात आले की, “श्रींच्या कृपेने प्रत्येक भाविकाची मनोकामना पूर्ण व्हावी हीच आमची प्रार्थना आहे. सुवर्णहार अर्पण सोहळा हा सर्व भाविकांच्या भक्तीभावाचा साक्षीदार ठरला आहे. “गणेशभक्तीचा आणि सामूहिक एकतेचा हा सोहळा कोल्हापूरच्या गणेशोत्सवाच्या परंपरेला एक वेगळे वैभव आणणारा ठरला आहे.