कोल्हापूर: खोची दुधगाव नदी पूलाला जोडला जाणाऱ्या दुधगाव ते नदी पूल एक किलोमीटर अंतर असणारा रस्ता अरुंद असलेने व पूलाच्या पूर्व व पश्चिम बाजूने अरुंद वळण असल्याने दोन्ही बाजूने दुहेरी वाहतूक सुरू असताना वाहन चालकांना वाहन चालवित असताना होत आहे त्रास सध्या वारणा नदीवरील हे पूल माजी खासदार राजू शेट्टी यांच्या खासदार फंडातून उभारण्यात आला असून नदीला पूर येत असल्याने पुलाची उंची वाढविली आहे पुलाच्या दुधगावकडील व खोची कडील बाजूस भराव नसल्याने रस्त्याचा भाग एकदम खाली आहे व वळण सुद्धा अपुरे असल्याने त्या ठिकाणी वाहतूक धोकादायक बनली आहे हा रस्ता सांगली व कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा जवळचा रस्ता असल्याने या रस्त्यावर वाहतूक नेहमी मोठ्या प्रमाणात होत आहे पूर्वी या नदीवरील जुन्या बंधाऱ्याहून वाहतूक सुरू होती तसेच या बंधाऱ्यावरून पेठवडगाव ते सांगली जाणारी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस सुद्धा सुरू होती हा रस्ता अरुंद वाहतुकीसाठी अडथळा होत असलेने नवीन पुल होऊन सुद्धा एसटी ची वाहतूक या रस्त्यामुळे बंद आहे त्यामुळे पेठवडगावहून सांगलीला जाणाऱ्या प्रवाशांना आष्टा मार्गे किंवा हातकणंगले मार्गे एसटी बस ने प्रवास करावा लागत आहे वारणा नदी परिसर शेतीप्रधान असलेले उसाची शेती मोठ्या प्रमाणात नदीकाठच्या परिसरात आहे त्यामुळे या रस्त्यावरून सध्या साखर कारखान्याचे ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टरांची संख्या भरपूर असलेने या रस्त्यावरून लहान किंवा मोठी दोन वाहने एका वेळेस ये जा करू शकत नाहीत या रस्त्याला ट्रॅक्टर चालक ऊस वाहतूक करत असताना एकदम मोठा चढ उतार लागलत असलेने पुलाजवळ चे वळण अरुंद व धोकादायक आहे प्रत्येक ट्रॅक्टर साठी चढ पास करण्यासाठी डब्बल ट्रॅक्टर जोडून ऊस वाहतूक करावी लागत आहे. वाहतुकीबरोबर दुसरे पाठीमागून येणारे वाहन चालक ही ओव्हरटेक करून जाण्याचा प्रयत्न करत असतात रस्ता रुंद असल्याने अपघात घडण्याचे प्रकार घडण्याची शक्यता येथे होत असल्याचे दिसून आहे त्यामुळे या रस्त्या बाबत सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील लोक प्रतिनिधीने लक्ष घालून हा रस्ता भराव रुंदीकरण करून नदी जवळील दोन्ही बाजूचे अरुंद वळण मोठे करून वाहतूक सुरळीत करावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे. हा रस्ता पूर्ण झाला तर पेठवडगाव ते सांगली जाणारी महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळाची बस पुन्हा आपली सेवा या मार्गाने देऊ शकेल. व या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांना सुद्धा सोयीचे होईल.