
कोल्हापूर : जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी, दक्षिणपीठ नाणीजधाम (महाराष्ट्र) यांचा पादुका दर्शन सोहळा रामकृष्ण लॉन आणि हॉल, मार्केट यार्ड, मेनन अँड मेनन कंपनी जवळ,कोल्हापूर ता.करवीर,जि.कोल्हापूर येथे रविवार दि.१२एप्रिल रोजी सकाळी ९ वाजेपासून संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ पासून जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुका व प्रतिमा पूजनाने रिव्हरसाईड होंडा शोरूम, मार्केट यार्ड पासून मिरवणुकीस सुरवात होणार आहे.सकाळी १० वा सिद्ध पादुकांचे आगमन कार्यक्रम स्थळी होणार आहे. त्यानंतर प.पू.कानिफनाथ महाराज यांचे आगमन कार्यक्रम स्थळी होणार आहे. त्यानंतर ज.न.म.संस्थानाच्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत गरीब,गरजू व होतकरू शालेय विध्यार्थ्यांना मोफत १०१ सायकलींचे विविध मान्यवारांच्या हस्ते वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर गुरुपूजन संपन्न होणार आहे. त्यानंतर आरती सोहळा, ज.न.म.प्रवचनकार यांचे प्रवचन होणार आहे तसेच प.पू.कानिफनाथ महाराज यांचे अमृतमय प्रवचन होणार आहे. त्यानंतर रामानंद संप्रदायामध्ये नवीन समाविष्ट होणाऱ्या भाविकांना उपासक दीक्षा दिली जाणार आहे. त्यानंतर सर्व भाविकांना सिद्ध पादुकांचे दर्शनाचा लाभ मिळणार आहे. तसेच भाविक भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था कार्यक्रम स्थळी केली आहे. त्यानंतर पुष्पवृष्टी होऊन सदर कार्यक्रमाची सांगता होणार असलेची माहिती जिल्हा निरीक्षक दिपक खरुडे व जिल्हाध्यक्ष कृष्णात माळी, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख रमेश मगदूम यांनी दिली. यावेळी मुख्य पीठ महिला निरीक्षका सौ राधिका पाटील, उत्सव कमिटी अध्यक्ष एम आर पाटील, मधुकर बाबर, दिलीप कोळी,तुकाराम पाटील,सौ.सीमा पाटील,सौ.नीता सुतार,सौ.प्रणाली पाटील, अंजली तळवणेकर,अमित लाड, अमोल पाटील,विजय पाटील, महेश पाटील, तुषार कदम, श्री.दशरथ मोहिते, आकाश साळोखे, उत्तम माळवी, पूजा चव्हाण विजय धनवडे सुभाष सुतार, विवेक सुतार ,आप्पासो कोणे मंगल चव्हाण, तिलोत्तमा नाईक, उपस्थित होते. हा सोहळा यशस्वी करणेसाठी आजी माजी पदाधिकारी सर्व तालुका कमिटी सेवा केंद्र कमिटी प्रयत्न करीत आहेत.