




कोल्हापूर : जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी दक्षिण पीठ नाणीजधाम, रत्नागिरी यांचा बुधवारी १० डिसेंबर रोजी सरोळी ता आजरा येथे सकाळी ९ वाजले पासून पादुका दर्शन सोहळा व सामाजिक उपक्रम वाटप सोहळा संपन्न झाला
या सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या दिव्य पादुकांची सरोळी येथील आकाराम देसाई यांच्या निवासस्थाना पासुन पादुकाची भव्यदिव्य रथातून शोभायात्रा निघाली यामध्ये निशान धारीपुरुष- महिला कलशधारी महिला, भजन व महिलांचे लेझीम पथक हलगी वाद्य व तुतारी च्या गजरात ही शोभायाता गावातील प्रमुख मार्गावरुन जात ती १०.३० वाजता विविध पथक व ढोल ताशाच्या निनादात कार्यक्रम स्थळी पोचली ११ वाजता पुरोहितांच्या वतीने यजमा द्वारे गुरुपूजन सोहळा संपन्न झाला गुरुपूजना साठी हजारो भाविकांच्या गुरु पूजनाची व्यवस्था जिल्हा सेवा समितीच्या वतीने करण्यात आली होती त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते १२.३० वाजता आरती संपन्न झाली.

त्या नंतर जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या सामाजिक उपक्रमांतर्गत दुर्बल घटक पुनर्वसन उपक्रमा अंतर्गत गरजू महिलांना स्वयंरोजगारासाठी १६ घरघंटी चे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले.



यावेळी प्रमुख उपस्थिती उपविभागीय उप पोलीस अधिक्षक गडहिंग्लज विभाग रामदास इंगवले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उमेश आपटे लोकमान्य संस्था समूहाचे संस्थापक श्री जनार्दन नेऊगरे करवीर तालुक्याचे सामाजिक कार्यकर्ते नामदेव वाईंगडे मुख्यपीठ सहाय्यक दीपक खरुडे मुख्य पीठ युवा निरीक्षक सुनील वीर ,पीठ लेफ्टन जनरल राजेंद्र खांबल, पीठ महिला निरीक्षक राधिका पाटील, पीठ जनगणना प्रमुख तुषार कदम पादुका दर्शन दौरा प्रमुख सोमदे आप्पा , प्रोटोकॉल अधिकारी विक्रांत घासे व त्यांची टीम यांच्यासह इतर मान्यवर वआयोध्या उत्तर प्रदेश व हम्पी या धारवाड ठिकाणाहून आलेले साधुसंत उपस्थित होते

यावेळी बोलताना विभागीय पोलीस अधिक्षक रामदास इंगवले म्हणाले जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांचे समाजकार्य व अध्यात्मिक कार्य खूप मोठे आहे मला माहित नव्हतं की पेपरच्या माध्यमातून ऐकलं होतं परंतु आज संस्थानाच्या ईव्ही च्या माध्यमातून जगद्गुरु च्या कार्याची माहिती घेतल्यानंतर समजले की किती मोठे आध्यात्मिक व सामाजिक कार्य जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांचे आहे आज सरोळी येथे आम्हा सर्वांच्या हस्ते १६ घरघंटींचे गरजू महिलांना वाटप केले जात आहे याचा आम्हाला अभिमान आहे असे म्हणून जगद्गुरूंच्या या कार्याला शुभेच्छा दिल्या

त्यानंतर उत्तराधिकारी परमपूज्य कानिफनाथ महाराज यांनी ऑनलाईन मार्गदर्शन करताना तरुणांना रोजगार व नोकरी सांभाळून आजच्या धावत्या युगामध्ये आध्यात्मिक मार्गाने चालावे असे आवाहन केले व जिल्हा सेवा समितीने आयोजित केलेल्या कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या भाविक भक्तगण यांना शुभाशीर्वाद दिले त्यानंतर ज.न.म. प्रवचनकार भूषण सौ गौराताई चौगुले यांचे अमृततुल्य प्रवचन संपन्न झाले त्यानंतर रामानंद संप्रदाय मध्ये नविन समाविष्ट झालेल्या भक्तगणांना ४६८ जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांनी ऑनलाइन उपासक दीक्षा बाबत मार्गदर्शन व उपासक दीक्षा दिली.
त्यानंतर जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य चार्यजी त्यांच्या सिद्ध पादुकांचा दर्शन सोहळा सुरू झाला सर्वांना महाप्रसाद देण्यात आला कार्यक्रमासाठी सुमारे दहा हजार भाविक भक्तगण उपस्थित होते हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा सेवा समिती चे जिल्हा अध्यक्ष कृष्णात माळी जिल्हा सहध्यक्ष मधुकर बाबर जिल्हा सचिव दिलीप कोळी जिल्हा महिला अध्यक्ष प्रणाली पाटील जिल्हा पदाधिकारी अमोल पाटील, महेश पाटील , रुपेश सुतार , आकाश साळुंखे, उत्तम माळवी, विवेक सुतार ,तुकाराम पाटील ,पूजा चव्हाण ,जिल्हा माजी पीठ महिला निरीक्षक सीमा पाटील, सहनिरीक्षक रमेश लोकरे प्रोटोकॉल अधिकारी एम आर पाटील, विजय धनवडे, सुभाष सुतार यांच्यासह सर्व जिल्हा सेवा समिती आजी माझी पदाधिकारी सर्व दानशुर दाते जिल्ह्याचे ज.न.म प्रवचनकार सर्व तालुका सेवा समिती महिला सेना, युवासेना, संग्राम सेना
विषेश सहकार्य आजरा तालुक्याचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष आकाराम देसाई बजरंग पाटील शिवाजी सरंबळे, विठ्ठल जाधव व आजरा तालुका व सेवा केंद्र पदाधिकारी यांनी हा कार्यक्रम संपन्न होण्यासाठी दोन महिने परिश्रम घेतले या कार्यक्रमासाठी भव्य मंडप व्यवस्था करण्यात आली होती या कार्यक्रमाची सांगता पुष्पवृष्टीने करण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा देणगी प्रमुख दशरथ मोहिते यांनी केले आभार सामाजिक उपक्रम प्रमुख अमित लाड यानी मानले.
