Uncategorized

यवतमाळ जिल्हा पोलीस दलातर्फे ऑपरेशन प्रस्थान अतर्गत अभ्यंकर कन्या शाळा यवतमाळ येथे देण्यात आले 650 विद्यार्थीनींना स्वसंरक्षणाचे धडे.


यवतमाळ: यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता साहेब याचे संकल्पनेतून ऑपरेशन प्रस्थान या अभिनव उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. ऑपरेशन प्रस्थान उपक्रमातर्गत भव्य रोजगार मेळावा घेण्यात आला, त्यामध्ये 7500 युवकानी सह‌भाग घेतला होता. तसेच पोलीस व जनतेतील संबंध दृढ व्हावे, व ग्राम पातळीवरून शहरी भागापर्यंत खेळाडूना संधी मिळावी, याकरिता क्रीडा महोत्सव घेण्यात आला होता. त्याच धतीवर मुलीना स्वसंरक्षणाचे धडे देण्याचे हेतूने दिनाक 21 एप्रिल 2025 ते 29 में 2025 पर्यत यवतमाळ जिल्हा पोलीस दला तर्फ ऑपरेशन प्रस्थान या उपक्रमागत 1800 मुलींना कराटे प्रशिक्षणाचे धडे देण्यात आले आहेत. या उपक्रमामुळे मुलीमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून व संरक्षणाची क्षमता वाढली आहे. दि. 07/07/2025 पासून ऑपरेशन प्रस्थान चा दुसरा टप्पा नवीन स्वरूपात सुरु झाला आहे. जिल्हयातील शाळा व महाविद्‌यालयांमधील 30000 वि‌द्यार्थ्यांना मोफत कराटे प्रशिक्षण देणे तसेच सायबर सुरक्षा इंटरनेटच्या वापरातील सभांव्य धोके, सोशल मिडियावर सुरक्षित वर्तन, ओळखीच्या व अनोळखी व्यक्तीकडून येणाऱ्या संदेशांची शहानिशा, पासवर्ड सुरक्षितता, आणि सायबर गुन्हयांपासून संरक्षण, नशामुक्त समाज मोहिम, नैतिकता व नीतिमता, सामाजीक जबाबदारी याबाबद वि‌द्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन दिले जाणार आहेत.

पोलीस विभागाच्या वतीने किशोरवयीन शाळकरी मुला-मुलीसाठी ऑपरेशन प्रस्थान वेगळ्या पद्धतीने पुनश्च नवीन स्वरूपात राबविण्यात येत आहे. शाळकरी मुला मुलीसाठी वैद्यकीय बाबी, सायबर सुरक्षा, नैतिकता आणि वाहतुकीचे नियम, यासंबंधी माहिती देणे. या उपक्रमांचा उ‌द्देश उपचारापेक्षा प्रतीबंध चांगला तसेच सशक्त नागरिक म्हणून वि‌द्यार्थ्यांना घडवणे विशेषतः किशोरवयीन मुला-मुलीमध्ये सुरक्षितता, आरोग्य, स्वच्छता, व्यसनमुक्ती यासारख्या मुद्दायांवर जागरूकता निर्माण करणे हा आहे. सदर प्रशीक्षणाची सुरुवात दी. 07/07/2025 पासून करण्यात आली असुन आतापर्यंत एकूण 2165 वि‌द्यार्थ्यांना यशस्वीरीत्या प्रशीक्षण देण्यात आले. दि. 21/07/2025 ते 22/07/2025 असे दोन दिवस, अभ्यंकर कन्या शाळा, यवतमाळ येतील एकूण 650 वि‌द्यार्थीनीना प्रशिक्षण देण्यात आले. तेथील मुलीनी मोकळ्या पणाने त्यांचे प्रश्न विचारले तसेच चर्चेमध्ये सक्रिय सहभाग घेतला. अभ्यंकर कन्या शाळेची वि‌द्यार्थिनी कु.प्रीती महेंद्र ढाकरगे हिने तामिळनाडू मदुराई येथे पार पडलेल्या 6 व्या खेलो इंडिया युध गेम स्पर्धेत महाराष्ट्र संघांचे प्रतिनिधित्व करत सुवर्ण पदक पटकावले. सोबतच 19 वर्षे वयोगटातील शालेय राष्ट्रीय खो खो स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत सुवर्ण पदक पटकावले. एकाच वर्षीच्या शैक्षणिक क्षेत्रात सलग 2 राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेत तिने पदक पटकावले. याचप्रमाणे या वर्षी बिहार पार पडलेल्या 7 व्या खेलो इंडिया युध नेम्स मध्ये तिने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत रौप्य पदक पटकावले सोबतच 19 वर्षे वयोगटातील शालेय राष्ट्रीय फोकस
स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत रौप्य पदक पटकावले. तिच्या या उत्कृष्ट कामगिरीब‌द्दल महाराष्ट्र शासनाने अनुक्रमे 5 लाख व 3 लाख रुपयांची क्रीडा शिष्यवृत्ती देऊन तिचा सन्मान केला, खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धेत सलग दोनदा सहभागी होऊन पदक पटकावणारी आणि महाराष्ट्र शासनाकडून अशा प्रकारची क्रीडा शिष्यवृत्ती प्राप्त करणारी ती विदर्भातील पहिली खेळाडू ठरली आहे.



वि‌द्यार्थ्यांमध्ये शारीरिक आणि मानसिक सशक्तता, स्वसंरक्षण व सामाजिक सजगता निर्माण करण्याच्या दृष्टीने या उपक्रमाचे महत्व अधोरेखित झाले. आनंद भुसारी व त्यांची टिम यांनी स्वसंरक्षण करीता मुलीना कराटे चे प्रत्यक्ष धडे दिले. डॉ. वृषाली माने मॅडम स्त्री रोग तज यांनी वि‌द्यार्थ्यांना कीशोरवयात होणारे शारीरीक बदल व त्याचा आपल्या दैनंदिन जीवनावर होणारा परीणाम याविषयी माहीती दिली. डॉ. सरफराज अहमद सौदागर सर (मानस शास्त्रज) मानसिक आरोग्य राखण्यासाठी, नियमित व्यायाम करणे, सकस आहार घेणे, पुरेशी झोप घेणे, सामाजिक सबंध जपणे, आणि तणाव व्यवस्थापित करणे याब‌द्दल त्यांनी मार्गदर्शन केलेत. पो. नि. यशोधरा मुनेश्वर मॅडम यांनी मुलीवरील वाढते अत्याचार, काळजी व उपाययोजना तसेच या वयात कोणत्या गोष्टीला महत्व दिले पाहिजे जसे कि अभ्यास करिअर या ब‌द्दल माहिती दिली. पोनि देवकते साहेब (वाहतूक शाखा यवतमाळ) वाहतूक व वाहतुकीचे नियम ते तोडल्यास होणारे दंड व होणारे अपघात, अपघाताचे दुष्यपरिणाम या सबंधी याविषयी माहीती दिली सपोनी प्रकाश तायडे सायबर विषयक गुन्हे, फ्रॉड व त्यातून होणारी फसवणूक कशी टाळावी इंटरनेटच्या वापरातील संभाव्य धोके, सोशल मिडियावर सुरक्षित वर्तन, ओळखीच्या व अनोळखी व्यक्तीकडून येणाऱ्या सदेशांची शहानिशा, पासवर्ड सुरक्षितता, आणि सायबर संरक्षण याविषयी यांची माहीती दिली पो. नि. सतिश चवरे सर स्थानिक गुन्हे शाखा यानी नैतिकता व सामाजीक, जबाबदारीची जाणीव, आत्मसन्मान, इतरांप्रती आदर, तसेच योग्य-अयोग्य वर्तनाचे भान यासंदर्भात संवाद साधला.

तसेच यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता साहेब याचे संकल्पनेतून ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत मराठी मीडीयम, इंग्रजी मीडीयम, शासकीय शाळा, खाजगी शाळा अशा सर्व शाळकरी वि‌द्यार्थ्यां करीता सदर प्रशीक्षण राबविण्यात येणार आहे.


सदर प्रशिक्षणाचे उद्घाटन मा. पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता साहेब यानी केलेत व मा. पोलीस अधीक्षक साहेब यांचे मार्गदर्शनात प्रशिक्षणाचे आयोजन पोनि दीपमाला भेडे, पोनी. वागतकर कल्याण शाखा सपोनि शुभांगी गुल्हाने जनसंपर्क कार्यालय, सपोनि माधुरी उबरकर HC निलेश खंदारे, पोलीस अंमलदार देवन्द्र गोडे, अजय निंबोळकर, सुरज वसुले महिला पोलीस अंमलदार नलिनी धोटे, भारती चव्हान, जया काळे यांनी केले. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन अभ्यंकर कन्या शाळेच्या सहकार्याने करण्यात आले. सदर कार्यक्रमकरिता अभ्यंकर कन्या शाळा, यवतमाळ येथील सहसचिव श्री मोहन गांधी सर महीला शिक्षण मंडळ, मुख्याध्यापिका श्रीमती मोहना गंगमवार मॅडम व शिक्षक कर्मचारी वृंद, वि‌द्यार्थी वि‌द्यार्थिनी हजर होते.

Previous Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *