
कोल्हापूर: पुणे बेंगलोर या राष्ट्रीय महामार्गावरती महामार्गाचे काम बंद असल्याने वारंवार अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत सध्या पावसाळा मोठ्या प्रमाणात सुरू आहे पावसामुळे वाहन चालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही दि.29 जुलै रोजी रात्री 10 चे सुमारास बेंगलोर हुन गुजरातला जाणाऱ्या ट्रॅव्हल्स ला येथील मंगरायाची वाडी फाटा येथील एचपी पेट्रोल पंप समोर गुजरात ट्रॅव्हल्स या कंपनीची ट्रॅव्हल्स वेगाने आल्याने ड्रायव्हरला ड्रायव्हरशेनचा अंदाज आला नसल्याने ड्रायव्हरने अचानक ब्रेक लावल्याने गाडी दोनशे फुट रस्त्यावरून फरफटत जाऊन डिव्हायडर साठी लावलेले फायबरचे व सिमेंटचे डिव्हायडर फोडून रस्त्याच्या भरावासाठी टाकलेल्या मातीमध्ये जाऊन अडकली
यामध्ये गाडीच्या इंजिनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुल जीवित हाणी कोणतीही झालेली नाही गेल्या दोन महिन्यात 10 ते 15 अशा मोठ्या मोठ्या कंपनीच्या ट्रॅव्हल्स ना याच ठिकाणी अपघाताला सामोरे जावे लागले आहे रस्ता प्रशासनाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष घालून सदर रस्ता तातडीने पूर्ण करावा अशी मागणी वाहन चालक व सामान्य नागरिकांना होत आहे.


