

कोल्हापूर: पेठवडगाव हून येत असणारा HR-67 D-4380 हा अवजड ट्रक पुणे बेंगलोर महामार्गावरील टोप येथील पुला खालून वाठारकडे जात असताना टोप येथील पुलाची उंची कमी असल्याने उंच असणारा ट्रक पुलाखाली अडकला त्यामुळे कोल्हापूरहून पेठवडगाव कडे जाणाऱ्या वाहनांची सुमारे एक तास वाहतुकीची कोंडी निर्माण झाली सदर पुलाची उंची कमी असल्याचे ट्रक ड्रायव्हरला अंदाज आला नसल्याने त्यांनी ट्रक गतीने पुलाखालून घेतला जवळपास ट्रकचा अर्धा भाग अडकला होता यावेळी
स्थानिक प्रवाशांच्या मदतीने व
वाहन चालकांच्या माध्यमातून ट्रक बाहेर काढण्यास मदत झाली अशा घटना या वारंवार या महामार्गाचे पुला खाली होत आहेत पुलाच्या दोन्ही बाजूला कोणत्याही प्रकारचे जास्त उंचीचे अवजड वाहन जाण्यास व येण्यास बंदी असल्याबाबतचे फलक लावलेले दिसत नाहीत आशा सर्वच ठिकाणी फलक लावणे गरजेचे असल्याने प्रशासनाने या बाबतीत सदर महामार्गावरील सर्वच पुलांच्या दोन्ही बाजूला बोर्ड लावावे त्यामुळे अवजड वाहन चालक सावध होऊन दुसऱ्या मार्गाने वाहतूक करू शकतात त्यामुळे असे कोणतेही प्रकार घडू नयेत व सामान्य नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने दखल घ्यावी अशी मागणी सामान्य नागरिकांतून व वाहन चालकातून होत आहे.
