


मिरा भाईंदर : शहरातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांकडून मोठ्या प्रमाणात गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली असून, ११ दिवसांच्या विसर्जनाच्या दिवशी हजारो गणेशभक्त जमतात. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिमंडळ १ च्या हद्दीत पोलिसांनी विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.विसर्जनाच्या वेळी मिरवणुका काढण्यात येतात. मात्र, याच गर्दीचा गैरफायदा घेत काही समाजकंटक अनुचित प्रकार करत असतात.विशेषतः महिला आणि मुलींविरोधात होणार्या छेडछाडीच्या घटनांवर यंदा कठोर कारवाईचे धोरण राबवले जाणार आहे. पोलिसांनी अशा घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी एकूण सात पथक तयार करण्यात आले असून त्यात प्रत्येकी चार कर्मचारी असणार आहेत. हे पथक महिलांचे दागिने चोरीला जाणे व छेडछाड यावर लक्ष देणार आहेत.याच बरोबर विसर्जन स्थळी कोणत्याही होकर्सला परवानगी देण्यात आले नसल्यामुळे अडथळा निर्माण होणार नाही. स्थानिक पोलीस ठाण्याचे देखील त्यांच्या हद्दीत व विसर्जन ठिकाणी बंदोबस्त असणार आहे. तसेच, मिरवणुकीदरम्यान होणार्या पाकीटमारांच्या हालचालींवरही पोलिसांची बारीक नजर राहणार आहे. गर्दीचा फायदा घेत चोरी करणार्या टोळ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी सिव्हिल ड्रेसमध्ये पोलिसांची गुप्त पथके कार्यरत होती तसेच सीसीटीव्ही कॅमेर्यांच्या माध्यमातून देखील विसर्जन मिरवणूक मार्गावर सातत्याने नजर ठेवली होती.वाहतूक नियंत्रणासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.



मिरा-भाईंदर-वसई विरार पोलीस कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एकूण ५ पोलीस उपायुक्त, ९ सहाय्यक पोलीस आयुक्त, २८० पोलीस अधिकारी, २३०० पोलीस अंमलदार, २०० होमगार्ड तसेच महाराष्ट्र सुरक्षा बलाचे २३० कर्मचारी, दोन स्ट्राइकिंग तसेच प्रत्येक परिमंडळामध्ये दंगल नियंत्रण पथकच्या तीन तुकड्या आणि एसआरपीच्या तीन तुकड्या तैनात होत्या
त्याचबरोबर पोलीस प्रशासना सोबत नागरिक अधिकार सुरक्षा परिषद(CRPC)चे महाराष्ट्र स्टेट डायरेक्टर श्री देवेंद्र वखारिया यांच्या मार्गदर्शनानुसार सी.आर.पी.सी अधिकारी गौरव शहा विशाल शहा सतीश जैन जितेंद्र गांधी जिगर पटेल यांनी अकरा दिवस पोलीस प्रशासनासोबत सेवा बजावल्याची माहिती सीआर.पी.सी स्टेट डायरेक्टर देवेंद्र वखारिया यांनी दिली.