कोल्हापूर:जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणिजधाम यांच्या वतीने दिनांक चार जानेवारी ते १९ जानेवारी यादरम्यान महाराष्ट्रामध्ये रक्तदान महायज्ञाचे आयोजन केले होते त्याच पार्श्वभूमीवर सेवा केंद्र लाटवडे यांच्या वतीने आज रविवार दिनांक १९ जानेवारी रोजी नरसिंह मंदिर लाटवडे येथे रक्तदान शिबिर आयोजित शिबिराचा उद्घाटन सोहळा सरपंच रणजीत पाटील सोमनाथ उद्योग समूहाचे अध्यक्ष
अशोक माळी माजी सरपंच संभाजी पवार यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सचिन पाटील शिवदत्त पाटील बी.टी भोपळे सर माझी डेप्युटी सरपंच दिनकर पाटील भाऊ लालशिंग पाटील अशोक यादव भाजपचे शहाजी पाटील शिवाजी कोळी कर्मचारी सुरेश पाटील जयवंत हायस्कूलचे दिलीप पोवार सर इकबाल मुल्ला माजी ग्रामपंचायत सदस्य बापू माळी जिल्हाध्यक्ष कृष्णात माळी तालुकाध्यक्ष शंकरराव पाटील अर्पण ब्लड बँकेचे पी आर ओ माधव ढवळीकर यांच्यासह सेवा केंद्र पदाधिकारी उपस्थित होते.
सदर शिबिरामध्ये लाटवडे गावातील सर्व तरुण मंडळाचे कार्यकर्ते विविध संस्थांचे व सोमनाथ उद्योग समूहाचे पदाधिकारी तसेच शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी स्वयंम स्फूर्तीने सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी जिल्हा सचिव दिलीप कोळी जिल्हा महिला अध्यक्षा प्रणाली पाटील जिल्हा कर्नल लक्ष्मण पुणेकर तालुका कॅप्टन सुरेश लोहार गगनबावडा तालुका सचिव शशिकांत पाटील यांनी भेट दिली. सकाळी ९ वाजल्यापासून सुरू झालेल्या कॅम्प मध्ये सायंकाळी ७ वाजेपर्यंत १७३ रक्तदात्यांनी उस्फूर्तपणे सहभाग घेऊन रक्तदान महायज्ञाचा संकल्प पूर्ण केला हे शिबिर संपन्न करण्यासाठी जिल्हा बिन प्रमुख आकाश साळुंखे जि
पीठ जनगणना प्रमुख तुषार कदम तालुका बिन प्रमुख गुरुप्रसाद माळी तालुका ब्लड कॅम्प प्रमुख साहिल पाटील सेवा केंद्र कमिटी तानाजी पाटील सूर्यकांत निर्मळे लक्ष्मी निर्मळे प्राची माळी श्रुतिका माळी सुभाष पाटील मिणचेकर यांनी केले तर विशेष सहकार्य यश माळी गुरुप्रसाद माळी यांनी केले. कार्यक्रमाचे स्वागत दिलीप पवार सर यांनी केले तर प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष कृष्णात माळी केले आभार तालुकाध्यक्ष शंकरराव पाटील यांनी मानले.