कोल्हापूर : जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेतून नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने महाराष्ट्रातील प्रमुख महामार्गावर ॲम्बुलन्स सेवा सुरू केली असून आत्तापर्यंत ५३ ॲम्बुलन्स महाराष्ट्राच्या राष्ट्रीय महामार्गावर विविध ठिकाणी सेवा बजावत आहेत याच अनुषंगाने सांगली कोल्हापूर रस्त्याला जोडणाऱ्या अंकली पूल येथे नेहमीच अपघात होत असतात जयसिंगपूर ते सांगली यादरम्यान ॲम्बुलन्स सेवा उपलब्ध नसल्याने गेल्या एक दीड महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात या पूल परिसरात अपघात वारंवार होत आहेत याची दखल घेऊन जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाने अंकली पूल येथील जयसिंगपूर पोलीस चौकी येथे आज जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मा.श्री. सत्यवान हाके यांच्या शुभहस्ते व उद्योगपती माजी नगराध्यक्ष जयसिंगपूर नगरपालिका मा. श्री प्रकाश झेले तसेच भाजपा युवा मोर्चा कोल्हापूर पूर्व जिल्हाध्यक्ष मा.श्री.डॉ.अरविंद माने व कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्री.कृष्णात माळी शिरोळ तालुका अध्यक्ष श्री.दिलीप चव्हाण व तालुका पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला त्यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक मा.श्री.सत्यवान हाके यांनी बोलताना संस्थानाने या ठिकाणी ॲम्बुलन्स सेवा सुरू केल्याबद्दल संस्थानाचे आभार मानले तसेच सांगली कोल्हापूर रोडला जोडणाऱ्या अंकली पूल परिसरात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे आणि या ठिकाणी ॲम्बुलन्स उपलब्ध होणे गरजेचे होते जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रेरणेतून आज अंकली पूल येथील जयसिंगपूर पोलीस चौकी येथे ॲम्बुलन्स सेवा सुरू केली या सेवेमुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ये जा करणाऱ्या लोकांना याचा फायदा होईल आणि ही विनामूल्य सेवा असल्यामुळे नागरिकांनी अपघात होताच ८८८८२६३०३० या संस्थानाच्या मोबाईल नंबर वरती कॉल करावा असे अवाहन त्यांनी केले. माजी नगराध्यक्ष श्री प्रकाश झेले यांनी संस्थांनाने केलेल्या विविध सामाजिक कार्याचे कौतुक केले तसेच भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष डॉ.श्री.अरविंद माने यांनी संस्थानाने महापुरामध्ये , रक्तदाना मध्ये देहदाना मध्ये चांगल्या प्रकारे कार्य केल्याबद्दल त्यांनी संस्थांनाचे आभार मानले जिल्हाध्यक्ष श्री कृष्णात माळी यांनी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेने संस्थांच्या आतापर्यंत ५३ ॲम्बुलन्स महाराष्ट्राच्या प्रमुख महामार्गावर विनामूल्य सेवा बजावत आहेत संस्थानाच्या वतिने आतापर्यंत ७६ मरणोत्तर देहदान झाले असल्याची माहिती दिली तसेच संस्थानाच्या वतीने महाराष्ट्रा मध्ये एक लाख रक्त बॉटल संकलित करण्याचे उद्दिष्टिचा रक्तदान महायज्ञ सुरू असल्याची माहिती दिली तर शिरोळ तालुका अध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी तालुक्यामध्ये राबवण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमाची माहिती दिली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका सचिव श्री.राजाराम काळे यांनी केले तर आभार श्री नितीन नरळे यांनी मानले यावेळी हाॲम्बुलन्स लोकार्पण सोहळा संपन्न करण्यासाठी अखिल भारतीय ॲम्बुलन्स विभाग सेक्रेटरी श्री. अभिजीत अवसरे व श्री. कमलाकर हजारे जिल्हा निरीक्षक श्री. विजय लगड यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका सेवा अध्यक्ष दिलीप चव्हाण तालुका महिला अध्यक्ष सुनीता हेरवाडे तालुका सचिव राजाराम काळे तालुका सामाजिक उपक्रम प्रमुख विजय माळी तालुका प्रसिद्धीप्रमुख शिवा घोरपडे सेवा केंद्र अध्यक्ष गणपती मोरे देवराम जंगले युवराज घोरपडे वैभव पाटील रमेश गावडे शशिकांत शिंदे उज्वला पवार तालुका आध्यात्मिक प्रमुख यांच्या सह सर्व पदाधिकारी महिला पदाधिकारी यांनी सहकार्य केले.