













कोल्हापूर : जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज दक्षिण पीठ नाणिजधाम, महाराष्ट्र. यांच्या प्रेरणेने अखिल भारतीय महिला सेनेचा महिला मेळावा कोल्हापूर जिल्हा सेवा समितीच्या वतीने रविवार दिनांक ०९/०२/२०२५ रोजी आजरा तालुका येथील सरोळी गावातील सरस्वती विद्यालयात उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात सर्व तालुक्यातील महिला भगिनींनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून कलाविष्कार सादर केले.
यावेळी बोलताना अखिल भारतीय महिला सेना सेक्रेटरी सौ. वृंदा जोशी ताई यानी गुरु आदेशाने, ग्रामीण भागातील महिलांनी चूल आणि मूल सांभाळून, आपल्या संसारातून वेळ काढून सर्व भगिनी एकत्र यावे व आपल्या कलागुणांचे सादरीकरण करावे या उद्देशाने हा महिला मेळावा आयोजित केला होता. या महिला मेळाव्यातून महिलांच्या कला गुणांना वाव दिला गेला. त्यांना विविध कलाविष्कार सादर करण्याची संधी दिली गेली. यावेळी व्याख्यानात बोलताना सौ. जोशी ताई म्हणाल्या की, “आपण महिला स्वतःवरच प्रेम करत नाही पण संपूर्ण कुटुंबाचा कार्यभार मात्र सांभाळतो. ते जरी आपले कर्तव्य असले तरी आपण प्रत्येकीने स्वतःची काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर प्रपंच करता करता परमार्थ कसा करता येईल सेवेला, वेळ कसा देता येईल हे देखील विविध उदाहरणाच्या माध्यमातून त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर भक्ती आणि साधनेत सातत्य ठेवल्यामुळे आपल्यामध्ये सकारात्मकता कशी निर्माण होते व त्यामुळे आपण आपल्यावर येणाऱ्या कोणत्याही अडचणींवर मात करण्यासाठी मानसिकरित्या कशा खंबीर होऊ शकतो हे देखील दाखवून दिले. यासाठी वापरलेली व्यवहारिक उदाहरणे ऐकताच महिलांच्या मध्ये खूप सकारात्मकता निर्माण झाली व त्यांना सेवा व साधना या गोष्टी दैनंदिन जीवनामध्ये खरंच किती महत्त्वाच्या आहेत हे देखील लक्षात आले.”
यावेळी मुख्य पीठ सहाय्यक मा.श्री. दीपक खरूडे साहेब ,मुख्य पीठ महिला निरीक्षक सौ. सीमा पाटील ताई ,जिल्हा निरीक्षक मा. श्री. विजय लगड साहेब व जिल्हा अध्यक्ष मा. श्री. कृष्णात माळी साहेब यांनी उपस्थित महिला भगिनींचे मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल स्वागत व आभार मानले व त्यांना शुभेच्छा ही दिल्या.
यावेळी उपस्थित मुख्य पीठ जनगणना प्रमुख श्री. तुषार कदम, महिला अध्यक्ष सौ प्रणाली पाटील ताई ,जिल्हा सचिव श्री. दिलीप कोळी, जिल्हा कर्नल श्री. लक्ष्मण पुणेकर, जिल्हा युवा प्रमुख श्री. अमोल पाटील, जिल्हा सामाजिक उपक्रम प्रमुख श्री. अमित लाड, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख श्री. विजय पाटील, जिल्हा धर्मक्षेत्र प्रमुख श्री. महेश पाटील, जिल्हा शिबिर प्रमुख सौ.गायत्री सुदेवाड, जिल्हा बिनप्रमुख श्री. आकाश साळुंखे, जिल्हा देणगी प्रमुख श्री. दशरथ मोहिते, जिल्हा संजीवनी प्रमुख श्री. बलराज पाटील तसेच सर्व जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा विशेष कार्यवाहक श्री मधुकर बाबर व आजरा तालुक्याचे अध्यक्ष श्री. आकाराम देसाई यांनी व त्यांच्या सर्व तालुका पदाधिकारी, सेवा केंद्र पदाधिकारी तसेच चंदगड व गडहिंग्लज तालुक्यातील सर्व पदाधिकारी गुरुबंधू, गुरु भगिनी यांनी खूप असं सुंदर केले होते. महिलांची उपस्थिती देखील अगदी मोठ्या प्रमाणात होती. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुका महिला अध्यक्षा व तालुका अध्यक्ष यांनी सुद्धा आपल्या तालुक्यातील सेवा केंद्रा पर्यंत पोहचून या कार्यक्रमाचे नियोजन सुंदर केले. दिलेल्या फोल्डर प्रमाणे जबाबदारी चांगल्या पद्धतीने बजावली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राधानगरी तालुका महिला अध्यक्ष सौ. काजल सुतार व कुमारी संजीवनी सुतार यांनी केले. तर प्रास्ताविक जिल्हा महिला अध्यक्षा सौ. प्रणाली पाटील ताई यांनी केले. आभार करवीर तालुका महिला अध्यक्षा सौ. राधिका पाटील ताई यांनी मानले.