Uncategorized

गणेश मूर्तीचे आगमन सोहळ्याचे कोल्हापूर शहर वाहतूक शाखेने केल वाहतुकीचे व वाहन पार्किंगचे नियोजन

out of 10


कोल्हापूर: कोल्हापूर शहरामध्ये दिनांक २७/०८/२०२५ रोजी सार्वजनिक घरगुती गणेशमूर्तीचे आगमन मिरवणुकीने होत असलेने शहरातील शाहूपुरी कुंभार गल्ली, पापाची तिकटी (गंगावेश) कुंभार गल्ली व बापट कॅम्प, कुंभार गल्ली या ठिकाणावरून गणेश मुर्ती मोठया प्रमाणात खरेदी करुन मिरवणुकीने घेवून आणेसाठी नागरिक मोटार वाहनांनी येत असल्याने सदर मिरवणूका सुरळीत व सुरक्षित पार पाडणे करीता व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये याकरीता शाहुपूरी कुंभार गल्ली, पापाची तिकटी कुंभार गल्ली व बापट कॅम्प, कुंभार गल्ली येथील वाहतुक सुरळीत व सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. त्याकरीता सदर रहदारी नियमना करीता शाहूपुरी कुंभार गल्ली, पापाची तिकटी कुंभार गल्ली व बापट कॅम्प येथील मार्ग मोटार वाहनांना वाहतुकीस बंद व खुले करणेबाबतचे नियोजन करण्यात आले आहे.

प्रवेश बंद करण्यात आलेले मार्ग खालीलप्रमाणे :-

शाहपुरी कुंभार गल्ली :-

१. शाहूपुरी कुंभार गल्लीमध्ये जाणारे सर्व प्रकारच्या वाहनांना नाईक अँन्ड नाईक कंपनी समोर प्रवेश बंद करण्यात येत आहे. (अत्यावश्यक सेवेतील वाहने व गणेश मुर्ती घेण्यासाठी आलेल्या वाहनाना वगळून)

२. फोर्ड कॉर्नर व उमा टॉकीज दिशेने येवून शाहूपुरी कुंभार गल्लीमध्ये जाणारे सर्व प्रकारच्या वाहनांना ( अत्यावश्यक सेवेतील वाहने व गणेश मुर्ती घेण्यासाठी आलेल्या वाहनाना वगळून) रिलायन्स मॉल कॉर्नर या ठिकाणी प्रवेश बंद करण्यात येत आहे.

३. पार्वती सिग्नल चौक व उमा टॉकीज दिशेने येवून शाहूपुरी कुंभार गल्लीमध्ये जाणारे सर्व प्रकारच्या वाहनांना (अत्यावश्यक सेवेतील वाहने व गणेश मुर्ती घेण्यासाठी आलेल्या वाहनाना वगळून) आयर्विन ख्रिश्चन हायस्कुल या ठिकाणी प्रवेश बंद करण्यात येत आहे.

४. गवत मंडई चौकातून कुंभार गल्लीकडे जाणारे सर्व प्रकारच्या वाहनांना गवत मंडई चौकात प्रवेश बंद करणेत येत आहे.

पापाची तिकटी (गंगावेश) कुंभार गल्ली:-

१. पापाची तिकटी ते बुरुड गल्ली जाणारे मार्गावर सर्व प्रकारचे वाहनांना पापाची तिकटी या ठिकाणी प्रवेश बंद करणेत येत आहे.

२. शाहू उद्यान गंगावेश ते कुंभार गल्ली जाणारे मार्गावर सर्व प्रकारचे वाहनांना शाहू उद्यान या ठिकाणी प्रवेश बंद करणेत येत आहे.

३. गंगावेश चौक ते पापाची तिकटी ते माळकर चौक या मार्गावर वाहन उभे करणेस मनाई करणेत येत आहे.

बापट कॅम्प कुंभार गल्ली

१. शिरोली टोल नाका ते बापट कॅम्प कडे जाणारे मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना शिरोली टोल नाका येथे प्रवेश बंद करणेत येत आहे. सदरची वाहने ही मार्केटयार्ड चौक येथून जाधववाडी मार्गे पुढे मार्गस्थ होतील.

२. रा.छ. शाहू मार्केट यार्ड समोरुन बापट कॅम्प कुंभार गल्ली मध्ये आत जाणारी वाहने परत त्याच मार्गाने येता सर्व वाहने रिव्हरसाईड होंडा शोरुम जवळचे रस्त्याने बाहेर मार्गस्थ होतील.

नो पार्किंग:

१. गवत मंडई येथील श्री नाईकनवरे यांचे निवासस्थान जवळील कॉर्नर चौकापासून सर्व बाजूस ५० मीटर पर्यंत सर्व प्रकारच्या मोटार वाहनाना नो पार्किंग करण्यात येत आहे. (अत्यावश्यक सेवेतील वाहनाना बगळून)


पार्किंग सुविधा :

१. शाहुपूरी कुंभार गल्ली

१) पार्वती सिग्नल चौका जवळील आयर्विन खिश्चन हायस्कुलचे पटांगणावर वाहने पार्क करतील.

२) शाहूपुरी ४ व ५ वी गल्ली येथे वाहतूकीस अडथळा होणार नाही असे पार्किंग करतील,

२. बापट कैम्प कुंभार गल्ली

१) प्रिन्स शिवाजी विदयामंदिर, शाळा क्र. ३२ जाधववाडी (बापट कैम्प) २) ओम कॉम्प्लेक्स समोरील रिकामी गुरु नानक सोसायटीची जागा, बापट कैम्प

वरील सर्व मार्ग हे दिनांक २७/०८/२०२५ रोजी सकाळी ०७.०० वाजले पासून सार्वजनिक व घरगुती श्री. गणेश मुर्तीचे आगमन मिरवणूकीने होईपर्यंत सर्व मोटार वाहनांना प्रवेश बंद व खुले करणेत येत आहेत.
अशी माहिती शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी दिली

Previous ArticleNext Article