

कोल्हापूर: कोल्हापूर शहरामध्ये दिनांक २७/०८/२०२५ रोजी राजारामपुरी येथे एकुण ५१ सार्वजनिक आगमन मिरवणुक होणार आहे. सदरची मिरवणुक ही जनता बाजार चौक ते आग्नेयमुखी मारुती मंदिर या मार्गावरून होणार आहे. याकरीता जनता बाजार चौक ते आग्नेय मुखी मारुती मंदिर हा मिरवणुक मार्ग आणि जनता बाजार चौकाकडे जाणारे सर्व मार्ग या वाहतुकीचे योग्य ते नियमन करणे गरजेचे आहे. तसेच, सदर मिरवणुकीच्या अनुषंगाने राजारामपुरी आणि जनता बाजार चौक शी संबंधीत मार्ग मोटार वाहनांना बंद व खुले करणे वन वे मार्ग शिथिल करणे बाबतचे निर्देश मा. पोलीस अधीक्षक सो यांनी दिले आहेत ते खालीलप्रमाणे-
अ)वन-वे मार्गात शिथिलता
खालील वन वे मार्ग हा सार्वजनिक मंडळाचे गणेश मुर्ती आगमन मिरवणुकीतील वाहनांसाठी ये-जा करणेच्या कालावधी करीता शिथील करण्यात येत आहेत.
०१ जनता बाजार चौक ते आग्नेय मुखी मारुती मंदिर
ब)वाहतुकीसाठी बंद व खुले करणेत आलेले मार्ग
१ राजारामपूरी ११ वी गल्ली आग्नेय मुखी मारुती मंदिर ते जनता बाजारकडे येणा-या (राजारामपूरी मेन रोडवरील) वाहतुक दोन्ही बाजूस पूर्णपणे बंद करणेत येत आहे.
२ बाईचा पुतळा चौकाकडून ताराराणी विद्यापीठकडे (व्ही टी पाटील सभागृह) जाणारी सर्व मोटार वाहनांना बाईचा पुतळा या ठिकाणी प्रवेश बंद करणेत येत असून सदर मोटार वाहन चालकांसाठी के रामचंद्र भाऊसो कांबळे चौक (शाळा नं ९) ते शाहुमिल पोलीस चौकी हा एक दिशा मार्ग करणेत येत आहे.
३ शाहुमिल पोलीस चौकीकडून के रामबंद्र भाऊसो कांबळे चौकाकडे (शाळा नं ९) जाणारी सर्व मोटार वाहतुक शाहुमिल पोलीस चौकी या ठिकाणी प्रवेश बंद करणेत येत असून सदर मोटार वाहन चालकासाठी ताराराणी विद्यापीठ (व्ही टी पाटील सभागृह) ते बाईचा पुतळा चौक हा एक दिशा मार्ग करणेत येत आहे.
४ बागल चौक येथुन जनता बाजार कडे जाणारी वाहतुक आवश्यकतेनुसार थांबविण्यात येईल, सदरची वाहतुक ही बागल चौक ते बीटी कॉलेज आणि पुढे अन्य पर्यायी मार्गान मार्गस्थ होईल.
५ टाकाळा चौक येथुन जनता बाजार चौकाकडे जाणारी वाहतुक आवश्यकतेनुसार थांबविण्यात येईल. सदरची वाहतुक ही मा. पी. एन पाटील बंगला किंवा रेल्वे फाटक कडे आणि पुढे अन्य पर्यायी मार्गाने मार्गस्थ होईल,
६ शहाजी लॉ कॉलेज चौक येथुन जनता बाजार चौकाकडे जाणारी वाहतुक आवश्यकतेनुसार थांबविण्यात येईल. सदरची वाहतुक ही टाकाळा चौकाकडे किंवा परिख पुलाकडे आणि पुढे अन्य पर्यायी मागनि मार्गस्थ होईल.

क) पार्किंग व्यवस्था
०१ व्हि टी पाटील भवन परिसर
२ राजारामपुरी शाळा क्र.०९ मैदान
३ दसरा चौक
४ बिंदू चौक
वरील सर्व मार्ग हे दिनांक २७/०८/२०२५ रोजी सायंकाळी १६:०० वाजले पासून राजारामुपरी येथील सार्वजनिक श्री. गणेश मुर्तींचे आगमन मिरवणूकीने होईपर्यंत मिरवणुकीतील वाहना करीता वनवे मार्ग शिथिल व इतर सर्व मोटार वाहनांना प्रवेश बंद सुरु करणेत येत आहेत.
अशी माहिती कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी दिली
