कोल्हापूर: कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांच्या सीमेवर कृष्णा नदीवरील उदगाव ते अंकली पुलाच्या परिसरात अपघाताचे प्रमाण वाढले आहे यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग व प्राधिकरण विभागाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते गुरुवारी येथील जुन्या पुलावरून चार चाकी गाडी पडून तिघांचा बळी गेल्याने सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडालीआहे जानेवारी मध्येही याच पुलावरून कार कोसळली पण सुदैवाने तिघांचा जीव वाचला यापूर्वी ही असीच घटना घडली होती सातत्याने होत असलेल्या अपघातांच्या घटनांमुळे नागरिकांचे बळी जात आहेत आतापर्यंत १८ लोकांचे बळी गेले आहेत या घटनांना कोण जबाबदार उदगाव-अंकली जाणारा हा पूल ब्रिटिश कालीन असुन सुमारे १३५ वर्षाचा पुल आहे त्यासोबत नवीन पूल उभारला आहे असे एकूण या मार्गावर दोन पुल आहेत त्यालगत मिरज कोल्हापूर रेल्वे मार्गाचा पुल असून जुन्या पुलावर अनेक खड्डे पडले आहेत पुलाच्या सुरवातीपासून खड्डे भरून डांबरीकरण करणे गरजेचे आहे त्यामुळे अनेक वाहन चालकांचा वाहनावरील ताबा सुटून अपघात वाढत आहेत दोन्ही बाजूला झाडे झुडपे ही वाढली आहेत तीही काढण्यात आलेली नाहीत पुलाच्या दोन्ही बाजूला कोणत्याही प्रकारे माहिती फलक सूचनाफलक लावलेले नाहीत त्यामुळे वाहन चालकांना वाहन चालविताना रस्त्याचा अंदाज येत नाही त्यामुळे वेगाने वाहन जाऊन अपघात होत आहेत गुरुवारी मध्यरात्री याच जुन्या पुलावरून तुटलेल्या संरक्षण कटड्यातून चार चाकी फुलावरून खाली कोसळल्याने तिघांचा बळी गेला आहे अशा घटना वारंवार घडत असल्यामुळे प्रशासन का दुर्लक्ष करीत आहे अशी चर्चा नागरिकांना मधून होत आहे यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय प्राधिकरण विभागाने या पुलाचे तुटलेले संरक्षण कटडे दुरुस्ती करणे गरजेचे आहे तसेच रस्त्याच्या दोन्ही पुलाच्या परिसरात पांढरे पट्टे व व दिशादर्शक फलक लावणे व पूल असल्याच्या सुचना व वाहनाची गती दर्शविणे गरजेचे आहे कृष्णा नदीवरील उदगाव ते अंकली पुलावरील संरक्षण कठड्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय प्राधिकरण विभागाने दखल घेऊन दुरुस्त करावे अशी मागणी नागरिकातून होत आहे.
Uncategorized
कृष्णा नदी वरून उदगाव ते अंकली जाणाऱ्या पुलावरती वाढले अपघाताचे प्रमाण प्रशासनाचे दुर्लक्ष आत्तापर्यंत १८ बळी
Previous ArticleThe 35+ Finest Chatting Web Sites And Chat Rooms, Ranked
NCIB News