कोल्हापूर: हातकणंगले तालुक्यातील सर्व नागरी सहकारी पतसंस्थांचा आज शासनाच्या अंशदान विरोधी तसेच ठेव विमा संरक्षण ५ लाखापर्यंत मिळावे व पालक अधिकारी नेमणुकीस विरोध या मागण्यासाठी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला होता तालुक्यातील सर्व पतसंस्था कर्मचारी व संचालक मंडळ कामकाज बंद ठेवून तालुका उपनिबंधक सहकारी संस्था हातकणंगले यांना निवेदन देण्यासाठी उपस्थित होते. यावेळी हातकणंगले तालुका उपनिबंधक सहकारी संस्था एस. डी. जाधव निवेदन यांना देण्यात आले या वेळी बोलताना त्यानी सर्व पतसंस्था कर्मचारी व संचालक मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित राहून एकजूट दाखवली त्याबद्दल त्यांनी सर्वांचे कौतुक केले तसेच सर्वांचे वतीने दिलेले निवेदन मा. सहकार आयुक्त पुणे व सहकार राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्यापर्यंत पाठवून सदर निवेदनाबाबत पाठपुरावा करणार असल्याबाबत त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुधाकर पिसे यांनी निवेदनातील जाचक अटीबाबत सर्वांना माहिती दिली या संपास कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पतसंस्थांनी पाठिंबा देऊन सर्व संस्थांचे एक दिवसाचे कामकाज बंद ठेवण्यात आले
अंशदान विरोधात लढाई संघटितपणे सर्वच पातळीवर होणे काळाची गरज असल्याने हातकणंगले तालुका ग्रामीण बिगर शेती नागरी महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी सेवक पतसंस्था कर्मचारी संघटनेने सुरू केलेल्या उठावास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे यावेळी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुधाकर पिसे उपाध्यक्ष अनिल हजारे व जनरल सेक्रेटरी महेश कडाले, शांतिनाथ पाटील विलास सनगर सुनील बारवाडे यांच्यासह तालुक्यातील सर्व पतसंस्थांचे कर्मचारी संचालक मंडळ या संख्येने उपस्थित होते त्यामध्ये महिला कर्मचाऱ्यांची उपस्थिती लाक्षणिक होती.



