कोल्हापूर: पेठ वडगाव येथील सोमनाथ पतसंस्थेच्या १५ व्या शाखेचे उद्घाटन माआमदार दलितमित्र मा. डॉ. अशोकराव माने यांच्या हस्ते संपन्न झाले.
या प्रसंगी बोलताना त्यांनी सोमनाथ पतसंस्थेने अल्पावधीत वडणगे ते १५ व्या शाखेत पदार्पण करून सभासदांचा विश्वास सार्थ ठरविला असून या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोकराव माळी यांनी सभासद अल्प भूधारक शेतकरी छोटे-मोठे व्यावसायिक यांना कर्ज पुरवठा करून संस्था नावारूपाला आणली त्याबद्दल त्यांनी त्यांचे कौतुक केले व त्यांना शुभेच्छा दिल्या
मा.उपसरपंच सयाजी घोरपडे यांनी बोलताना सोमनाथ पतसंस्था गावामध्ये सुरू झाल्याने गावच्या विकासाला हातभार लागेल तसेच छोटे-मोठे व्यवसायिकांना मदत होईल यामुळे गावातील ग्राहकांचे व्यवहार ही वाढतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी संस्थापक चेअरमन यांनी बोलताना संस्थेच्या सुरू असणाऱ्या योजना बद्दल माहिती दिली सध्या संस्थेची ५० कोटी ठेवीकडे वाटचाल सुरू असून कोअर बँकिंग सुविधेची माहिती दिली सभासदांना व ग्राहकांना ग्राहक सेवा केंद्र सुरू करणार असल्याची माहिती दिली यावेळी पंचगंगा पाणीपुरवठा संस्थेचे चेअरमन मा. बाजीराव सदाशिव पाटील (नाना) सरपंच सौ.संगीता पाटील उपसरपंच उमाजी शेलार शाखा चेअरमन सुभाष पाटील संस्थापिका सौ रूपाली माळी शाखा सल्लागार हंबीरराव वळके संजय जौंदाळ नामदेव फल्ले तंटामुक्त अध्यक्ष पंडितराव चौगुले सेवा सोसायटीचे चेअरमन कृष्णात जौदाळ मा. पंचायत समिती सदस्या वैशाली पाटील उद्योजक अमर कांबळे छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना संचालक सर्जेराव पाटील बोणे डॉ.एम बी किडगावकर किसान मोर्चा उपाध्यक्ष बाळासो पाटील दुध उत्पादक संघटना ज्योतीराम घोडगे उपसरपंच सयाजी घोरपडे तोडणी वाहतूक संघटना व्हा चेअरमन बाळासाहेब पाटील कुशिरे हेड ऑफिस व्हा. चेअरमन बजरंग माळी संचालक हंबीरराव देसावळे पोपट खाडे चंद्रकांत माळी संजय धोंगडे लाटवडेचे मा. ग्रामपंचायत सदस्य बापूसो माळी जनरल मॅनेजर कृष्णात माळी असि. जनरल मॅनेजर नागनाथ माळी शाखा मॅनेजर विक्रात माळी तसेच सर्व शाखांचे चेअरमन शाखाधिकारी सल्लागार मंडळ कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार दिलीप पोवार सर यांनी केले



