कोल्हापूर :महाराष्ट्र पत्रकार संघ, हातकणंगले तालुका यांच्या वतीने तहसीलदार कार्यालय येथे ६ जानेवारी आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती व पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी आमदार अशोकराव माने बापू , जि.प सदस्य अरुणराव इंगवले आण्णा,तहसीलदार सुशिल बेल्हेकर साहेब, गट विकास अधिकारी शबाना मोकाशी मॅडम, गटशिक्षणाधिकारी रवींद्र चौगुले साहेब,नगरसेवक राजू इंगवले दादा तसेच महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अनिल उपाध्ये आण्णा तालुकाध्यक्ष पापालाल सनदी व सर्व पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते
 
				

