Shirishkumar Sherkhane

*स्मार्ट व्हिलेज कव्हा विविध विकास कामांचा भव्य शुभारंभ सोहळा*

लातूर येथे पत्रकारांसाठी शुक्रवारी कार्यशाळा

लातूर येथे पत्रकारांसाठी शुक्रवारी कार्यशाळा
लातूर, दि. ३० (जिमाका): माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, लातूर विभागीय माहिती कार्यालय आणि लातूर जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, १ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्ह्यातील पत्रकारांसाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. लातूर शहरातील डॉ. भालचंद्र रक्तपेढी सभागृहात सकाळी १०:३० वाजता जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन होईल.

जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील, तर लातूरचे प्रभारी विभागीय माहिती उपसंचालक विवेक खडसे यांची प्रमुख उपस्थिती राहील.

या कार्यशाळेत ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पत्रकारिता’ या विषयावर जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी पुरुषोत्तम रुकमे मार्गदर्शन करतील, तर ‘वृत्त संकलन आणि संपादनात शुद्धलेखनाचे महत्त्व’ या विषयावर परभणी येथील मराठी भाषा तज्ज्ञ प्रा. दीपक रंगारी मार्गदर्शन करतील. तसेच, विभागीय माहिती कार्यालयाचे सहायक संचालक (माहिती) डॉ. श्याम टरके हे अधिस्वीकृती नियमावली, आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना आणि शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी याविषयी माहिती देतील. जिल्ह्यातील सर्व पत्रकार, वृत्तपत्र प्रतिनिधी आणि संपादक यांनी या कार्यशाळेस उपस्थित राहावे, असे आवाहन लातूर विभागीय माहिती कार्यालय आणि लातूर जिल्हा माहिती कार्यालय यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

ॲड. मैलारीराज कावळे यांच्या भूकंप काळरात्र कवितेचा सन्मान*

ॲड. मैलारीराज कावळे यांच्या भूकंप काळरात्र कवितेचा सन्मान

लातूर 🙁 विशेष प्रतिनिधी ) ॲड. मैंलारीराज धोंडीबा कावळे हे मूळचे निलंगा तालुक्यातील बोरसुरी या ग्रामीण भागातील रहिवासी असून, त्यांनी 30 सप्टेंबर 1993 रोजी किल्लारी येथे झालेल्या भूकंपामध्ये त्यांच्या जीवनामध्ये वास्तव काळोख्याची रात्र पसरली, या दुःखमय प्रसंगातूनच कवितेचा जन्म झाला. या कवितेची निवड समितीने निवड करून सादरीकरणासाठी अनुमती दिली. या कवितेला नावही तसेच देण्यात आले होते. ही कविता सादरीकरण करण्यासाठी उच्च न्यायालयातील विधीज्ञ मान्यवरानी संधी उपलब्ध करून दिली. “काळरात्र” ही कविता उपस्थित सर्व विधीज्ञ मान्यवर श्रोत्यांना भावली. म्हणूनच या उत्कृष्ट “काळरात्र कवितेला मान आणि सन्मान मिळाला. याप्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मा.श्री. मनीष चितळे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मा.श्री. प्रसन्न भालचंद्र वराळे साहेब यांनी कवी ॲड.श्री.मैलारीराज कावळे यांचा मानचिन्ह व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या सन्मानाबद्दल वीरशैव कक्कया समाज, सामाजिक स्वयंसेवी संस्था, राष्ट्रीय अपराध ज्यांच ब्युरो नवी दिल्ली, शाखा महाराष्ट्र राज्य लातूर येथील डिस्ट्रिक्ट डायरेक्टर शिरीषकुमार शेरखाने तथा संपादक,अशा विविध संघटनांनी, प्रसार माध्यमे, विविध वृत्तपत्र यांनी दखल घेऊन अभिनंदन केले. यांच्या काळरात्र कवितेचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सन्मान छ. संभाजी नगर येथे महाराष्ट्र राज्यातील पहिले विधीज्ञ साहित्य संमेलन भरले होते. या कार्यक्रमांमध्ये सन्मान करण्यात आला.

माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकरांकडून सतीश देशमुख गोंदेगावकर यांच्या कुटुंबियांचे सांत्वन

जिल्हान्यायालया अंतर्गत चित्र स्पर्धेत ज्ञानेश्वर विद्यालयाचा यशराज शिखरे प्रथम

*लातूर जिल्हा पोलीस विभाग स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कामगिरी, नांदेड जिल्ह्यातून आरोपीला अटक*

स्काऊटच्या राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षणास डॉ. शंकर चामे यांची निवड..*

*स्काऊटच्या राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षणास डॉ. शंकर चामे यांची निवड..*भारत स्काऊट आणि गाईड नवी दिल्ली राष्ट्रीय कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय पातळीवर आयोजित करण्यात आलेल्या ऑर्गनायझिंग कमिशनर कोर्स करिता लातूर भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालयाचे कर्तव्यदक्ष जिल्हा स्काऊट संघटक डॉ. शंकर चामे यांची निवड राष्ट्रीय कार्यालय नवी दिल्ली यांच्यावतीने करण्यात आली आहे. सदरील प्रशिक्षण दिनांक 4 ते 8 ऑगस्ट 2025 दरम्यान लक्ष्मी मुजुमदार स्काऊट आणि गाईड भवन, नवी दिल्ली येथे संपन्न होणार आहे. सदरील प्रशिक्षणात संघटन कौशल्यावर आधारित सखोल असे मार्गदर्शन करण्यात येणार असून त्यास राष्ट्रीय पातळीवरील तज्ञ मंडळीचे मार्गदर्शन लाभणार आहे.डॉ. शंकर चामे यांच्या या निवडी बद्दल शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी (माध्य.)तथा शिक्षण उपसंचालक डॉ.दत्तात्रय मठपती, शिक्षणाधिकारी (प्राथ) नागनाथ शिंदे, जिल्हा चिटणीस तथा उपशिक्षणाधिकारी (माध्य.) संजय क्षीरसागर, जिल्हा कोषाध्यक्ष तथा उपशिक्षणाधिकारी (प्राथ) प्रमोद पवार, सहाय्यक राज्य प्रशिक्षण आयुक्त गोविंद केंद्रे, जिल्हा सहचिटणीस श्रीमती अरुणा कांदे, जिल्हा कार्यालयीन वरिष्ठ लिपिक सचिन सुरवसे, कनिष्ठ लिपिक आबा जोगदंड, श्रीमती अनुराधा कोटपेठ तसेच मुख्याध्यापक, स्काऊटर गाईडर आदींनी अभिनंदन केले..

विधी विद्यार्थ्यांसाठी क्रीडा कायदा: उत्कटतेला व्यवसायात बदलण्याची संधी-डॉ संजय बंग

लातूर: येथील दयानंद शिक्षण संस्थेच्या दयानंद विधी महाविद्यालयामध्ये ‘स्पोर्ट्स लॉ अ‍ॅज अ करिअर अपॉर्च्युनिटी फॉर लॉ स्टुडंट्स: टर्निंग पॅशन इनटू प्रोफेशन’ या विषयावर ख्राईस्ट युनिव्हर्सिटी, लवासा येथील प्रख्यात कायदेतज्ञ डॉ. संजय बंग यांचे अत्यंत उद्बोधक व्याख्यान संपन्न झाले. नुकतीच केंद्र शासनाने नॅशनल स्पोर्ट पॉलीसीला १ जुलै २०२५ रोजी मान्यता दिलेली आहे. या पार्श्वभूमीवर सदर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
या व्याख्यानाचा मुख्य उद्देश विधी विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रातील कायदेशीर पैलूंमध्ये असलेल्या वाढत्या संधींबद्दल माहिती देणे आणि त्यांना या क्षेत्रातील करिअरच्या शक्यतांबद्दल मार्गदर्शन करणे हा होता.
प्रास्ताविकात प्राचार्या डॉ. पूनम नाथानी यांनी अशा प्रकारच्या उद्बोधक व्याख्यानाची आवश्यकता विशद केली. यासाठी दयानंद शिक्षण संस्थेच्या महाविद्यालय विकास समितीचे सदस्य ॲड. आशिष वाजपेयी यांचे विद्यार्थ्यांच्या हितासाठीचे सतत मार्गदर्शन असते. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आजच्या व्याख्यानाचे आयोजन केले यावर त्यांनी विशेष भर दिला.
या व्याख्यानात डॉ. बंग यांनी क्रीडा कायद्याची वाढती व्याप्ती आणि या क्षेत्रातील करिअरच्या विविध संधींवर प्रकाश टाकला. जागतिक स्तरावर क्रीडा क्षेत्रातील वाढत्या व्यावसायिकतेमुळे कायदेशीर समस्यांचे प्रमाणही वाढले आहे. खेळाडूंचे हक्क, डोपिंगविरोधी कायदे, कराराचे वाद, बौद्धिक संपदा हक्क, प्रसारण हक्क, खेळ प्रशासनाचे नियम आणि खेळाडूंच्या नैतिक जबाबदाऱ्या, खेळाडूंचे कल्याण, स्पर्धांचे नियमन, वाद निराकरण आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा कायदे अशा अनेक पैलूंमध्ये कायदेशीर मदतीची गरज असते. अशा परिस्थितीत, क्रीडा कायद्याचे जाणकार असलेले वकील, सल्लागार आणि प्रशासकांची मागणी वाढत असल्याचे डॉ. बंग यांनी नमूद केले.
डॉ. बंग यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा कायद्याच्या अभ्यासासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांबद्दलही माहिती दिली. यामध्ये कराराचे कायदे, आंतरराष्ट्रीय कायदे, मध्यस्थी (Arbitration), तसेच क्रीडा क्षेत्रातील तांत्रिक आणि व्यावसायिक बाबींचे ज्ञान असणे महत्त्वाचे आहे. त्यांनी सांगितले की, केवळ कायद्याचे ज्ञान पुरेसे नसून, खेळाची आवड आणि या क्षेत्रातील नवीनतम घडामोडींची माहिती असणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
या व्याख्यानाने विधी विद्यार्थ्यांना क्रीडा कायद्याच्या क्षेत्रात असलेल्या उज्ज्वल भविष्याबद्दल एक नवीन दृष्टिकोन दिला आणि अनेकांना त्यांची क्रीडा क्षेत्रातील आवड एका व्यावसायिक संधीमध्ये रूपांतरित करण्यासाठी प्रेरणा दिली. हे व्याख्यान विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले, कारण त्यांना एक अपारंपरिक परंतु वाढत्या मागणीचे करिअर क्षेत्र म्हणून क्रीडा कायद्याची ओळख झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी एल बी पाचव्या वर्षाची विद्यार्थिनी कु.प्रणिता शेंडगे यांनी तर आभार प्रदर्शन बी ए एल बी द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी कु गार्गी बस्तापुरे यांनी केले. यावेळी विद्यार्थी आणि प्राध्यापक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

*CRPC महाराष्ट्र राज्य संचालक पदके लिये देवेंद्रजी वखारिया सहाब की नियुक्ती*

मुंबई : (विशेष प्रतिनिधी),
राष्ट्रीय अपराध ज्यांच ब्युरो नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य शाखा मुंबई के जॉईंट डायरेक्टर पंधरा वर्षे से अच्छा कार्य निभाते हुए,प्रमोशन मिला I *नागरी सुरक्षा हक्क परिषद CRPC* राज्य संचालक पद के लिये डायरेक्टर जनरल मा. सुरेशजी शुक्ला साहब ने प्रमोशन देकर नियुक्ती किये I इसलिये महाराष्ट्र राज्य शाखा जिल्हा लातूर NCIB के डिस्ट्रिक्ट डायरेक्टर शिरीषकुमार शेरखाने सरने देवेंद्रजी वखारिया साहब का शाल श्रीफळ पुष्पगुच्छ और स्वीट देकर स्वागत किया I और आगे अच्छे काम के लिए शुभकामना दिये I

७ जुलै रोजी आझाद मैदानात संत कक्कय्या समाजाचे धरणे आंदोलनासाठी लातूर येथे बैठकीचे आयोजन

७ जुलै रोजी आझाद मैदानात संत कक्कय्या समाजाचे धरणे आंदोलनासाठी लातूर येथे बैठकीचे आयोजन

लातूर:- संत कक्कय्या समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावे, या मागणीसाठी आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी वीरशैव कक्कय्या कल्याण मंडळ, मुंबई यांच्या वतीने सोमवार, दि. ७ जुलै २०२५ रोजी आझाद मैदान येथे एक दिवसीय धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

संत कक्कय्या समाजाच्या महामंडळ स्थापनेच्या मागणीसाठी यापूर्वीही २८ जून २०२४ रोजी आंदोलन करण्यात आले होते. त्या आंदोलनाला राज्यभरातील समाजबांधव, भगिनी, संस्था, महासंघ आणि संघटनांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात समाजाला महामंडळ देण्याचे जाहीर आश्वासन दिले होते. मात्र, त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही.

कल्याण मंडळाचे पदाधिकारी सातत्याने प्रशासनाशी संपर्कात राहून पाठपुरावा करत आहेत. अधिवेशनानंतर निवडणुका जाहीर झाल्या, मंत्रिमंडळ बदल झाला, परंतु शासन निर्णय मात्र अद्याप पारित झालेला नाही.

मागील महिन्याभरात कल्याण मंडळाने समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट व त्यांच्या सचिवांशी चर्चा करून पाठपुरावा सुरू ठेवला आहे. तरीही शासनाकडून सकारात्मक निर्णय घेतला जात नसल्याने, मंडळाच्या वतीने दि. ३ जून रोजी मुंबईत आयोजित सभेत ४० हून अधिक जिल्ह्यांतील सभासदांनी आंदोलनाची गरज व्यक्त केली. त्या पार्श्वभूमीवर शासनाचा निषेध नोंदवण्यासाठी व हक्काचे महामंडळ मिळवण्यासाठी पुन्हा एकदा धरणे आंदोलन करण्यात येत आहे. संत कक्कय्या समाजातील सर्व बांधवांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, माननीय यशवंतराव नारायणकर, शिंदे सर, शशिकांत सोनवणे सर, आधी यांच्यावतीने मार्गदर्शन झाले. असे आवाहन वीरशैव कक्कय्या कल्याण मंडळ, मुंबई यांच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी लातूर जिल्ह्यातील सर्व वीरशैव कक्कया समाजातील ॲड. जांबुवंतराव सोनकवडे, शंकरराव इंगळे, श्रीमंतराव कावळे, आदीसह सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.