Shirishkumar Sherkhane

राष्ट्रीय अपराध ज्यांच ब्युरो नवी दिल्ली ने किया, पर्यावरण अनुकूल की जनजागृती !


पर्यावरण अनुकूल गणेशोत्सव समय की मांग है और यह सबकी जिम्मेदारी है
महाराष्ट्र राज्य, शाखा लातूर डिस्ट्रिक्ट डायरेक्टर -शिरीषकुमार शेरखाने

विद्याविकास विद्यालय में ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न I हर घर तिरंगा, सबका प्यारा I देशभक्ति की संकल्पना को साकार किया

जागतिक शांतीची प्रेरणाभूमी भारत आहे भिक्खु अनालयो थेरो (थाईलँड)श्रावण पौर्णिमेनिमित्त थाईलँड येथील भिक्खु संघाने केले परित्राण थाईलँड येथील भिक्खु संघास भारतीय बौध्द अनुयायांनी केले संघदान.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकरांकडून स्वागत

लातूर दि.11-08-2025महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे लातूर दौर्‍यावर एका महत्त्वाच्या कार्यक्रमानिमित्त आले असताना लातूर येथील विमानतळावर भाजपा नेते तथा किसान मोर्चा गुजरात व गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी लातूर विमानतळावर त्यांची भेट घेऊन गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत केले.यावेळी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या समवेत भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांतराव शेळके, जननायकचे लातूर कार्याध्यक्ष राजाभाऊ मुळे उपस्थित होते.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महायुतीचे सरकार विरोधात जन आक्रोश मोर्चा*

*स्मार्ट व्हिलेज कव्हा विविध विकास कामांचा भव्य शुभारंभ सोहळा*

लातूर येथे पत्रकारांसाठी शुक्रवारी कार्यशाळा

लातूर येथे पत्रकारांसाठी शुक्रवारी कार्यशाळा
लातूर, दि. ३० (जिमाका): माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, लातूर विभागीय माहिती कार्यालय आणि लातूर जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, १ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्ह्यातील पत्रकारांसाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. लातूर शहरातील डॉ. भालचंद्र रक्तपेढी सभागृहात सकाळी १०:३० वाजता जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन होईल.

जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील, तर लातूरचे प्रभारी विभागीय माहिती उपसंचालक विवेक खडसे यांची प्रमुख उपस्थिती राहील.

या कार्यशाळेत ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पत्रकारिता’ या विषयावर जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी पुरुषोत्तम रुकमे मार्गदर्शन करतील, तर ‘वृत्त संकलन आणि संपादनात शुद्धलेखनाचे महत्त्व’ या विषयावर परभणी येथील मराठी भाषा तज्ज्ञ प्रा. दीपक रंगारी मार्गदर्शन करतील. तसेच, विभागीय माहिती कार्यालयाचे सहायक संचालक (माहिती) डॉ. श्याम टरके हे अधिस्वीकृती नियमावली, आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना आणि शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी याविषयी माहिती देतील. जिल्ह्यातील सर्व पत्रकार, वृत्तपत्र प्रतिनिधी आणि संपादक यांनी या कार्यशाळेस उपस्थित राहावे, असे आवाहन लातूर विभागीय माहिती कार्यालय आणि लातूर जिल्हा माहिती कार्यालय यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

ॲड. मैलारीराज कावळे यांच्या भूकंप काळरात्र कवितेचा सन्मान*

ॲड. मैलारीराज कावळे यांच्या भूकंप काळरात्र कवितेचा सन्मान

लातूर 🙁 विशेष प्रतिनिधी ) ॲड. मैंलारीराज धोंडीबा कावळे हे मूळचे निलंगा तालुक्यातील बोरसुरी या ग्रामीण भागातील रहिवासी असून, त्यांनी 30 सप्टेंबर 1993 रोजी किल्लारी येथे झालेल्या भूकंपामध्ये त्यांच्या जीवनामध्ये वास्तव काळोख्याची रात्र पसरली, या दुःखमय प्रसंगातूनच कवितेचा जन्म झाला. या कवितेची निवड समितीने निवड करून सादरीकरणासाठी अनुमती दिली. या कवितेला नावही तसेच देण्यात आले होते. ही कविता सादरीकरण करण्यासाठी उच्च न्यायालयातील विधीज्ञ मान्यवरानी संधी उपलब्ध करून दिली. “काळरात्र” ही कविता उपस्थित सर्व विधीज्ञ मान्यवर श्रोत्यांना भावली. म्हणूनच या उत्कृष्ट “काळरात्र कवितेला मान आणि सन्मान मिळाला. याप्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मा.श्री. मनीष चितळे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मा.श्री. प्रसन्न भालचंद्र वराळे साहेब यांनी कवी ॲड.श्री.मैलारीराज कावळे यांचा मानचिन्ह व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या सन्मानाबद्दल वीरशैव कक्कया समाज, सामाजिक स्वयंसेवी संस्था, राष्ट्रीय अपराध ज्यांच ब्युरो नवी दिल्ली, शाखा महाराष्ट्र राज्य लातूर येथील डिस्ट्रिक्ट डायरेक्टर शिरीषकुमार शेरखाने तथा संपादक,अशा विविध संघटनांनी, प्रसार माध्यमे, विविध वृत्तपत्र यांनी दखल घेऊन अभिनंदन केले. यांच्या काळरात्र कवितेचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सन्मान छ. संभाजी नगर येथे महाराष्ट्र राज्यातील पहिले विधीज्ञ साहित्य संमेलन भरले होते. या कार्यक्रमांमध्ये सन्मान करण्यात आला.

माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकरांकडून सतीश देशमुख गोंदेगावकर यांच्या कुटुंबियांचे सांत्वन

जिल्हान्यायालया अंतर्गत चित्र स्पर्धेत ज्ञानेश्वर विद्यालयाचा यशराज शिखरे प्रथम