लातूर दि.11-08-2025महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे लातूर दौर्यावर एका महत्त्वाच्या कार्यक्रमानिमित्त आले असताना लातूर येथील विमानतळावर भाजपा नेते तथा किसान मोर्चा गुजरात व गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी लातूर विमानतळावर त्यांची भेट घेऊन गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत केले.यावेळी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या समवेत भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांतराव शेळके, जननायकचे लातूर कार्याध्यक्ष राजाभाऊ मुळे उपस्थित होते.