सतीश देशमुख गोंदेगावकर यांच्या कुटुंबियांचे सांत्वन
लातूर दि.24-07-2025
लातूर तालुक्यातील गोंदेगाव येथील रहिवाशी सतीश देशमुख यांच्या मातोश्री मधुराबाई माणिकराव देशमुख वय (105 वर्ष) यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. याची माहिती मिळताच भाजपा नेते तथा किसान मोर्चा गुजरात व गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी त्यांच्या लातूर शहरातील व्यंकटेश नगर भागातील निवासस्थानी भेट देऊन देशमुख परिवारांचे सांत्वन केले.
यावेळी बोलताना माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर म्हणाले की, आम्ही आपल्या दुःखामध्ये सहभागी आहोत, आपणास आणि आपल्या परिवाराला या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना अशी भावनिक प्रतिक्रियाही यावेळी बोलताना दिली.
यावेळी त्यांचे चिरंजीव भागवत माणिकराव देशमुख, गोंदेगावचे माजी सरपंच तथा त्यांचे नातू सचिन व्यंकटराव देशमुख, शशिकांत भागवतराव देशमुख यांच्यासह परिवारातील सदस्य उपस्थित होते. तसेच माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्यासमवेत जननायक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांतराव शेळके उपस्थित होते.