लातूर:-( प्रा. सुधीर चेरेकर ) विशेष प्रतिनिधी, जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ( जिल्हा न्यायालयांतर्गत ) घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत ज्ञानेश्वर विद्यालयाचा यशराज शिखरे यास प्रथम क्रमांक मिळाला. याप्रसंगी लातूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष मा.श्री.व्ही.व्ही.पाटील व सचिव
मा.श्री. केसतीकर साहेब यांनी यशराज शिखरे आणि मार्गदर्शक ज्ञानेश्वर बेंबडे ( कलाशिक्षक ) यांचा शील्ड आणि प्रमाणपत्र देऊन गौरव केला.या निमित्ताने लातूर एज्युकेशन सोसायटी, लातूरचे अध्यक्ष मा.श्री.विक्रमजी गोजमगुंडे ( तात्या ) सचिव मा.श्री. डी.एन.शेळके ( दादा ) सर्व पदाधिकारी, विद्यालयाचे प्राचार्य श्री. संजय मलवाडे, उपप्राचार्य श्री. माधव क्षीरसागर, पर्यवेक्षक द्वय हनुमंत बैनगिरे, श्रीमती पूनम पाटील,मुख्यलिपिक श्री.अजय अरदवाड, संस्थेतील सर्व शिक्षक- शिक्षिका,शिक्षकेतर,कर्मचारी सहकारी,आणि पालक यांनी बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक शिक्षकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.