
*स्काऊटच्या राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षणास डॉ. शंकर चामे यांची निवड..*भारत स्काऊट आणि गाईड नवी दिल्ली राष्ट्रीय कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय पातळीवर आयोजित करण्यात आलेल्या ऑर्गनायझिंग कमिशनर कोर्स करिता लातूर भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालयाचे कर्तव्यदक्ष जिल्हा स्काऊट संघटक डॉ. शंकर चामे यांची निवड राष्ट्रीय कार्यालय नवी दिल्ली यांच्यावतीने करण्यात आली आहे. सदरील प्रशिक्षण दिनांक 4 ते 8 ऑगस्ट 2025 दरम्यान लक्ष्मी मुजुमदार स्काऊट आणि गाईड भवन, नवी दिल्ली येथे संपन्न होणार आहे. सदरील प्रशिक्षणात संघटन कौशल्यावर आधारित सखोल असे मार्गदर्शन करण्यात येणार असून त्यास राष्ट्रीय पातळीवरील तज्ञ मंडळीचे मार्गदर्शन लाभणार आहे.डॉ. शंकर चामे यांच्या या निवडी बद्दल शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी (माध्य.)तथा शिक्षण उपसंचालक डॉ.दत्तात्रय मठपती, शिक्षणाधिकारी (प्राथ) नागनाथ शिंदे, जिल्हा चिटणीस तथा उपशिक्षणाधिकारी (माध्य.) संजय क्षीरसागर, जिल्हा कोषाध्यक्ष तथा उपशिक्षणाधिकारी (प्राथ) प्रमोद पवार, सहाय्यक राज्य प्रशिक्षण आयुक्त गोविंद केंद्रे, जिल्हा सहचिटणीस श्रीमती अरुणा कांदे, जिल्हा कार्यालयीन वरिष्ठ लिपिक सचिन सुरवसे, कनिष्ठ लिपिक आबा जोगदंड, श्रीमती अनुराधा कोटपेठ तसेच मुख्याध्यापक, स्काऊटर गाईडर आदींनी अभिनंदन केले..