लातूर:(प्रतिनिधी), २७ ऑक्टोबर”राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त” आज श्री केशव शिशु वाटिका,लातूर येथे जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले.लातूर महानगरपालिकेअंतर्गत इंडिया नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत बालकांच्या आरोग्याच्या हितासाठी जंतनाशक मोहीम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेअंतर्गत श्री केशव शिशुवाटिका,लातूर येथे विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. बालकांचे आरोग्य सुदृढ राखणे, जंतसंसर्गाचा धोका कमी करणे आणि आरोग्याविषयी जनजागृती करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका अंजली कुलकर्णी यांच्या सहकार्याने इंडिया नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य कर्मचारी किरवले सावित्री शिवाजी तसेच आशा स्वयंसेविका उषा शिंदे व कलीमुन शेख यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.
बालकांचे आरोग्य जपण्यासाठी आरोग्य विभागामार्फत अशा विविध आरोग्यविषयक मोहिम राबविण्यात येत आहेत.यावेळी लातूर जिल्ह्याचे एनसीआयबी डिस्ट्रिक्ट डायरेक्टर तथा वाहतूक नियंत्रण शाखेचे ट्रॅफिक आंबेसेडर शिरीषकुमार शेरखाने यांनी राष्ट्रीय उपक्रमात स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊन आनंद व्यक्त केला.
